Facebook या कारणामुळे स्वतःच नाव बदलण्याच्या तयारीत आहे .

2,115 Views

Facebook या कारणामुळे आपलं बदलणार आहे .

काल परवापासून अशी बातमी सोशल मीडियावर फिरते आहे,की फेसबूक या कंपनीचे ओनर,मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे नाव बदलण्याच्या तयारीत आहेत.

याची ऑफिशियल घोषणा 28 ऑक्टोबरला फेसबुकच्या जनरल मिटिंगमध्ये होऊ शकते अशी शक्यता आहे.

जे नाव जगभर प्रसिद्ध झालेलं आहे, अशा कंपनीचं नाव बदलण्या मागे काय कारण असू शकतं? याचा कधी विचार केलाय का तुम्ही.

आज सोशल मीडियाच्या क्षेत्रांमध्ये फेसबुक ही एक प्रभावशाली कंपनी आहे, दुसरं कोणतही सोशल मीडिया ॲप हे फेसबुक इतकं प्रसिद्ध नाही,

त्यामुळे ज्या वेळेला मार्क झुकरबर्ग ने ही घोषणा केली त्यावेळेला अनेकांच्या भुवया उंचावल्या,,,,

तर जाणून घेऊया आज या गोष्टीमागे नेमकं दडलंय काय?

📘Conflict : गेल्या काही दिवसांमध्ये असं,अनेक वेळेला घडलंय,की मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेच्या सिनेटने त्यांच्यासमोर उपस्थित राहायला बोलावलेला आहे, कोर्टात केसेस पडल्यात,अनेकवेळा मोनोपोली केल्याचा फेसबुकवर आरोप देखील झालेला आहे,

फेसबुक आपल्या स्पर्धकांना,एकतर विकत घेतले किंवा संपवतं, असा आरोप फेसबुकवर असल्याने, त्या बॅड इमेज मधून बाहेर पडण्यासाठी हा एक चान्स म्हणुन ते याकडे बघु शकतात.

📕 Parent company need :

ज्या वेळेला एखादी कंपनी दुसऱ्या ब्रांडला विकत घ्यायला लागते आणि त्याचं अस्तित्व देखील,ती तशीच ठेवते (जसं What’s app आणि instagram या आजही स्वतंत्र अस्तीत्व असणाऱ्या कंपन्या आहेत), त्यावेळेला अशा अनेक ब्रँडला सांभाळणारी एक होल्डिंग कंपनी असावी लागते.

उदा. Alphabet.in ही गुगलची पॅरेण्ट कंपनी आहे,अल्फाबेटच्या छायेखाली गुगल आणि त्यांचे इतर वेगवेगळे छोटे छोटे ब्रँड्स येतात,इथे अल्फाबेट ही होल्डींग कंपनी झाली आणि या पॅरेंट कंपनीच्या अस्तित्वामुळे गुगलवर कधीही मोनोपॉली केल्याचा आरोप झाला नाही,जरी झाला असला, तरीही तो इतका प्रभावी ठरला नाही.

डिमार्ट हा एक ब्रान्ड आहे,परंतु त्यांची होल्डींग कंपनी,ही Avenue supermarket Ltd.(ASL) ही आहे.

📙 Metaverse:

फेसबुक ही कंपनी आता सोशल मीडियाच्या पुढे जाऊन वेगळं काही करण्याचा तयारीत आहे,मध्यंतरी फेसबुकने ” RayBan” या जगप्रसिद्ध गॉगल ब्रांडबरोबर करार केलेला असून,वर्चुअल रियालिटीच्या क्षेत्रामध्ये वेगळे प्रोडक्ट आणण्याच्या तयारी मध्ये हे आहेत,

लिहुन घ्या, Internet या गोष्टीचा पुढील अवतार Metaverse असणार आहे, यामध्ये सध्याचे इंटरनेट,AR, VR सगळंच एकत्रीत येईल.

म्हणजे? जसं आज आपण फक्त काहीच उपकरणांवर इंटरनेट वापरू शकतो पण उद्याची इकोसिस्टीम मध्ये प्रत्येक डिवाइस मध्ये इंटरनेटचा वापर करता येईल .

ते जे Augmented reality चे जग असणार आहे त्याला Metaverse म्हणलं जातं आणि फेसबुकने त्याच्यामध्ये लिडरशीप चालू केलीये .

यासाठी फेसबूकने युरोपियन युनियन मधून दहा हजार लोकांना रोजगार देणार असल्याचे जाहिर केलंय,त्यासाठी त्यांनी फंडिंग पण केलीये.

अशाप्रकारे आपण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहोत हे सिद्ध करायला फेसबुक ने बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आता गरज आहे ती त्यांची जुनी छबी आहे तिला सुधारण्याची.

आज फेसबुककडे व्हाट्सएप इंस्टाग्राम आणि ऑक्युलस या तीनही दिग्गज कंपन्यांची मालकी आहे,परंतु या तीनही कंपन्यांना मिळून एकत्रित पर्यंत होल्डिंग कंपनी फेसबुककडे नाही, त्यामुळे अशी होल्डिंग कंपनी तयार करणे आणि Metaverse साठी पायाभरणी करणे. कदाचित याकरिताच फेसबुकने ही नामांतराची चाल खेळलेली आहे असं समजा .

तेंव्हा आलं ना लक्षात फेसबुक का बरे स्वतःचे नाव बदलण्याच्या तयारीत आहे?

निलेश काळे.
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.
Office; 9146101663.

आपल्याला काय करायचंय ? नाहीतरी आपल्याकडे म्हणतातच ना नावात काय ठेवलंय ?

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *