Business मध्ये वापरता येतील,अशा 5 मिलीटरी वॉर स्ट्रॅटर्जीज

Military stratergies in Business.

© निलेश काळे.

आजकाल प्रत्येक क्षेत्र हे युद्ध क्षेत्र बनलय ,, काल परवा घडलेल्या राजकारणातील घटना बघा नाहीतर , खेळाच्या मैदानावर होणाऱ्या मॅचेस , कोणीही या घटनांना सहजपणे घ्यायला तयारच नाहीये , स्ट्रॅटर्जीज प्लानींग, ऍक्शन एखादया युदधा सारख्या आखल्या जातात , काहीही करून जिंकायचय बस्स ! दुसरं काही माहितच नाही आणि विजयापेक्षा कमी काही पाहिजेच नाही ! अशी मानसिकताच बनलीये ..

मग उद्योगात military stratergies कशा वापरता येतील ते बघूया आपण आज, तसा हा लेख फार मोठ्ठा होऊ शकेल पण 5 स्ट्रॅटर्जीज बघूया आपण आज .

1) Know Your Enemy well :

अiजच नाही , तर अगदी रामायण महाभारत काळापासून आपले गुप्तहेर शत्रुच्या गोटात पाठवून , शत्रूचे मनसुबे जाणून घेत असतं त्याचप्रमाणे आज देखील प्रत्येक देशाची गुप्तहेर यंत्रणा, काम करत असते इतकं काय तर या गुप्तहेर यंत्रणांचं बजेट काय असेल हे देखील गुप्त असतं ..त्याचप्रमाणे आधुनीक बिझनेस च्या क्षेत्रात देखील हेरगिरी चालते , म्हणून तर टु व्हिलर कंपन्या नवीन मॉडेल टेस्ट करताना स्टिकर पूर्ण गाडीला स्टिकर लावून रोड टेस्ट करतात यातून हे कळतं कि , त्यांचं काय चाललय ? पुढचे प्लान काय आहेत ? काय डेवलपमेंट चालु आहे ? पुढची स्ट्रॅटर्जी काय असणारय ? नवीन प्रॉडक्ट कोणता काढतायत ? कोणत्या कंपन्या बरोबर JV करणार आहेत ?

बघा जो पर्यंत तुम्हाला स्वतःबद्दल जेवढी माहीती आहे , तो पर्यंत तुम्ही स्पर्धकाला हरवू शकत नाही .

(2) We can’t control what enemy plan but can improve our game :

ही बाब आपण आपल्या मार्केट मध्ये सुद्धा नेहमी बघतो लोकांच्या कृत्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही , पण स्वतःच्या Weakness मुळे मात्र आपण 100% हारू शकतो , *”आपली “Weakness* हीच सर्वात मोठ्ठी गोष्ट असते जी आपल्याला युद्धात आणि व्यवसायात हरवते .
काल परवा ,, अमेरिकेने मारलेला बगदादी असो वा ओसामा बिन लादेन यांच्या सगळ्या पॉलीसीज फुल्ल प्रुफ होत्या , मग कुठे हरले हे ?
weaknes ,, अमेरिकेने यांच्यातीलच कमजोर कड्या शोधल्या आणि हे युद्ध जिंकलं , ही युद्धाची एक महत्वपूर्ण खेळी आहे , तशीच खेळी आपण व्यवसायात करावी लागते दादा ! लोकांच्या स्ट्रेन्थ फक्त बघायच्या आणि काम आपल्या कमजोरीवर करायचं .
कारण या जगात कोणीही आपल्याला हरवू शकतं ते आपण स्वतःच आहोत , दुसऱ्या कोणाची ती औकातच नाही .
यासाठी उपाय काय ? तर ” सतत अभ्यास करत रहा , सतत नवनवीन प्रयोग करत रहा , त्यांच्या संपर्कात रहा जे आपल्याला पुढच्या स्टेप वर नेऊ शकतात ,
Ophrah Winfrey म्हणतात .

“if you are constantly learning , growing and developing ,, Then then best strategy of your enemy is to run after you ” .

आपण जर सतत शिकत , बदल करीत,प्रगती करतोय तर आपला स्पर्धक आपल्या पाठीमागे चलण्यातच धन्यता मानतो .

(3)Deceive the Enemy from entering your Territory

समोरच्याने आपल्यावर हमला चढवण्याअगोदरच आपण पहिला फटका दयायचा .
Atttttttttttack First ! ही स्ट्रॅटर्जी गुगलने वापरलीये बघा ,आता यांचा मुख्य व्यवसाय आहे सर्च इंजीन आणि युटयूब .
पण self driving Cars काढ , smartphone च काढ आणि अजून काही बाही प्रयोग करत असतं गुगल .
कशासाठी ?
हे इतर कंपन्यांना ( त्यांना जे उदया टक्कर देऊ शकतील असं वाटतात ) अप्रत्यक्षपणे धमकावत असतात कि , आमच्या सर्च इंजीनच्या मार्केट मध्ये येऊ नका नाही तर आम्ही तयारच आहोत .
जसं अमेरिका स्वतः अनेक युद्धात लढली पण स्वतःच्या भूभागावर त्यांनी कधीच युद्ध होऊ दिलं नाही … स्वतःच ठेवायचं झाकून आणि xxxxx असा हा प्रकार,खरं तर ही चेतावणी असते आणि ही स्ट्रॅटर्जी अनेक उद्योग वापरतात .

(4) if your enemy has capability of fighting on ground , fight in the Valley :

आपण या युद्धनितीला गनिमी कावा म्हणतो, छत्रपतींनी ही पद्धत वापरली त्याचप्रमाणे व्हिएतनाम ने पण अमेरिकेच्या विरूदध वापरली आणि विएततान चे गनिमी योद्धे गोरीला वारफेअर या स्ट्रॅटर्जी ने लढले आणि शेवटी अमेरिका या युद्धात हरलीच.
म्हणून तर बघा ना ! ज्या क्षेत्रात पाय रोवायला आणि कमाई करायला अनेक कंपन्याना कित्येक दशकं लागली त्याच क्षेत्रात नवीन स्टार्टअप्स नी थोडक्या दिवसात मोठठी कमाई करून नाव केले .

तसंच होतंय बघा ना मार्केटमध्ये मोठे मोठे ब्राण्डस नफा कमवू शकत नाहीत त्या ठिकाणी लहान सहान स्टार्ट अप्स पूर्ण मार्केट हलवून टाकतात कारण ???मोठ्या कंपन्या समोरासमोर च्या लढाईत यांना हरवू शकतात पण गनिमी कावा त्यांना भारी पडतो,आणि स्टार्ट अप्स त्यांच्या गनिमी काव्यामुळे जिंकतात

(5) Warfare is matter of life & death :

युद्ध हा प्रकार गंमत म्हणून खेळला जात नाही,तिथे जगणे किंवा मरणे हे दोनच पर्याय असतात म्हणूनच योदधे जिवाच्या आकांताने लढतात आणि जिंकतात,तिथे परतीचे दोर कापलेले असतात !
तसंच आपण जर परतीचे दोर कापले तरच व्यवसाय नीट नीटका करू शकू अन्यथा नाही जमला व्यवसाय करू मग नौकरी असा सेकंड option ठेऊन काम कराल तर कधीच यशस्वी व्यवसाय आपण उभारू शकणार नाही .
व्यवसाय सुद्धा Do or Die असा केला तरच खरंय अन्यथा सेकंड ऑप्शन असणे धोकादायकच !

या सगळ्या युद्धनिती आहेत !
ज्या आपण आपल्या व्यवसायात लावल्या तर ,,, स्पर्धक आपला बाल पण बांका करू शकत नाही .

असेच लेख वाचण्यासाठी आपले फेसबूक पेज लाईक करा .
लिंक खाली आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट
आनंदपार्क, औंध ,पुणे
9518950764

तुमच्या उद्योगाच्या वाढीसाठी मार्गदर्शन किंवा कोचिंग हवय? तर संपर्क करा,
श्री ओमकेश मुंडे सर .
9146101663

Previous Post Next Post

3 thoughts on “Business मध्ये वापरता येतील,अशा 5 मिलीटरी वॉर स्ट्रॅटर्जीज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *