Gillette ने 120 वर्षापूर्वी आणलेलं अनोखं मॉडेल,ज्यावर आजही मोबाईल कंपन्या चालतात,

Razor blade model

📌 इतिहासामध्ये अनेक कंपन्या अशा आहे, ज्यांनी मार्केटिंगच्या जगासाठी अनेक धडे दिलेले आहेत, अनेक वर्षानंतर ही त्यांनी मार्केटमध्ये प्रस्थापित केलेले हे घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

बऱ्याच वेळेला कंपन्या अशा प्रकारचे बिझनेस मॉडेल डेव्हलप करतात, जे पुढे जाऊन मोठा इंडस्ट्रीचा आधार बनतात आणि आपण आज अशाच प्रकारच्या एका बिझनेस मॉडेल संदर्भात बोलणार आहोत,हे मॉडेल Gillette या जगप्रसिद्ध कंपनीने मार्केटला दिलेला आहे आणि हे मॉडेल कसं काम करतं? ते आपण बघू या.

सन 1900 च्या अगोदर पुरुषांनी दाढी करणे,हे महाकठीण काम होतं, दाढीला असणारे केस काढून टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारचं योग्य असं उपकरण नसल्यामुळे बहुतकरून लोक मोठी दाढी संभाळायचे .

King Camp Gillette हे एक प्रोफेशनल सेल्समन होते, त्यांना क्लीन शेव करून कामावर जायला लागायचं.

वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात मध्ये जायला लागायचं, प्रेझेंटेशन द्यावं लागायचं, आणि एके दिवशी कंटाळून त्याने एक अशा प्रकारचं रेझर आणि ब्लेड बनवली, त्याचा वापर तो अतिशय परफेक्टली करू शकत होते आणि याच एका आविष्काराने एका नवीन इंडस्ट्रीला जन्म घातला.

जिला,आपण शेविंग इंडस्ट्री म्हणून आज ओळखतो.

King Camp Gillette हा व्यक्ती एक पक्का सेल्समन होते,त्याने जे संशोधन केलं होतं,त्यामुळे त्याच्या हे लक्षात आलं होतं की,हे महत्वपूर्ण संशोधन आहे,याच्या वर एक मोठी इंडस्ट्री उभी राहू शकते.

त्यामुळे त्याने रेजर ब्लेड आणि रेझर याचं पेटंट घेतलं,

हे पेटंट वीस वर्षासाठी होतं आणि या वीस वर्षांमध्ये इतर कोणतीही कंपनी रेझर किंवा रेझर ब्लेड तयार करू शकत नव्हती,त्यामुळे सुरुवातीच्या वीस वर्षाच्या काळामध्ये जिलेट या कंपनीने फार मोठी घोडदौड केली.

परंतु 1920 या वर्षामध्ये त्यांचे पेटंट एक्सपायर झालं आणि आता जिलेटचे स्पर्धक त्यांच्या उपकरणा प्रमाणेच उपकरण कॉपी करू शकत होते.

मार्केटमध्ये अशा प्रकारे जिलेट या कंपनीचा हिस्सेदारी कमी व्हायला सुरुवात झाली.

हाच मोठा प्रॉब्लेम होता, कारण? ज्या इंडस्ट्रीला आपण स्वतः उभं केलंय ,त्या इंडस्ट्रीमध्ये आपली स्वतःची होणारे पीछेहाट ही त्यांना बघवणारी नव्हती, म्हणून त्यांनी डोक लावायला सुरुवात केली.

जिलेटला हे लक्षात आलं की, जे नवीन स्पर्धक मार्केटमध्ये येत आहेत त्यांना शेविंग ब्लेड आणि रेजर हे दोन्ही विकावे लागतात आणि Gillettle कडे वीस वर्ष यांनी नफा कमावल्यामुळे यांच्याकडे बर्‍यापैकी गंगाजळी निर्माण झालेली होती.

आता जिलेट या कंपनीने एक पद्धत आणली या ,पद्धतीमध्ये त्यांनी मार्केटला त्यांचा जे रेझर होतं ते अतिशय स्वस्तात द्यायला सुरुवात केली ,कित्येक वेळेला त्यांनी ते रेझर सर अगदी फुकट द्यायला सुरुवात केली.

जिलेटला हे पक्कं माहित होतं की,जर एखाद्या व्यक्तीने आपल्या कडून रेझर विकत घेतलं ,तर तो ब्लेड घेण्यासाठी परत परत आपल्याकडेच वापस येणार आहे.

आणि जिलेटच्याया मार्केटिंग स्ट्रॅटर्जीने पक्क काम केलं .

त्यांनी जसं अनुमान लावलं होतं, तशाच प्रकारे मार्केट न त्यांना रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली.

लोकांना रेझर अतिशय कमी किमतीमध्ये मिळत होतं,आता फक्त त्यांना ब्लेड घेण्यासाठी परत जिलेट कंपनीच्या वितरकाकडे जावं लागायचं, आणि अशाप्रकारे जिलेट ने रिझर मधून कमाई करण्यापेक्षा ब्लेड मधून कमाई करण्याचं तंत्र अवलंबलं.

हा काळ लक्षात घ्या,1920 म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर

Gillette च्या,या तत्त्वाचा वापर आजही अनेक कंपन्या करतात,

याला आपण याला रिकरींग बिझनेस मोडेल असे म्हणू शकतो.

आज टेलीकॉम कंपन्या जेव्हा, आपल्याला सिमकार्ड हे जवळपास फुकट देतात, तेंव्हा त्यांना माहित असतं ,आपल्या कंपनीचं सिमकार्ड घेतल्यानंतर समोरच्या ग्राहकाला वारंवार रिचार्ज करायचं आहे आणि अशा प्रकारे टेलिकॉम कंपन्यांनी सिमकार्ड फुकट वाटून रिचार्ज मधून मधून पैसे कमवतात .

डीटीएच कंपन्यांनी त्यांच्या सेट टॉप बॉक्सच्या किंमती आज घडीला अतिशय कमी केलेले आहेत,अगदी चारशे ते पाचशे रुपये मध्ये आपल्याला डीटीएच चा बॉक्स मिळू शकत, त्यांना माहित आहे एकदा का या व्यक्तीने आपल्या कंपनीचा डिटीएच बॉक्स लावला की दर महिन्याला त्याला रिचार्ज करायचा आहे आणि रिचार्ज मधून पैसे कमवता येतात.

सबस्क्रीप्शन मॉडेल यावरच तर काम करतंय.

आज हे मॉडेल मार्केटमध्ये येऊन 120 वर्षे झालेले आहेत पण आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक कंपन्या या बिझनेस मोडेलचाच वापर करतात आणि हे बिझनेस मोडेल अतिशय यशस्वी सुद्धा आहे.

त्यामुळे जेव्हा गरज पडेल त्या वेळेला आपण या रेजर आणि ब्लेड या बिझनेस मोडेल चा आपल्या व्यवसायात वापर करावा.

याच्यामध्ये एक अपवाद सुद्धा आहे,

Kodak कंपनीने या प्रकाराचा अवलंब केला आणि त्यांनी कॅमेरातून पैसे कमावण्याचे ऐवजी रोल फिल्म रोल मधून पैसे कमावण्याचा मार्ग अवलंबला, परंतु याच वेळेला तंत्रज्ञानामध्ये होणारच शिफ्ट त्यांनी नजरअंदाज केलंआणि मार्केटने यांच्या फिल्म रोल आणि फिल्म कॅमेरे या दोघांनाही बाद केलं.

त्यामुळे ही स्ट्रॅटर्जी वापरत असताना आपलं मार्केटवर देखील लक्ष असायला हवे, की मार्केट कोणत्या पद्धतीमध्ये जात आहे?

“रेजर मधून पैसे कमावण्याचे ऐवजी Blade मधून पैसे कमवावे” हे नेहमी फायद्याचं आहे, त्यामुळे आपण जर अशा प्रकारचे बिझनेस मॉडेल तयार करू शकत असाल तर ते नक्की करा यामुळे फायदाच होतो.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *