Ego : याचे इतके प्रकार आहेत जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत .

#Business_Consulting :

#Ego_जे_आपल्याला_पुढे_जाऊ_देत_नाहीत.

©निलेश काळे .

बहुतेक वेळा माणसाच्या यशस्वी न होण्या पाठीमागे आपली स्वतःची विचारसरणी असते , जी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही.
म्हणजे ? मी कसा बरोबर आहे? आणि मला खरोखर याचा दोष देऊ नका असं वाटायला लागतं !

वेगवेगळ्या भावनांची निगडीत असणारे इगोचे वेगवेगळे प्रकार आपण खालील प्रमाणे बघू शकतो.

📌 (1 ) #Blame_Ego:

या प्रकारचा इगो असणारा माणूस आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडायला नेहमीच तयार बसलेला असतो.
अर्थव्यवस्थाच चांगली नाही.
सध्या मार्केट डाऊन आहे
माझ्याकडं भांडवल नाही
माझ्याकडे एवढे शिक्षण नाही
सरकार वाईट आहे
घरचे सपोर्ट करत नाहीत
आणि अजून अशा लाखो गोष्टी निघतील ,ज्याच्यावर हे लोक दोष द्यायला टपलेले असतात.

असं ज्यावेळी वाटायला लागेल तेव्हा समजून घ्या की आपल्या मध्ये इतरांना दोष देण्याचा इगो तयार होत आहे.

याला पटकन घालवावे लागतंय ! नाहीतर हा आपल्याला घालवून बसतो !

****************************”

📌 (2) #Know_it_all_Ego:

बऱ्याच वेळेला आपल्याला “लगता है कि आपुन हीच भगवान है” , या प्रकारच्या मनस्थिती मध्ये मनुष्य इतर कोणाचाही ऐकून घ्यायला तयारच होत नाही .

अशांच्या लेखी,
मला सगळं कळतं !
मला कोणालाही काहीही विचारायची गरज नाही ! असा भाव तयार होतो ! आणि या एका इगो मुळे लोक खूप मागे राहतात.

आज पर्यंत माणसाने जेवढी काहीही प्रगती केलेली आहे, ती एकमेकांना विचारून /एकमेकांच्या सल्ल्याने / आणि एक-दुसर्‍याचा अनुभव बघूनच केलेली आहे .

एकटा माणूस काहीही करू शकत नाही हे शाश्वत सत्य आहे.

***************************

📌(3) #Fearful_Ego:

एखाद्या गोष्टीची विनाकारण भीती वाटणे , मग ती गोष्ट माझं काय चुकलं तर काय होईल ?
एखादी गोष्ट गडबड झाली तर काय होईल?
किंवा मला खूप जास्त नुकसान झालं तर कसं होईल? या स्वरूपाची असते .

अशी भिती माणसाच्या मनात असताना सुद्धा अनेक वेळेला पाऊल पुढे टाकू देत नाही.

म्हणून जेव्हा कधी डोक्‍यामध्ये असे भितीचे विचार येतील, तेव्हा थोडा वेळ शांत राहून विचार करा, भीती ही आवश्यक गोष्ट आहे परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, त्याचा दुष्परिणाम होतो . हे सगळ्यांनाच माहीत आहे, तसं एखाद्या गोष्टीला किती महत्व दयायचं हे आपण ठरवून त्याच्यावर मात केली पाहिजे.

*****************************
📌(4) #Comfort_zone_ego:

याच्या सारखं वाईट दुसरं काहीच नाही , मला सगळं जागेवर मिळत आहे,
आहे त्या गोष्टीमध्ये मी सुखी आहे. मला एवढ्या मध्येच समाधान मिळतंय.

अशाप्रकारे माणूस एकदा जर स्थिरावला, आणि त्याच्यातच सुख मानू लागू लागला तर याला माणूस कम्फर्ट झोनमध्ये गेलाय असं समजावं.

असा इगो असणारा माणूस आपल्या परिस्थितीचे समर्थन करायला वेगवेगळे युक्तीवाद करतो आणि हीच युक्तिवाद त्याला मोठं यश मिळवू देत नाहीत.

*****************************

📌 (5) #Judgemental_Ego ;

बऱ्याच वेळा अपयशी माणूस हा इतर लोकान बद्दलची आपली मतं फारच ठामपणे मांडत असतो,

एखाद्याने नवीन गाडी घेतली .
कोणी मोठं घर बांधलं किंवा फार मोठे यश मिळवलं, तर तो त्याच्या मध्ये काहीतरी उणिवा काढायचा प्रयत्न करतो , म्हणजे एकंदरीतच काय तर त्याला मेहनत करून यश मिळवू मिळालं नसणार त्याने कुठेतरी काहीतरी चिटिंग केली असणार / समोरच्याला लॉटरी लागली असणार/ किंवा त्याने कुणाला तरी फसवलं असणार , तेव्हाच असं यश मिळू शकतं , नाही तर मला पण असंच यश मिळालं असतं का स्वतःची भलावण करणे इतरांबद्दल मत बनवणे याला जजमेंटल इगो असं म्हणलं जातं

***************************

📌 (6) #Excuses_Ego :

आपल्याला एखादी गोष्ट का जमली नाही याच्यासाठी कारणं सांगणे याला एक्सक्युजेस असं म्हटलं जातं.

कार्पोरेट जगामध्ये तर हा प्रकार अनेक वेळा घडतो, त्यामुळे तिथे अशी कारणं सांगणारी माणसं बिलकुल टिकू शकत नाहीत.

याला आपण “व्यवस्थित प्लान केलेला खोटारडेपणा” असं म्हणू शकतो.

लहानपणापासून जर एखाद्याला कारण सांगायची सवय लागली त्यावेळी ते कदाचित चालू शकतं , पण पुढे मोठेपणी पण ही सवय फार नुकसान दायक असते.

बाकी काहीही झालं तरी मी माझं काम पूर्ण करणार ,अशी प्रतिज्ञा करुन काम पूर्ण करणारी माणसं क्वचितच अपयशी ठरतात, पण ज्या माणसाला एकदा का कारण सांगायची सवय लागली तर तो आयुष्यभर फक्त कारण सांगत राहतो.

****************************

📌 (7) #Pleople_pleasing_ego

आपण या जगामध्ये प्रत्येकाला खुश करण्यासाठी जन्म घेतलेला नाहीये.

पण अशी कित्येक माणसं असतात त्याला प्रत्येक भेटणाऱ्या माणसाला खूश करायचं असतं .

एक वेळ ते सगळ्या गोष्टी स्वतःवर ओढवून घेतील ,पण समोरच्याला दुखावत नाहीत.

अशा प्रकारचा विचार दरवेळी चांगला नसतो ,व्यवसायाच्या क्षेत्रांमध्ये तर एकदा आपण स्वतःला सगळ्यात अगोदर ठेवावं लागतं ,म्हणून लोकांना खूश करण्याची मानसिकता / प्रत्येकाला खुश करण्याची मानसिकता व्यवसायिक दृष्टीने एक दोष आहे.

आणि तो आपण दूर केला पाहिजे.

*****************************

📌 (8) #justification_Ego :

काही लोकं स्पष्टीकरण देण्यामध्ये फार तरबेज असतात.

आपण त्याना प्रश्न विचारला की ,
तुम्ही ते काम का केलं नाही? किंवा तुम्हाला ते काम का जमलं नाही?

तर यांच्याकडे अशा प्रकारची स्पष्टीकरणे तयार असतात की ज्यांची काट आपण सहजासहजी देऊ शकत नाहीत.

एक वेळ झोपलेल्या माणसाला जागं करता येणे शक्य आहे, परंतु ज्यांनी झोपेचे सोंग घेतले त्याला जागा करता येणे अवघड असतं, अशा अर्थाची एक मनातल्या मराठीत प्रसिद्ध आहे ती म्हण स्‍पष्‍टीकरण द्यायला तरबेज असणाऱ्या बद्दल झाला आहे अशांना परफेक्ट लागू पडते

*****************************

📌 (9) #Shy_Ego:

बऱ्याच लोकांना स्वतःबद्दल असं म्हणायचा असतं ,की मी तर फार अबोल आहे किंवा मला इतर लोकांमध्ये मिळून मिसळून वागण्याची सवय नाही ,मग मी कसा यशस्वी होऊ शकतो ? असं स्वतःचंच कौतुक करून घेणे हा सुद्धा एक प्रकारचा इगो आहे.

आपण फार अंतर्मुख आहोत म्हणजे काय ? तर आपल्याला यश मिळवायची गरज नाहीये असं आहे का? बघा हे असलं अंतर्मुख बिंतर्मुख काहीही नसतं .

जेव्हा बुडाला आग लागते त्या वेळेला भलेभले मार्केटमध्ये पळायला चालू करतात ,त्यामुळे जर असं वाटत असेल तर भ्रम तात्काळ दूर करा.

*****************************

📌 (10) #What_people_will_think?

या अखिल विश्व मध्ये प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं आहे,इथे प्रत्येकजण स्वतःचं अगोदर बघतोय, मग बऱ्याच जणांना असं का वाटतंय की? सगळे आपल्याकडेच बघतय?

बघा इथे दुसऱ्याबद्दल विचार करायला कोणाला वेळ आहे ?आणि कोण तुमची उणीदुणी काढत बसणार आहे? पण मी काही केलं तर मला जग काय म्हणेल? आणि त्याच्यामुळे मी काही हालचाल करणार नाही. असा विचार करणे त्याच्यासारखीच दुर्दैवी गोष्ट कोणती नाही.

त्यामुळे जगाचा विचार करणं सोडून द्या , असा विचार डोक्यात आला की एकदा थंड पाण्याने अंघोळ करा आणि कामाला लागा .

कोणाला तुमच्या वाचून काहीही पडलेलं नाही

******************************

📌 (11) #Do_it_yourself_Ego:

ही गोष्ट तर अनेकांच्या लक्षात सुद्धा येत नाही , पण तिथे त्यांना असं वाटतं मी जे काय मी करतोय? ते योग्यच करू शकतो किंवा या जगामध्ये देवाने फक्त मला एकट्याला परफेक्ट बनवून पाठवलय म्हणून मी एकटाच सगळं करणार इतर कोणाला काही विचारणार नाही किंवा इतर कोणाची मदत घेणार नाही.

असे लोक एकटेच जगतात आणि एकटेच मरतात, त्याला स्वाभिमान नाही याला ताठा म्हणता येतं आणि अशा ताठा असणारे माणसं एक तर आत्महत्या करतात किंवा कुठेतरी खितपत पडून मरून जातात .

*************************”***

माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याला इतरांची गरज लागते , हे आपल्याला इयत्ता पहिली मध्ये शिकवले जातं , पण पुढे जाऊन आपण का विसरतो? हे काही लक्षात येत नाही.

अशा प्रकारचे वेगवेगळे अभिमान आपल्या डोक्यात / आपल्या मनात / आपल्या हृदयामध्ये भरले गेले की माणूस चोकअप आणि चौकअप झालेला माणूस मोकळेपणाने श्वास घेऊन यशस्वी होऊ शकत नाही, त्याला वेंटिलेटर लावावे लागते !

आपल्या आयुष्याला व्हेंटिलेटर लावून घ्यायचं नसेल तर वरील इगो आपल्याजवळ सुद्धा येऊ देऊ नका,

जरी थोडेबहुत इगो जमा झाले असतील, तर त्यांना हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करूया,

ज्याप्रमाणे कोणताच मनुष्य परफेक्ट नसतो ,त्याप्रमाणे प्रत्येकच मनुष्य हा गर्विष्ठ देखील नसतो, पण काळाच्या ओघामध्ये /समाजाचे वेगवेगळे संस्कार घडल्यामुळे/ आपल्यामध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात .

पण ते आपण जाणीवपूर्वक दूर केले पाहिजत, पण एकदा का हे दोष कमी झाले , कि आपल्याला समोरचा रस्ता स्वच्छ दिसायला लागतो आणि सहज दिसणार्‍या मोकळ्या रस्त्यावरून गाडी स्पीडने जाऊ शकते , यालाच यश म्हणतात.

तेव्हा असे दोष दूर ठेवा आणि भन्नाट यश मिळवा.

शुभेच्छा
©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सल्टंट,
5th floor, विघ्नहर चेंबर्स,
नळस्टॉप, अभिनव चौक,
पुणे .
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *