D2C मॉडेलमध्ये काम करणाऱ्या या कंपन्या तुम्हाला माहितेयत का?जाणून घ्या यांची पद्धत

D2C is new normal

आपण बघीतलं असेल कि,OLA या कंपनीने अचानक इलेक्ट्रीक स्कूटरची अनाऊन्समेंट केली,ऍड केली, बुकिंग घेतली, आणि विना शोरूम,विना सर्विस सेंटर लाखभर गाड्यांची विक्री पण केली.
डायरेक्ट कंपनी ते ग्राहक D2C या बिजनेस मॉडेलनुसार याची विक्री झाली.

हे मॉडेल काय आहे?
ते कसं काम करतं ?आणि भारतातल्या टॉप D2C कंपन्या कोणत्या आहेत हे आपण बघूया .

*D2C Model* : हे अतिशय नवीन मॉडेल आहे,शतकानुशतके जे बिजनेस मॉडेल चालू आहे, ज्यात

सप्लायर >> मॅन्युफॅक्चरर >>होलसेलर >> डिस्ट्रीब्युटर >> रिटेलर >> ते ग्राहक अशी सप्लाय चेन काम करायची.

इथे इश्यूस, समोर यायचे,मोठी यंत्रणा उभी करायला लागायची, सर्विसचे इश्यू यायचे, शेवटी ग्राहकांना उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट चांगल्या किंमतीलाच मिळायचे.

पण D2C मॉडेल मध्ये, उत्पादक कंपनी आपले प्रॉडक्टस एखादया App किंवा इ कॉमर्स साईटवर लाँच करते,तिथेच विकायला ठेवते आणि त्याची जाहिरात करते .
ग्राहक तिथून बुकींग पेमेंट करून टाकतो,आणि ते प्रॉडक्ट डायरेक्ट कंपनी मधून आपल्या दारापर्यंत डिलवर होते .

आजकाल आणि इथून पुढे सुद्धा हेच मॉडेल चालणार आहे शेकडो वर्ष जुनं, डिस्ट्रीब्युटर /होलसेलर / रिटेलर / किंवा डिपार्टमेंटल स्टोअर हे मॉडेल जवळपास संपणारच आहे .

आज आपण बघू भारतातल्या काही D2C. कंपन्या

📗 Lucious :
नॉनवेज रेडी टू कुक प्रॉडक्ट जसे फिश/चिकन/ किंवा मीट असे प्रॉडक्टस, डायरेक्ट ग्राहकांना सप्लाय करणारे हे स्टार्टअप आहे.
या प्रकारांना कोल्ड स्टोर न करता फ्रेश असतानाच ग्राहकांना पोचवणे असं सिंपल मॉडेल आहे.
Vivek Gupta आणि Abhay Hanjura यांनी बंगलोर मध्ये सुरु केलेलं हे स्टार्टअप आज युनिकॉर्न आहे आणि भारतातल्या 8 शहरांमध्ये सेवा देतंय .

📕 Pepperfry : 2011 मध्ये मुंबईत अंबरीश मुर्ती आणि आशिष शाह यांनी सुरुवात केलेलं हे स्टार्ट अप औनलाइन फर्निचर विकतं .

DTDC, FedEx, या डिलीवरी सर्विसेसच्या माध्यमातून ते डायरेक्ट डिलीवर होतं .

📘 Boat :

समीर मेहता आणि अमन गुप्ता यांनी 2016 गुडगाव मध्ये सुरु केलेली ही कंपनी हाय क्वालिटी हेडफोन/ब्लुटुथ डिवायसेस आणि स्पिकर्स वगैरे मध्ये काम करते .

आजही यांचे प्रौडक्ट ऑनलाईनच मिळतात, आणि अगदी कमी वेळेत यांनी तुफान नाव कमावलंय.

📒 MYGLAMM : याची जाहिरात तुम्ही नेहमी टिव्हीवर बघत असाल.
2015 मध्ये मुंबईत दर्पन संघवी आणि प्रियंका गिल यांनी सुरुवात केलेला कॉस्मेटिक्स ब्रान्ड अतिशय यशस्वी झालाय
103 million इतकी ब्रॅन्ड वॅल्यु असणारी ही कंपनी आज जुन्या ब्रॅन्डसला जबरदस्त टक्कर देते .

📙Mama Earth : लहान मुलांसाठी प्रॉडक्ट बनवणे हे इतकं सोपं नसतं, कारण? पालक नवीन ब्रान्डस वर भरवसा ठेवत नाहीत.

परंतु गुडगाव मध्ये 2016 मध्ये या स्टार्ट अपने या क्षेत्रात मोठे नाव कमावलंय.

73.3 million वॅल्युएशन असणारी ही कंपनी गझल अलघ आणि वरुण अलघ यांनी सुरुवात केलीये .

यांच्या ऑनलाईन ऍड मुळे आज ही कंपनी यशस्वी बनलीये .

📕 WaKefit ; गादी/उशा/मॅट्रेसेस / अशा क्षेत्रात यांना काही उणीव दिसली आणि अनिकेत गर्ग यांनी चैतन्य रामलिंगा यांच्या बरोबर मिळून ही D2C कंपनी सुरु केलीये .

परंतु यांनी भल्या भल्या जुन्या कंपन्यांना झटका दिलाय .

तर नेमकं होतंय काय ? तर ग्राहकांना योग्य दरात सेवा देण्याच्या आणि लांबलचक होणारी सेल्स प्रोसेस कमी करण्याचा होतेय.

ही बाब मार्केटमध्ये नवीन उतरणाऱ्यांसाठी फार योग्य आहे.
कारण ? त्यांना या सप्लाय चेनच्या भानगडीत पडायची गरज नाही.
टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन डायरेक्ट ग्राहकांपर्यंत आपण आपला प्रॉडक्ट पोहचवू शकतो.

तिथे हे मॉडेल पारंपारिक दुकानदार/ रिटेलर्स /एजन्सीज यांच्यासाठी हा एक रेड सिग्नल आहे.

त्यांनी देखील आपल्या ग्राहकांना जास्त चांगली सेवा आणि रास्त दर या बाबी सांभाळाव्या नाहीतर मार्केटमध्ये होणारा हा बदल धोकादायक होऊ शकतो .

तेव्हा अभ्यासा आणि त्यानुसार बदल करा .

शुभेच्छा.
© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.
Office 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “D2C मॉडेलमध्ये काम करणाऱ्या या कंपन्या तुम्हाला माहितेयत का?जाणून घ्या यांची पद्धत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *