Emirates Airlines ने इतकी रिस्की मार्केटिंग का केली असेल बरं ?

#Business

Eminates Airlines ने आपली एअर होस्टेस,बुर्ज खलिफाच्या टॉपवर का चढवली असेल बरं?

सध्या, युट्युब वर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय,ज्यात असं दिसतं कि, Emirates Airlines ची होस्टेस, जगातल्या सर्वात उंच बिल्डींगच्यावर उभी राहून, fly Emirates असे कार्ड दाखवते.

आता हे काम सोप्पंय का ? दहा पाच मजल्यावरून जर आपण जमिनीकडे बघीतलं तर, आपले डोळे गरगरा फिरतात, तिथे ही बाई जमिनीपासून 842 मीटर हवेत,उभी राहून आपल्या कंपनीची जाहिरात करतेय.

तुम्ही जर ती जाहिरात युट्युबला बघितली तर तुमच्या लक्षात येईल, त्यासाठी युट्युब ला टाईप करा,

Emirates Burj Khalifa viral Ad.

आता आपण हे बघू की,मार्केटिंग करण्याचे एवढे मोठे पर्याय उपलब्ध असताना, एखादया एअरलाईन्स ने इतकी रिस्क घेऊन अशी मार्केटिंग करण्याची गरज काय आहे ?

तर आता आपण या पाठीमागची भूमिका समजावून घेऊ.

मागील दिड वर्षापासून आंतराष्ट्रीय प्रवासावर बंदी होती, विमानं जमिनीवरच होती, पैसा येणे बंद होते, मग जेंव्हा आता थोडे थोडे निर्बंध शिथिल व्हायलेत तेंव्हा तीव्र स्पर्धा सुरू झाली.

मग काहीतरी असं करणे गरजेचे होते,ज्यामुळे चर्चा जास्त होईल, जोरदार मार्केटिंग होईल,

साधारण मार्केटिंग केली असती तर एवढी चर्चा झाली नसती, म्हणून Emirates ने अशी हटके आयडिया निवडली,जी स्वस्त पण होती आणि भन्नाट सुद्धा.

Redbull ने पाठीमागे अशीच जाहिरात केली होती,त्यात एका डायवर ने थेट अंतराळातून उडी मारली होती.

2001 साली Pizza Hut ने अंतराळात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी रॉकेट पाठवून पिझ्झा डिलीवरी केली होती.

हे असे वेगळे प्रकार केले की, तुफान जाहिरातबाजी होते,भरपूर प्रसिद्धी मिळते, या प्रकाराला मार्केटिंगच्या भाषेत Dramatic Demonstration म्हणतात.

आता विचार करत असाल कि, एखादी एअरहोस्टेस इतक्या उंचीवर अगदी सहजपणे असे स्टंट करू शकते का?तर …. नाही.

ही बाब सामान्य माणसाच्या आवाक्यातली नाही, या ऍड कॅम्पेनसाठी, Nicole Smith Ludvik यांची निवड केली गेली,त्या एक प्रोफेशनल स्काय डायवर इंस्ट्रक्टर आहेत,त्यांच्यासाठी हे काम सोपं होतं कारण स्कायडायवर लोकांना उंचीवरून उडी मारायची सवय असते.

त्यांना Emirates च्या Air Hostess चा गणवेश घालुन,त्यांच्याकडून ही जाहिरात करवून घेतली गेली.

एकंदरीतच काय ?तर Emirates Airlines ला जे साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केले.

आपण देखील आता कुठे या, Lockdown मधून बाहेर पडतोय, जिथे Airlines सारख्या बीग बजेट कंपन्यांना मार्केटिंग शिवाय कस्टमर मिळत नाही, तिथे आपल्याला सुद्धा सहजपणे कसा मिळेल बरं ??

तेंव्हा इतक्या Extreme Level ला जाऊन नसेना का? पण काही ना काहीतरी मार्केटिंगचे प्रयत्न चालुच ठेवा !

त्याशिवाय ग्राहक नाही येणार !

शुभेच्छा !
© निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स .
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *