Business मध्ये टिम कशी हाताळायची ?ते वाचा !

Business मध्ये टिम हाताळायची कशी?

युद्ध असो कि व्यवसाय , एकटयाने झटायचे क्षेत्रच नाहीयेत हे !

माणसं , भरपूर माणसं लागतात यासाठी .

माणसं आली कि जसे अनेक हातं आली तशी अनेक डोकी आणि अनेक मनं पण आली , त्यांना मॅनेज करणे म्हणजे येडया गबाळ्याचं काम नाही !

मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात HR हा स्पेशल विषयच त्याच्यावर आहे , चला थोडंसं विस्तृत पॉईंट टू पॉईंट समजून घेऊया !

(1) Listen Up:
प्रत्येक स्टार्ट अपची आयडीया एखादया सुपीक डोक्यातूनच बाहेर पडलेली असते , मग चालु होतो प्रवास त्या आयडीयाला मोठं , अजून मोठ्ठं बनवायचा !
बरे जे डोकं आयडीया जनरेशन करू शकतं तेच त्याला फार मोठ्ठं बनवू शकतं असं नाही , जनरेशन आणि एक्सपान्शन या दोन्ही वेगवेगळ्या कला आहेत , त्यामुळे वेगवेगळया लेवल वर ते होत असतं , त्यामुळे आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक डोक्याकडून त्याबद्दल inputs यायला हवेत , त्यामुळे जसं आपण ऑर्डर देण्यासाठी तयार असतो, त्याचप्रमाणे इतरांचं ऐकायला सुद्धा तयार असायला पाहिजे ,

टीम लहान असेल तर ते काम सोप्पं होतं पण अनेक वेगवेगळे फार्म्यूले लावून मोठया संघटनेत सुद्धा ते शक्य आहे , फक्त प्रमुखाची तशी इच्छा पाहिजे .

(2) Provide them pleasant Environment:

आपल्याकडे कामं करणारा शेवटी एक मनुष्य आहे , त्याला सुद्धा मन आहे , भावना आहे , त्याला सुद्धा सुखं आणि दुःख होतात , एकूणच काय तर आज त्याची परिस्थिती नसेल पण त्याला देखील काम करायला एक पोषक वातावरण पाहिजे !
म्हणून जेवढं होईल तेवढं ( अगदीच फाईव स्टार म्हणत नाहीये ) चांगलं वातावरण देणं आपलं काम आहे , त्यामुळे ही आपली टिम जास्त क्रिएटीवली काम करू शकते , त्याचा फायदा शेवटी आपल्यालाच होतो .

(3)Encourage Happiness :

मान्य आहे प्रत्येक जण पैशासाठीच आलाय , कोणी कोणाबरोबर सोयरीक करायसाठी नाही आला , पण पगार , पैसा , आणि बोनस याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक बाबी आहेत ज्या मनुष्याला आनंदी रहायला मदत करतात , अगदी बारीक सारीक बाबी असतात त्या, घरातल्या जिम्मेदार व्यक्ती सारखं आपली ही पण जिम्मेदारीच आहे कि , जेवढी आपण शिस्त लावतो तेवढीच याची पण काळजी घेतली पाहिजे कि , कुठे अस्वस्थता तर नाही ना ?
कारण अशी अस्वस्थता फारच संसर्गजन्य असतेय ती जर वेळीच ओळखली नाही तर मात्र उशीर होतो आणि होतं नुकसान , चांगली चांगली माणसं सोडून जातात .

(4) Set “Clear-cut” Goals :

“तुम्ही तर मला हे सांगितलंच नव्हतं” !
ही अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकली असतील , काय होतंय की माणसाचा मेंदू क्लीकर ऑर्डर्स मानतो , आणि त्याला फॉलो करतो , त्यामुळे जर आपण जर समोरच्याला काही काम दिलंय, काही टारगेट दिलंय ते अगदी क्लीअर असावं , त्यात कन्फ्युजन नसावं, बऱ्याचदा सांगितलंय एक आणि करतोय एक अशी परिस्थिती एक निर्माण होतेय , मग आरोप प्रत्यारोप चालु होतात आणि वातावरण बिघडतं त्यामुळे आपल्याकडून चुक होऊ नये म्हणून समोरच्याला क्लीअर ऑर्डर्स दया किंवा जमलंच तर लेखी ऑर्डर्स दया . त्यामुळे संभ्रम रहात नाही .

(5) Don’t Micromanage :

जुन्या काळातल्या सुनांच्या सासुबाई, त्या नवीन आलेल्या सुनेच्या प्रत्येक हालचाली वर बारीक लक्ष ठेऊन असत ( मराठी पिक्चर मध्ये बघीतलेय ना ? ) तसं कित्येक बिझनेस ओनर्स करत बसतात .
लक्ष ठेवणे , कामं करवून घेणे हे अत्यावश्यक आहे मान्य ,,,, पण कित्येक जण irritate करण्या इतपत सारखी लुडबुड करत बसतात , आणि ते धोकेदायक आहे .

एकदा टारगेट दिलं , लक्ष देणारी सिस्टीम बसवली कि झालं तुमचं काम उगाचच पुन्हा मधे मधे करण्यात काहीच पॉईंट नाही .

(6) Don’t Pit them against One Another

सकस स्पर्धा ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे माणसं त्यांच्या बाऊंड्रीच्या बाहेर जाऊन कामं करू लागतात , पण ही गोष्ट निकोप असायला पाहिजे , उद्योजकाने आपल्या कामगारांच्या दरम्यान असा भेदभाव करणे , एकाला बाबु आणि दुसऱ्याला कार्ट असं ट्रीट करणे पूर्णपणे अयोग्य आहे ,
यामुळे एक तर आपली इमेज खराब होते , कामगारांचं मोराल ( मनःस्थिती ) नीट रहात नाही , एकूणच काय तर उत्पादकता घटते म्हणून हे करूच नये.

(7) Recognize a Job Well done:

बऱ्याच सिनेमातला हा सिन ,,, आठवतो का ?
दासी पळत पळत येते ,, , ” महाराज , आनंदाची बातमी आहे , राणी साहेबांनी मुलाला/मुलीला जन्म दिलाय,दोघंही सुखरूप आहेत”

आणि महाराज लगेचच त्यांच्या गळ्यातली मोत्याची माळ , बक्षीस म्हणून देणार !

हे काय आहे ?
: चांगल्या कामाला दिलेली शाबासकी .
खूप लोकं याच्यात पण कंजुषी करतात , नाही ओ ! कौतूक सर्वांनाच आवडतं !
माणूस एक वेळ पैशाचा भुकेला नाही , पण कौतूक त्याला हवंय , त्यातल्या त्यात जर त्याने काही वेगळं , उत्तम केलं असेल तर त्याचं कौतूक करणे हे चांगल्या टीम लिडरचं काम आहे.
म्हणून तर … काल परवा मंत्रालयात लागलेल्या आगीत सुद्धा , तिरंगा ध्वज सुखरूप उतरवणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी स्वतः केला .
हे तत्व महत्वाचं आहे .

📌 (8) Gamify the Work :

तुमचं काम जरा जास्तच कठीण आहे?,सिरीयस आहे?,खूप कष्ट घ्यावे लागतात? तर यासाठी सर्वात मस्त मोटीवेटर प्रोग्राम कोणताय ?
तर आपल्या कामाला Gamify करा , म्हणजे त्याच्यात खेळकर पणा आणा
बऱ्याच कंपन्या,त्यांचे डिपार्टमेंट ही पद्धत अवलंबतात , अगदी ऍपल सारख्या कंपन्या सुद्धा फारच खेळ कर वातावरणातच प्रोफेशनल कामं करवून घेतात, ही नवीन टेक्निक आहे , आपल्या व्यवसायात रूजायला जरा वेळ लागेल , तरिही इफेक्टीव पण आहे आणि सोप्पी पण !

📌 (9) Give them some Autonomy :

कोणताही मोठा देश एकाच माणसाने चालवणं शक्य आहे , पण भारतासारखेच प्रत्येक देशाने आपल्या अंतर्गत रचनेत वेगवेगळे राज्ये बनवून त्याला थोडी स्वायत्तता दिलेली आहे , यामुळे होतं काय ?
तर ती छोटी छोटी राज्ये चांगलं कामं करून दाखवतात .
Autonomy चा अर्थच : “थोडीशी स्वायत्तता आहे” !
थोडी मोकळीक,थोडे निर्णय घेण्याचे अधिकार असले कि लोक चांगले परफॉर्म करतात, म्हणून ते देणे आपल्याच प्रगती साठी चांगले असते .

📌 (10) inspire them with Matching swag :

अगदी शेकडो वर्षापासून ते आजपर्यंत बघा, जी टीम,जी आर्मी एकत्र काम करत असते,तिचा Uniform एकच असतो,मग ते सैनिक असोत वा खेळाडू,कंपनीचे कर्मचारी असोत कि विद्यार्थी .
का बरं असं ?
याच्या पाठीमागे कुठलं असं मानसशास्त्र दडलंय ? तर ही फिलींग आहे आपण सर्वांसारखे असण्याची म्हणून तर कितीही मोठी कंपनी वा टीम असो त्यांचा Uniform एक असतो,आता बऱ्याच ठिकाणी हे होऊ लागलंय आणि ते झालंच पाहिजे !
त्या एका गोष्टीमुळे कामगारांचं मनोबल वाढतंय !

सर्व पॉईंटस एकाच लेखात देणं शक्य नाही म्हणून उर्वरित पॉईंटस पुढच्या भागात .

असेच बिझनेस स्ट्रेटर्जीबद्दल लेख वाचायचे असतील तर आuले फेसबूक पेज जरूर लाईक करा , किंवा उद्योग निती च्या फ्री व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा !

लिंक आणि संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

संपर्क :
ओमकेश मुंडे सर : 9146101663

शुभेच्छा .
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
Anand Park,Aundh.
Pune.
9518950764.

उद्योगनिती वेगवेगळ्या बिझनेससाठी प्रोफेशनल कोचींग करते .
अपॉईंटमेंटसाठी संपर्क .
ओमकेश मुंडे सर :9146101663 .

Previous Post Next Post

2 thoughts on “Business मध्ये टिम कशी हाताळायची ?ते वाचा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *