D-Mart कडून रिटेलरने शिकली,पाहिजेत,अशी व्यापारी तत्वे.

21,999 Views

रिटेलर आहात तर मग या DMART कडून खूप काही शिकता येईल.

आपण छोटे व्यापारी बड्या मॉल्समूळे थोडं परेशान होतो, त्यांना नाव ठेवायला लागतो . हे अगदी स्वाभाविक आहे, कारण? बऱ्याच छोट्या किराणा ,जनरल ,इलेक्ट्रिकल इत्यादी व्यापारांचा ग्राहकवर्ग या मॉल कडे वळला आहे .

आता कायद्यानुसार आपण त्याला काहीही करू शकत नसलो, तरी यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही असतं ,आपण यांच्याकडून शिकून यांच्यासारखा व्यापार करायला लागलो ,तर आपला देखील नफा वाढेल आणि तोटा कमी होईल तेव्हा काही पॉईंटस यांचे कडून शिकू पॉईंटवर आपला फायदा होऊ शकतो

भारतामध्ये मॉल संस्कृती पाठीमागे अनेक लोकांचा हात असेल, परंतु खर्‍या अर्थाने सामान्य लोकांसाठी मॉल संस्कृतीने फायदा करून दिला, त्याचं श्रेय जातं डीमार्ट या सुपर मार्केट अध्यक्ष राधाकिशन दमानी यांना.

आज 39800 करोड रुपये व्हॅल्युएशन असणारी कंपनी उभा करून चालवणे हे एवढं सोप्प काम नाही.

राधाकिशन दमानी यांना भारताचे वॉरन बफेट असं म्हणलं जातं, मिडियापासुन दुर रहाणाऱ्या या बिजनेस किंगने,ज्या प्रकारे शेअर मार्केटमध्ये पैसा कमावला ,त्याप्रकारे डी मार्ट या रिटेल बिझनेसलादेखील त्यांनी त्याच अनुभवातून मोठं केलं.

अंबानीचे रिलायन्स, बियाणीचे बिग बझार, आणि आत्ता आलेले वॉलमार्ट यासारखे तगडे स्पर्धक असताना देखील, लो प्रोफाईल ठेऊन, ग्राहकांना सतत डिस्काऊंट देऊन ,त्यांनी डिमार्टला आज एक यशस्वी स्टार्ट अप बनवलंय.

आपण जर आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून काही शिकलो नाही तर, मग आपण प्रगती कशी करणार ? म्हणून आज बघूया रिटेलर बिजनेस मध्ये बोस म्हणवल्या जाणाऱ्या डीमार्ट कडून काही व्यापारी तत्त्व.

(1) Go Local :

डी मार्ट मध्ये आपल्याला जास्त करून लोकल व्यावसायिकांचे स्टॉक बघायला मिळतात, याचं महत्त्वाचं कारण आहे की ,डीमार्ट हा मध्यमवर्गीयांचा खरेदी करण्यासाठी ठिकाण आहे आणि मध्यमवर्गीय शक्यतो लोकल उत्पादकांना जास्त महत्त्व देतात, जसा ग्राहक तसा माल,

परत ,लोकल सप्लायरकडून पाहिजे तसा स्टॉक मिळतो, तसेच लोकल व्यावसायिकांकडून फास्ट डिलिव्हरी मिळते, लोकल उत्पादक ठेवणं हे एक महत्त्वाचं कारण आहे.

Go slow :

गेल्या सोळा वर्षांमध्ये डीमार्ट ने त्याच्या स्टोअर्सची संख्या ही मर्यादित ठेवली,आत्तापर्यंत डीमार्ट एकही स्टोअर हे नुकसान झाल्यामुळे बंद करावा लागलेला नाही.

आज पर्यंत त्यांची 176 स्टोअर्स अनेक राज्यांमध्ये व्यवस्थितपणे चालू आहेत

याच्या उलट बिग बाजार आणि रिलायन्स सारख्या कंपन्यांनी खूप वेगाने स्टोअर्सची संख्या वाढवली आणि आज आपण बघतो की त्यांची गत काय आहे ?

तेव्हा नवीन व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाची वाढ करत असताना, स्पीड मर्यादित ठेवली पाहिजे जेणेकरून जेणेकरून आपल्याला नफा-तोटा या बाबी नीट तपासता येतात.

Value your people :

मध्यंतरी घडलेल्या काही कामगार समस्या सोडल्या ,तर डीमार्ट हे आपल्या सप्लायर वेंडर आणि कामगार प्रति नरमाईची भूमिका घेतं.

माणसं जपणं आणि त्यांच्याबरोबर जास्त दिवस नातं टिकवून व्यवहार करत राहणं ही डीमार्टची पॉलिसी आहे, आपण देखील आपल्या व्यवसायामध्ये माणसांना फक्त ”वापरून फेकून न देता” त्यांच्याबरोबर जास्त काळ कसा व्यवहार करता येईल? हे बघितले पाहिजे.

No frills :

सुरुवातीला जे मॉल्स भारतामध्ये सुरू झाले त्यांच्या मध्ये जास्तीत जास्त लक्ष हे ताम झामवर खर्च करण्यावर दिले गेले,जास्त लाइटिंग, खूप जास्त स्टायलिश इंटेरियर वगैरे .

डी मार्टने या सगळ्या गोष्टींना फाटा दिला ,त्यांनी हे सगळे खर्च टाळले, ग्राहक येतोय तो रास्त भावात खरेदी करायला मग ते देण्यावरच भर दिला गेला, विनाकारणचा खर्च टाळला गेला, त्यामुळे ते आपल्या ग्राहकांना स्वस्त दरामध्ये वस्तू देऊ शकतात.

तुम्हाला कोणत्याही डी मार्ट मध्ये खूप जास्त लाइटिंग खूप जास्त तामझाम दिसणार नाही त्याचं कारण हेच आहे.

Avoid credit :
जो व्यावसायिक आपल्या सप्लायर कडून उधारीवर मालक येत नाही किंवा अधिक कमीत कमी वेळेमध्ये त्याचे बिल चला पोहोचते करतो त्याला एकदा स्वस्त दरामध्ये मला भेटतो आणि दुसरी गोष्ट त्याचं क्रेडिट राहतात डी मार्ट ची पॉलिसी हेच आहे डी मार्ट कधीही आपल्या सप्लायर्स पैसे राखून ठेवत नाही त्यामुळे त्यांना इतरांपेक्षा स्वस्त दरामध्ये वस्तू मिळतात आणि याचा फायदा ते त्यांच्या ग्राहकाला करून देतात यामुळेच कदाचित डी मार्ट मध्ये वस्तू मार्केट पेक्षा थोडा कमी रेटने मिळतात

Own land :

डि मार्टचे 90 टक्के स्टोअर्स हे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर उभारलेले आहेत.

याचा अर्थ असा की राधाकिशन दमाणी यांनी खूप दूरचा विचार केला होता.

भारतातल्या अनेक शहरांमध्ये त्यांनी ऐंशी च्या दशकात जागा घेऊन ठेवलेल्या होत्या ,भलेही ज्यावेळी त्या जागांची खरेदी झाली, त्यावेळी त्या जागा या शहराच्या बाहेर होत्या,परंतु आज जेव्हा डी मार्ट ची उभारणी केली जाते, त्यावेळेला त्या जागा शहराच्या मध्यभागी आलेल्या आहेत.

आता यामुळे त्यांचा किराया वाचतो.
जो अशा मॉल्सचा मोठा खर्च असतो.

त्यामुळे त्यांना याचा डायरेक्ट फायदा आपल्या ग्राहकांना देता येणं शक्य आहे, डिस्काऊंट देणं यामुळे पण शक्य होतं.

म्हणून उद्योजकांनी, घर, बंगला , गाडी घेण्याअगोदर अशा व्यावसायिक जागांमध्ये इन्वे स्ट करायला हवंय .

Employees Upskilled:

डी मार्ट मध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना सातत्यपूर्ण रीतीने ट्रेनिंग दिल्या जातं,आताही खूप ठिकाणी केला जात आहेत काय विशेष नाही, परंतु डी मार्ट सारख्या व्हॅल्यू मार्केटचे मध्ये हे प्रकर्षाने दिसून येतं, आता इथे कामाला लागलेला एक कर्मचारी त्याच्या स्किल थोड्या वाढ होऊन प्रमोट केला जातो, अशा रीतीने एम्प्लॉई बदलण्यापेक्षा त्या कर्मचाऱ्याच्या स्किल वाढवून त्यालाच वरच्या पोझिशन वर काम करायला देणार हे ,डीमार्टला परवडतं,

आणि विक्री देखील वाढते,
आपणही स्टाफ ट्रेनिंग ही बाब सिरियसली घेतली पाहिजे.

Moving towards green buildings :

डीमार्ट ही चेन जिथे हो होईल, त्या ठिकाणी पैसा वाचवते, त्यामुळे त्यांना ग्राहकांना डिस्काउंट द्यायला सोपे पडतं,आता तुम्ही म्हणाल की लाईट बिल असं येऊन येऊन किती येणार? परंतु डीमार्ट सारख्या मोठ्या मॉल्सचे बिल लाखोत जाते x 196 X 72 Cities मॉल्स = करोडो रूपये, म्हणून यांनी ग्रीन बिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, सोलार लावले , आता त्यांच्यासाठी ती बचत ही करोडो रुपयात जाते,

आज डीमार्टच्या अनेक मॉल्स व सोलार प्लेट लावलेले आहेत, त्यामुळे त्यांचं बरचसं लाईट बिल वाचतं आणि त्याचा उपयोग ते ग्राहकांना देऊ शकता.

वरचेवर ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना अस्तित्वात येते आहे, आपण देखील याचा फायदा घ्यायला हवा.

Stockings limited items :

अनेक रिटेलरकडे “न विकला गेलेला स्टॉक” , ही फार मोठी समस्या असते, अनेक वेळा आपला नफा त्यामध्ये अडकून पडतो.

अशा वेळेला, डीमार्टची एक पद्धत आपल्याला फार उपयोगी पडू शकते ,हे समजून घ्या कि डीमार्टचे जास्तीत जास्त सप्लायर हे लोकं आहेत ,त्यामुळे ते त्यांना ज्या वेळेला स्टॉप लागतो त्यावेळेस मागवतात, आणि जेवढा लागतो तेवढाच मागवतात, त्यामुळे त्यांचा जास्त स्टॉक सापडून राहत नाही, याला एक Lean management चे tool , ज्याला JIT (Just in time). म्हणतात, आता ही गोष्ट एखाद्या रिटेलरने शिकण्या योग्य आहे.

मॉल्स संस्कृती आता रुजत आहे,त्याचा विरोध करून त्यांच्यावर राग करत बसण्यापेक्षा त्यांच्या बिजनेस मॉडेलचा अभ्यास करणे आणि आपली सुधारणा घडवून आणणे , कधीही चांगलं .

शुभेच्छा
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क ,औंध,पुणे.
9518950764.

office :
ओमकेश मुंडे सर : 9146101663

Default image
Nilesh Kale
Articles: 84

7 Comments

 1. I need a job in dmart.. If u can plzz help me I stay at nallasopara East me Mumbai

 2. Very valu added information provided by nilesh sir thanks

 3. Very nice information, Thanks, sir

 4. Pl send me the all retail information

 5. I need more info
  Mala ajun janun ghyaivhe ahe

 6. Check you tube..dmart case studies..u ll get lot of information..👍
  Check you tube..dmart case studies..u ll get lot of information..👍

  Check you tube..dmart case studies..u ll get lot of information..👍

 7. Saving nothing but value for money. That’s What I think.Goog going Dmart
  Keep it up.

  ..

Leave a Reply to Sunil sankpalCancel Reply