“Diamond महाग का विकतात माहितीये? वाचा हिऱ्याच्या व्यापारामागची भन्नाट स्टोरी

“Diamond” महाग नाही,तो महाग केला जातो, वाचा कोण आहे याच्या जगभरातील व्यापारा मागे?

आज एका अशा उत्पादनाविषयी बघूया, जे मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे, पण दुर्मिळ असल्याचं भासवलं जातं,

विशेष म्हणजे शंभर वर्षापासून पूर्ण जगभरात एकच कंपनी हे सगळं प्लानिंग ने करते आहे, यात या कंपनीला मोठं यश मिळालं, तिने जगभरातील देशांबरोबर करार करून स्वतःचे साम्राज्य निर्माण केलं आणि शेवटी ते साम्राज्य सुद्धा लयाला गेलं याची स्टोरी आहे.

📌 जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे अनमोल रत्ने मिळतात आणि शेकडो वर्षापासून ती दागिन्यांमध्ये वापरली जातात ,त्याच्यामध्ये पाचू /माणिक/ मोती /रुबी / यासारख्या रत्नांचा समावेश आहे, परंतु एक प्रश्न कायम राहतो, तो म्हणजे मग “हिरा” एवढा प्रसिद्ध कसा झाला ?

तर आज आपण याच हिऱ्याच्या मार्केटिंग आणि विक्रीची गोष्ट बघुया !

हा काळ आहे 1866 ,दक्षिण अफ्रीकेतल्या काही भागात चमकणारे खडे सापडायला सुरुवात झाली , ते खडे मौल्यवान असल्याने बघता बघता ही बातमी पूर्ण एरियात पसरली आणि आठ ते दहा हजार लोक हातामध्ये कुदळ-फावडे कोरे टोपले घेऊन आपला आपला हिस्सा मिळवण्यासाठी तिथे येऊ लागले,

याला डायमंड Rush म्हणतात

असाच प्रकार , चालु राहिला असता तर गोंधळच गोंधळ उडाला असता, म्हणून तिथल्या सरकारने खाण कंपन्या स्थापन करायचं ठरवलं आणि 1872 मध्ये पाच वेगवेगळ्या कंपन्यांना खाणकाम करायचं लायसन्स दिला गेलं.

1874 मध्येCecil rohdeया व्यक्तीने या खाणी मध्ये वापरता येतील असे वाफेवर चालणारे इंजिन आणले आणि किंबरले नावाच्या खाणीमध्ये त्याने त्याचा विक्री केली .

या माणसाच्या इंजिन मुळे त्या खाणी मधून उत्पादन घेणं सोप्प झालं आणि याच्या इंजिनचा खप मात्र वाढला ,
याने या नफ्यातून त्याने डी बियर्स कंपनी चालु केली, ज्या दोन भावंडांचा शेत त्याने विकत घेतलं त्या भावंडांचं आडनाव असल्यामुळे या कंपनीचं नाव सुद्धा असच ठेवल.

अशाप्रकारे 1880 डि बियर्स कंपनीची स्थापना झाली

आता ज्याच्याकडे स्वतःची खाण होती ,स्वतःची कंपनी होती आणि तिथे वापरल्या जाणाऱ्या वाफेवरचे इंजिन होते , म्हणजे एकूणच याच्याकडे बऱ्यापैकी पैसा होता यांनी या पैशाच्या जोरावर, त्याने इतर खाणमालकाच्या खाणी विकत घेतल्या , या वेळेपासूनची या कंपनीने हा बिझनेस कंट्रोल करायला केली.

पुढे जाऊन Cecil Rhodes ने London च्या “The Diamond Company “, आणि इजरायलच्या द सिंडीकेट बरोबर बिजनेस ऍग्रीमेंट केलं , कारण ??? ” सर्वांचा उद्देश एकच होता ! Diamond मधुन पैसा कमावने ,

अशा प्रकारे,जगातला 90% बिझनेस आपल्या Under आणला आणि सुरू झालं एक स्ट्रेटर्जीक प्लानिंग हिरे विक्रीचं .

📌 पण जवळच एक नवीन खाण सापडली ही खाण Premier mine म्हणुन प्रसिध्द आहे, याच खाणीत जगातला सर्वात मोठा हिरा 1905 मध्ये सापडला , पण प्रॉब्लेम असा, कि या खाणीचा मालक डिबियर्स च्या Cartel मध्ये सामिल व्हायला तयार नव्हता , कच्चे हिरे तो Bernard Oppenheimer आणि Ernest Ophneheir या दोन एजंटाना विकायचा, हा प्रकार डिबियर्सच्या व्यवसायाला धोका होता , इकडे London Cartel चा एजंट Ernest Oppenheimer राजकारणात उतरला त्या गावचा महापौर बनला , पण 1910 पर्यंत त्याला कॉमन सेन्सने, De beers ची पॉलिसी लक्षात आली कि , “हिरे भाजीपाल्यासारखे विकून चालणार नाही,त्याची VaIue च रहाणार नाही ,
त्यामुळे ” त्यांनी हिऱ्यांचं शॉर्टेज करणे चालु केलं ” !

पण पहिल्या महायुद्धामुळे, प्रिमियर खाण,डि बियर्स मध्ये सामिल झाली,आणि 1929 Ernest Oppenheimer … एकूणच डि- बियर्स ग्रुपचे चेअरमन बनले !आणि
“Oppenheimer Empire” इथून पुढे चालु झाले .

📌 इथून पुढे जगात जिथे कुठेही कच्चे हिरे सापडले , त्या प्रत्येक ठिकाणी डि- बियर्सचे ऑफीसर गेले , त्यांनी डायरेक्ट त्या त्या देशांच्या राजकारण्याबरोबर अॅग्रीमेंट्स केले , जर्मनी/ पाश्चिम आफ्रिकेत / रशियात जिथे कुठे हिरे भेटले त्या सगळ्या ठिकाणच्या कच्च्या हिऱ्यांची प्रोसेसिंग / पॉलिशिंग / कटींग / कैरेटिंग सगळं सगळं डि बियर्सच्या हातात आलं, इतकं जास्त कि, या कंपनीने अमेरिकेन सरकारला सुद्धा याचा अॅक्सेस दिला नाही .

📌 1957 मध्ये Ernest Oppenheimer यांचा मृत्यु झाला आणि डि- बियर्सचा आणि त्यांनी अजून एक कंपनी Angloचं कंट्रोल त्यांचा मुलगा Harry Oppenheimer कडे आला आणि त्यांनी 1960 _1970 दरम्यान हॉलीवूड कलाकरांचा वापर करून जपानपासून ,ऑस्ट्रेलिया , भारत , पुर्ण मध्य पुर्वेपर्यंत विस्तार केला !

📌 Stockpiling:

जेंव्हा मार्केट मध्ये वस्तूचे रेट्स ढासळतात , त्यावेळी हुशार व्यापारी त्यांचा स्टॉक करतात, आणि नंतर मार्केट स्थिर झालं कि त्या मालाला बाहेर आणलं जातं , या फॉर्मुल्याला Stockpiling म्हणतात, जे यांनी मोठया प्रमाणावर केलं .

📌Supply demand balance:

आपण या दिवसांमध्ये बघीतलय कि , मालाचं शौर्टेज झालं कि , रेट्स वाढतात , आणि जास्त माल आला कि ,रेट ढासळतात,याला demand_Supply बॅलन्स करणे म्हणतात .

Brilliant ad campain

1947 मध्ये डि- बियर्स साठी जाहिरात लिहिणाऱ्या एका कॉपीराईटरने….

हिरा…. सदा के लिए !

हे शब्द लिहिले आणि या शब्दांनी यांचं भविष्य बदललं !

📌 New trends :

De-beers ने जाणीवपूर्वक , हिऱ्याला प्रेम, लग्न, आकर्षण याच्याशी जोडलं !
इतकं सोशल प्रेशर वाढलं कि ,जर तुम्ही हिऱ्याची अंगठी जोडीदाराला दिली नाही, तर तुम्ही खरं प्रेमच करत नाही , अशी समाज मानसिकता तयार करण्यात आली.

यामुळे डि- बियर्सचे हिरे संपूर्ण जगात यांच्याच मर्जीच्या रेट्सने विकू लागले.

📌1977 मध्ये इजरायल मध्ये संकट आलं आणि त्यांनी स्वतःच कच्चे हिरे मार्केटला विकायला सुरुवात केली !आणि डि बियर्स च्या साम्राज्याला सुरुंग लागला.

📌 Blood diamond :
आफ्रिकेत हिरे व्यापारी ड्रग माफियांना पैसा देतात , खून पडतात , हत्यारांची खरेदी होते हे जगाला माहीत झालं आणि हिरे व्यापार बदनाम झाला .

📌 1992 पासून रशिया आणि अँगोलन देशानी कच्चे हिरे स्वस्तात मार्केटला सोडले, अमेरिकेत मोनोपोली करण्याचा प्रयत्न केला म्हणून केसेस पडल्या, इतर देशांकडून खरेदी केलेल्या कच्च्या हिऱ्यांचा स्टॉक वाढत गेला आणि शेवटी Nov 2011 मध्ये
Oppenheimer फॅमिली ने आपला डि- बियर्स मधला 40% वाटा पूर्णपणे Anglo American Plc. या कंपनीला विकून टाकला .

📌 आज 2020 मध्ये
De-beers चे दोन भागीदार आहेत ,
Anglo American Plc= 85%
Govt.of Botswana = 15%

📌 आज या कंपनीने आपली मार्केटिंग आणि विक्री करण्याची पॉलिसी थोडी बदलली असली तरी लक्षात घ्या !

📌 “Diamonds are forever” म्हणून या कंपनीने आपल्या प्रॉडक्ट भोवती एक वलय निर्माण केलं आणि त्याचं कृत्रीम शौर्टेज करून,अत्यंत महाग विकलं, पुर्ण शंभर वर्ष.

📌 हे सगळं आजही चालु आहे !

📌 त्यासाठी फक्त भन्नाट मार्केटिंग आणि Sale करता यायला पाहिजे !

📌 उद्योगनितीच्या लेखांमधून याचीच माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा !
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क, औंध,पुणे .
9518950764

बिझनेस कन्सलटिंग हवीये ? कॉल करा.
श्री ओमकेश मुंडे सर :
9146101663

Previous Post Next Post

One thought on ““Diamond महाग का विकतात माहितीये? वाचा हिऱ्याच्या व्यापारामागची भन्नाट स्टोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *