Facebook वापरताय?तर आता Facebook कडून 5 लाख विनातारण बिजनेस लोन पण मिळेल.

724 Views

#business

Facebook वर जाहिरात करताय?आता Facebook कडून लोन पण मिळेल.

📌 फेसबुक हे जगातलं सगळ्यात मोठं सोशल मीडिया नेटवर्क आहे, भारतामध्ये एकूण 34 कोटी लोक फेसबुक आणि त्याच्याशी संबंधित असणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात.

नव्याने लॉन्च झालेल्या Business whatsapp या अप्लीकेशनवर देखील दहा कोटी पेक्षा अधिक बिजेनेसेस रजिस्टर आहेत.

एकंदरीतच व्यापारी वर्गाला या दोन अप्लीकेशचा चांगलाच फायदा होतो.

आपण फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर आपल्या व्यवसायाच्या Paid किंवा Organic जाहिराती करण्यासाठी केला असेल.

कधीकधी आपण या सोशल मीडिया स्पॉन्सर्ड जाहिरात सुद्धा केली असेल, तर आता आपल्यासाठी एक खुशखबर आहे.

फेसबुकने वेगवेगळ्या देशामध्ये स्टडी घडवुन आणल्या, त्यात त्यांना जाणवलं कि, या छोटया व्यावसायिकांना कोवीड-19च्या काळात कॅशफ्लोचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे,आणि या ठिकाणी मदत केली गेली तर व्यावसायिक उभे राहु शकतात तसेच फेसबुकला या प्रकारे बिजनेसलोनच्या क्षेत्रात प्रवेश देखील मिळेल.

म्हणुन एकूण 30 देशातील छोट्या व्यावसायिकांसाठी विनातारण आर्थिक पाठबळाची घोषणा केली आहे,पण जगात पहिल्यांदा भारतामध्ये ही स्कीम लॉन्च करण्यात आली आहे.

आहेत या स्कीम द्वारे छोट्या व्यावसायिकांना 17 ते 20 टक्के या वार्षिक व्याजदरावर पाच लाख ते 50 लाखापर्यंत विनातारण कर्ज मिळू शकते.

ज्या व्यवसायाच्या मालक या पूर्णतः महिला आहेत त्यांच्यासाठी या कर्जाचा व्याजदर थोडा कमी राहू शकतो असे फेसबुकने अगोदरच जाहीर केलेले आहे.

या करिता फेसबुक इंडिया ने गुरगाव स्थित Indifi या नॉन बँकिंग लेंडिंग प्लॅटफॉर्म बरोबर करार केलेला आहे.
यांच्या साह्याने फेसबूक इंडिया भारतातील छोट्या व्यावसायिकांसाठी हे कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

Indifii ही कर्जादाराची केवायसी, इतर कागदपत्रांची तपासणी, कर्जदाराची परत फेड करण्याची ऐपत,आणि कर्जाची रिकव्हरी, या सर्व बाबी तीच करणार आहे.

यासंदर्भातील सर्व माहिती या ॲप्लिकेशनवर उपलब्ध झालेली असून कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पाच दिवसांमध्ये हे लोन आपल्या खात्यावर वर्ग करता येऊ शकते.

त्याकरिता खालील वेबसाईटला भेट दया.

www.indifi.com

भलेही अशा स्वरूपाच्या स्किम आणून फेसबुक हे लोन या क्षेत्रात उतरत असले,तरीही फेसबुकचे हे पाऊल Non_profit, initivie असल्याचे फेसबुकने जाहीर केलंय,

अशाप्रकारे आपल्या ग्राहकाच्या गरजेच्या वेळेला त्यांच्या हातामध्ये कॅश देऊन त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्याचे काम फेसबुक करणार आहे.

या अप्लिकेशन द्वारे कर्जासाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी पात्रता काय असेल? कागदपत्र कोणती द्यावी? लागतील याची सर्व माहिती द्यावी याची सर्व माहिती,www.indifi.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे

आपण जर कधीही फेसबुकवर स्पॉन्सर ऍड दिली असेल? तर आपण या योजनेसाठी पात्र ठरू शकता, तेव्हा या योजनेचा फायदा घ्या, आपल्या व्यवसायामध्ये त्याचा सुयोग्य वापर करा, वेळेत परतफेड करा आणि स्वतःची प्रगती घडवून आणा.

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “Facebook वापरताय?तर आता Facebook कडून 5 लाख विनातारण बिजनेस लोन पण मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *