Brand promotion चा अतरंगी प्रकार

403 Views

9518950764

#ब्रॅन्ड_प्रमोशनचा_अतरंगी_प्रकार

#Predatory_Ambushing

© निलेश काळे.
www.nileshkale.com

📌 सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर आपली एखादी पोस्ट गाजली,कि अनेक जण त्या पोस्टच्या कमेंट सेक्शन मध्ये आपली जाहिरात टाकतात.

तसं पाहता यामुळे त्यांच्या ब्रॅन्डचीनीट इमेज तयार होत नाही किंवा क्लोजिंग तर होतच नाही,परंतु काहीच न केल्यापेक्षा असं करून कुठंतरी प्रमोशन केल्याचं समाधान मिळतं, आत्मा शांत होतो, म्हणून अनेक जण असं आजही करतात.(तसं तर हे करूच नये, बऱ्याच वेळा असं करणं बेकायदेशीर असतं,बॅकफायर करू शकतं)

📌 बऱ्याच वेळा हे वर्तन…. “गैर” वाटतं पण, मार्केटिंगच्या भाषेत याला “ऍम्बुश मार्केटिंग” “Ambush Marketing म्हणतात.

📌 आपण या Ambush मार्केटिंग मधला एक अजून उपप्रकार म्हणजे बॅटरी अंबुशीग,याचा अर्थ असा आहे की आपण इतर कोणत्याही स्पर्धकाने स्पॉन्सर केलेल्या कार्यक्रमांमध्ये जबरदस्तीने घुसून तिथे आपली जाहिरातबाजी करणे.

📌 Predator चा अर्थ होतो शिकारी प्राणी !
समजा जंगलात एखादया शिकारी प्राण्याने (समजा बिबटया ) हरणाची शिकार केली, तर तो बिबटया एकटा बसुन निवांतपणे त्या हरणाला खाऊ शकतो का ?

नाही !

त्याला त्यानेच केलेली शिकार , इतर शिकारी प्राण्यांपासून लपवुन खावी लागते,नाहीतर एकदा का त्या शिकारीचा सुगावा इतर प्राणी जसे Hyena,गिधाडं,वाघ यांना लागला कि, ते तिथे वाटा मागायला येणारच !

तो जंगलाचा नियमच आहे !

तुम्ही Discovery channel किंवा Natural geographic channel बघत असाल तर हा प्रकार जरा जास्त लवकर रिलेट करता येईल !.

📌 जसं जंगलात घडतं तसं , बिझनेसच्या दुनियेत सुद्धा नेहमी घडवलं जातं,मुद्दामहून

असे अनेक किस्से जगप्रसिद्ध आहेत !

📌Olympics च्या इव्हेंट जगभरात कोटयावधी लोक बघतात, समजा एखादया इवेंट ला Coca- Cola ने स्पॉन्सर केलंय !

आता ही स्पॉन्सरशीप त्या स्टेडीयम मधे होणाऱ्या =त्या खेळासाठी आहे ,

दुनियाभरातला मिडिया तो इवेंट कव्हर करण्यासाठी त्या xyz शहरात आलाय,दोन दिवस अगोदर पासुनच लोकं त्या शहरात यायला लागलेत , आणि Pepsi ने एअरपोर्ट , मेट्रो स्टेशन,बस स्टॉप आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी मोठया प्रमाणावर टी शर्ट / कॅप्स / पेप्सी बॉटल फ्री वाटायला चालु केलं तर काय होईल ?

📌 साधी गोष्ट आहे लोकं कन्फ्युज होऊन जातील कि बाबा रे स्पॉन्सर आहे कोण ?

📌 त्यातले बरेच जण Pepsi ने वाटलेले T-shirt ,caps , flyers घेऊन स्टेडियममधे जातील आणि आपसूकच पेप्सीची जाहिरात होऊन जाईल !

📌 स्पॉन्सरशीप साठी भली मोठी रक्कम न खर्च करता,आपलं नाव चमकवण्याचा हा प्रकार आहे.

📌 आपल्याकडे सुद्धा हा प्रकार घडतो !

गावात एखादया पक्षाचे फारच मोठे नेते आलेले असतात

हौशी कार्यकर्ता एका मित्राला किंवा फोटोग्राफरला अगोदरच सांगुन ठेवतो,,, “साहेबाच्या कानाजवळ गेलो कि पटकन्न फोटो काढ !”

हा कार्यकर्ता,साहेबाच्या कानाजवळ जाऊन विचारतो ,,,

कार्यकर्ता : “साहेब थंड बिस्लरी आणु काय “?

साहेब : (झिडकारून ) “नको रे !”

कार्यकर्ता : “बरंय साहेब ! येतो”

पण फोटो निघालेला असतो. 😂

हा कार्यकर्ता नंतर काही दिवसांनी तोच फोटो मोठया होर्डिंगवर लावून त्याखाली लिहीतो ….

“गावाच्या विकासासाठी साहेबांबरोबर चर्चा करताना” 🤨

📌 साहेबाला आमंत्रण दिलं कुणी ?

📌 साहेबांची व्यवस्था केली कुणी ?

📌 सभा घेतली कुणी ?

📌 आणि फोटो काढून शायनींग मारतेय कोण ?

याला म्हणायचं Battary predatory Ambushing ( नाव जरा किचकट आहे,पण प्रकार तर लक्षात आला असेल )

📌 या प्रकारची मार्केटिंग लिगल म्हणता येणार नाही आणि आज आपण त्याचं पळवलं तर उद्या तो पण चान्स मारणारच आहे.

तरी देखील हे होतं.
कारण?
” प्रेम,युद्ध आणि बिजनेस प्रमोशनमध्ये सगळं माफ आहे असं म्हणतात”

काय करावं ?

शुभेच्छा !

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट.
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

” उद्योगनिती पर्सनल बिझनेस कोचिंग करते, ती पण रिजल्ट देणारी”
“तेंव्हा स्वतःचं बिजनेस ट्रैक रेकॉर्ड असणाऱ्या कोच कडून कोचिंग घ्या”
संपर्क : श्री ओमकेश मुंडे : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *