boAt…… माहितीये,ही कंपनी भारतीय आहे?का परदेशी ?वाचा यांची सक्सेस स्टोरी.

.#business
#businessstories
#boAt

गेल्या पाच – दहा वर्षात स्टार्टअपच्या दुनियेत अनेक कंपन्या स्टार बनून उभ्या राहिल्यात,ज्यांनी बड्या बडया इंटरनैशनल ब्रॅण्डसला जोरदार टक्कर दिलीये.

असाच एक ब्रॅण्ड आहे,boAt.

या ब्रॅण्डचं स्टेटस,त्यांनी केलेली स्वतःची पोजिशनिंग,इतकी प्रिमियम आहे कि,बऱ्याच लोकांना हे माहित सुद्धा नसेल,कि हा ब्रान्ड भारतीय आहे?का आंतरराष्ट्रीय?

तर, त्यांचेसाठी,
हा ब्रान्ड पूर्णपणे भारतीय आहे,
चक्क देसी “देल्लीमेड” !

“दिल्लीमेड”… म्हणलं कि,सबस्टॅन्डर्ड वगैरे,,अशी ओळख पूर्णपणे उलट ठरवणारा हा ब्रान्ड !

📌ब्लूटूथ एअरपॉड्स,उत्कृष्ठ एअरफोन्स, ब्लुटुथ म्युजिक सिस्टीम, इनडोअर,आऊटडोअर बेस्ट क्वालिटी डिवायसेस, बनवणारी ही कंपनी आहे.

तर आज समजावून घेऊया,तीस लाखापासून … शंभर कोटीपर्यंत पोहचलेल्या या भारतीय ब्रान्डविषयी.

📌 हा ब्रान्ड,2015साली चालु झालाय,गेल्या पाच वर्षात या कंपनीने फार मोठी झेप घेतलीये,(100 CR)तर समजावून घेऊया या कंपनीच्या प्रवासाबद्दल आणि त्यांनी वापरलेल्या बिझनेस स्टॅटर्जीज बद्दल.

अमन गुप्ता आणि समिर मेहता, या दोघांनी ही कंपनी सुरु केलीये.

प्रोफेशनने Chartered Accountant असणाऱ्या अमन गुप्ता, यांनी 2003- 2006 दरम्यान City Bank मध्ये जॉब केला,
नंतर 2010 पर्यंत फॅमिलीच्या इलेक्ट्रॉनिक बिझनेसमध्ये काम केलं… बिझनेसचे बेसिक शिकले, आणि पुढे MBA करून एक कंपनी जॉईन केली. .. कोणती??????

JBL….

इथे त्यांना जिम्मेदारी दिली गेली,
“भारतीय ग्राहकांच्या आवडी निवडी कशा आहेत?ते शोधुन त्यानुसार, प्रॉडक्ट डिजाईन करण्याची”.

आणि पुढे हीच गोष्ट त्यांना boAt सुरू करण्याकरिता फायदेशीर ठरली,
म्हणून : जेंव्हा आपल्याला एखादं स्टार्टअप चालु करायचं असतं तेंव्हा, त्या संदर्भातील कंपनीमध्ये जॉब नक्की करावा.

📌 Rugged Cable startup :

ज्याच्या डोक्यात बिझनेसचा किडा असतो,तो काही ना काहीतरी मार्ग काढतोच,त्याला संधी दिसतातच.

अमन गुप्ता आणि समीर मेहता,यांना असं लक्षात आलं कि, आयफोन करिता लागणारी केबल ही पीन जवळ तुटते, आणि यांनी मग याच संधीचा फायदा घेऊन, 2013 मध्ये चार्जिंग केबल बनवायचा बिझनेस चालु केला.

कंपनीचं नाव?

Imagine Marketing services Pvt. Ltd.

या बिझनेस साठी दोघांनी मिळून, खिशातलं 30 लाख रूपये भांडवल लावलं.

पहिले दोन वर्ष स्ट्रगल होताच,पण मग त्यांना आयडिया सुचली ती म्हणजे?हेडफोन बनवण्याची.

भारतात एकतर स्वस्तात मिळणारे चायनीज हेडफोन होते, नाहीतर तर मग,अतिशय महागडे ब्रांन्डेड हेडफोन .

ज्याला मेडियम रेंज मध्ये उत्कृष्ठ क्वालिटी पाहिजे,त्यांनी कुठे बघायचं ?

आणि इथे सुरू झाला हा प्रवास एक Vision ठेऊन .

“Bringing affordable, durable, fashionable,Audio products to millennials”

तरूणाईला,परवडतील,जास्त काळ टिकतील आणि फैशनेबल दिसतील असे प्रॉडक्ट बनवणे.

म्हणून तर बघा,boAt ची उत्पादने एकदम सुपिरीयर दिसतात.

ज्याप्रमाणे Xiaomi ने भारतात विक्री करण्यासाठी नेहमीचा मार्ग न निवडता वेगवेगळ्या पद्धती लावल्या ,सेम तीच तऱ्हा boAt ने वापरली.

#Funding:

स्टार्टअपची सुरूवात नेहमी स्वतःच्याच पैशाने करावी लागते, मग थोडा बहुत चमत्कार दिसला कि, दुसरे फंडींग करतात, तशी boAt ला पाहिली 6 करोड फंडींग Fireside Capital investment. ने केली, आणि मग पुढे पुढे तर इन्वेस्टरची लाईनच लागली.

#Product :

जेंव्हा आपण एखादा व्यवसाय चालु करतो तेंव्हा आपल्याला त्या उत्पादनाबद्दल चांगलं ज्ञान असायला पाहिजे,त्याची उद्याची वाटचाल कशी असणारंय याचा अंदाज लावता यायला हवाय,
अमन गुप्ता आणि संकेत मेहता यांच्या हे लक्षात आलं होतं,कि इथून पुढे मोबाईल चा वापर खुपच वाढेल आणि मग त्या बरोबर हेडफोन्सचा सुद्धा.
सो त्यांनी परफेक्ट प्रॉडक्ट निवडला.

#Lifestyle_Branding:

आपल्याला हे माहित आहे कि, मोबाईल हे इलेक्ट्रॉनीक उपकरण आहे,पण आयफोन एक असा ब्रान्ड आहे,जो वापरणाऱ्याची लाईफस्टाईल दाखवतो.

रेबॅन गॉगल,Nike शुज, Royal Enfield bullet, या वस्तु उत्पादनं आहेत,पण त्यापेक्षा पुढे जाऊन हे लाईफस्टाईल ब्रॅन्ड आहेत.

अमन आणि संकेत, यांनी boAtच्या प्रॉडक्टला फक्त इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट एवढंच मर्यादित न ठेवता,एक Lifestyle ब्रान्ड बनवायचं मनावर घेतलं,आणि तिथे ते पहिली पायरी जिंकले.

#Targetting_Millennials:

आपल्या उत्पादनांसाठी नेमका कोणता वर्ग योग्य असेल?हे शोधून त्याला टारगेट करणे,हे काम व्यावसायिकाला परफेक्ट जमलं,तर त्याचा विनाकारण खर्च होत नाही.

तसं यांनी millennials म्हणजे? 20_ 25 वर्ष वय असणारे पोरं, त्यांनाच टारगेट केलं.

KTM बाईकसुद्धा कोणामुळे प्रसिद्ध झाली? तर याच वर्गामुळे.

तेंव्हा ग्राहक वर्ग ओळखता यायला हवं.

#Online_marketing.

मार्केटिंग करण्याच्या अनेक जागा असतात, पण आपण त्या ठिकाणी मार्केटिंग केली पाहिजे, जिथे आपला ग्राहक रेंगाळतो.

ग्राहक ऑनलाईन आहे तर मग फक्त इथेच मार्केटिग केली पाहिजे हे यांनी ओळखलं आणि इथेच पैसा लावला.

डन !

#Find_out_insights:

प्रॉडक्ट फायनल झाला, टारगेटेड कस्टमर कळला कि,मग ग्राहकाला नेमकं काय आवडतं?हे लक्षात घेतलं पाहिजे, आणि यांना कळलं कि भारतीयांना जास्त BASS आवडतो.

त्यामुळे boAt ने आपल्या प्रत्येक उत्पादनात BASS जास्त दिला.

📌 #Expanding_catalogue.

मार्केटमध्ये एकच प्रॉडक्ट आपण, खूप दिवस विकू शकत नाही, ग्राहकांची टेस्ट सतत बदलत असते,

सेम तो धागा पकडून boAt, सततपणे नवनवीन आपले प्रॉडक्ट आणत रहाते.

#Influencer_marketing:

मार्केट मध्ये ज्या लोकांचा प्रभाव असतो,त्यांचा वापर प्रमोशनसाठी केला कि, विक्री नक्की वाढते.

भारतात क्रिकेट आणि बॉलीवूड यांच्यासारखं दुसरं कोणीही जास्त प्रभावी नाही, म्हणुन मग या कंपनीने, Mumbai Indians,CSK या टिम्स बरोबर पार्टनरशीप केली,
हार्दिक पांडया, नेहा कक्कर,नावेद शेख अशा लोकांना ब्रान्ड ऍम्बेसिडर बनवलं,Lakme fashion week. सारख्या इवेंटला स्पॉन्सर केलं.

यातून तयार झाला मग प्रभाव !

***************************

📌 ज्याप्रमाणे स्टीव जॉब्स यांनी ऍपल करिता, सुंदर प्रॉडक्टची कल्पना केली होती, त्याचप्रमाणे boAt ने देखील, या सर्व गोष्टींवर लक्ष देत देत, किंमती योग्य ठेवल्या.

यामुळे JBL सारख्या इतर ब्रान्डला देखील, किंमतीवर विचार करावाच लागला.

📌 अशाप्रकारे,

ग्राहकांच्या आवडी जपत,उत्कृष्ठ, दर्जेदार, उत्पादने योग्य किंमतीत देत राहील्याने ही कंपनी 100 कोटीपर्यंत पोहचलीये !

तुम्ही म्हणालं : “आपण यांच्या स्टोरी का वाचायच्या?” तर लक्षात घ्या, ही लोकं काही मंगळावरून आलेले नव्हते,आपण देखील अशा स्टार्टअप कडून खूपकाही शिकून,आपल्या व्यवसायाला अजून चांगलं बनवू शकतो.

तेंव्हा वाचत रहा,आणि प्रगती करत रहा.

शुभेच्छा !
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764

office :
ओमकेश मुंडे सर :
9146101663.

Previous Post Next Post

2 thoughts on “boAt…… माहितीये,ही कंपनी भारतीय आहे?का परदेशी ?वाचा यांची सक्सेस स्टोरी.

  1. धन्यवाद सर,यशस्वी उद्योगाच्या वाटा अश्याच अनुभवाच्या,चिकाटीच्या आणि बदलण्याच्या शिदोरीतून पुढे पुढे जात असतात आणि मग त्याच जोरावर एक यशाचा राजमार्ग तयार होतो.ज्यानां अश्या पाऊलवाटा खांबीरपणे आणि आत्मविश्वासाने तुडवायच्या असतात त्यांना अश्याप्रकारे यशस्वी झालेली,जन प्रसिद्धी मिळालेली यशोमंदिर नक्कीच स्फूर्ती देतील,त्यांचा आत्मविश्वास आणि मनोधैर्य इतके भक्कम होतील की त्यातूनच अश्या यशाच्या सत्यकथा तयार होतील.प्रयत्न हा री ओढण्याचा नाही तर त्यातुन काही तरी नवीन शिकण्याचा आहे असे मला वाटते.शुभेच्छा अश्या प्रयत्नांना.

  2. खूप।चांगली माहिती मिळाली, निलेश सर तुमच्या मुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *