ग्राहकाला आवडेल / तो खरेदी करील असं उत्पादन कसं बनवावं?

138 Views

📌 बरेचदा अनेक जण फोन करतात आणि त्यांचा प्रश्न हा असतो सर मी कोणता व्यवसाय चालू करू.

व्यवसाय चालू करायचा तर आहे पण बऱ्याच जणांना ही कन्फ्युजन असतं की कशाच्या जिवावर अवलंबून राहून हा पण व्यवसाय करतोय ?

कधी कधी लोकं एकमेकांचं यश बघून व्यवसाय चालू करायला जातात किंवा भीतीपोटी व्यवसाय करायला जातात अनेक जण तर मजबुरी म्हणून व्यवसायामध्ये उतरतात आणि अशावेळी तयार केलेले उत्पादन किंवा चालू केलेली एखादी सर्विस यशस्वी होईल का नाही याची गॅरंटी नसते.

कारण ??? त्यांनी उभा केलेला व्यवसाय तेवढा प्रभावीपणे पुढे जात नाही, उत्पादन मार्केटला चालत नाही ! तसं का होतं ? हे जाणायचं म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवा.

एखादा व्यवसाय किंवा त्या व्यवसायात प्रॉडक्ट त्याच्या पाठीमागे काय मुद्दे आहेत? किंवा लोकांच्या गरजा कशा जाणून घ्याव्या हे या लेखातून आपल्याला मिळेल.

product strategy ही एक प्रकारची गाईडलाईन असते , ज्यातून आपल्याला आपला टारगेटेड ग्राहक , त्यांच्या आवडी , त्यांचा चॉईस , त्यांच्या खरेदी करण्याची फ्रिक्वेन्सी इ बाबी कळू शकतात.
आपल्या व्यवसायाच्या मार्केटिंगची दिशा , माकॅटवर होणारा impact कळून येतो.

product strategy framework मेनली तीन componant पासून बनलेला असतो.

Market Vision
Product initiative
Market Goal

#Market_vision:

📌 आपण आपण ज्या वेळेला मार्केटमध्ये एखादा उत्पादनं असतो त्यावेळी आपल्याला पक्कं माहीत पाहिजे की हे आपण नेमकं कोणत्या प्रकारच्या ग्राहकांसाठी आणतोय?

एक बिजनेस म्हणून आपण याच्याकडे कसं बघतो?

आपण आपल्या प्रॉडक्ट’ला मार्केटमध्ये कोणत्या ठिकाणी पोझिशन करणार आहोत?

रिलेटिव स्पर्धेला आपण कशाप्रकारे प्रकारे तोंड देणार आहोत?

अशा प्रकारे क्रिटिकल प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःसाठी शोधून ठेवले तर हे आपल्याला पुढे जाऊन फायद्याचं ठरतं आणि याला मार्केट विजन असं म्हटलं जातं.

product goal:

📌 .आपण एकदा आपल्या उत्पादनाची उद्दिष्टे ठरवून टाकली की आपली टीमचं डेव्हलपमेंट करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.

📌 यामुळे आपल्याला आपल्या या प्रगतीचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येतो.

📌 म्हणून करता आपली ही उद्दिष्टे स्मार्ट असावीत स्मार्ट चा अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतो.

S- Specific
M-measurable
A- Attainable
R- Relevant
T- time bound

📌 या प्रकारे आपण आपल्या उत्पादनाची उद्दिष्टे क्लियरकट बनवली की आपल्याला प्रगती करायला त्याचा फायदा होतो.

** Product initiative *

📌 .प्रॉडक्ट एनिशिएटीवचा अर्थ असा आहे की आपण आपल्या या मार्केटमध्ये स्वतःची एक वेगळी कन्सेप्ट राबवावी यामुळे पूर्ण मार्केटला एक नवीन दिशा मिळू शकते.

📌 यामुळे एक मोठे चित्र निर्माण व्हायला मदत होते आणि मार्केटमध्ये नवीन ट्रेण्ड बनतात ज्यामुळे आपली एक नवीन प्रतिमा बनायला मदत होते.

आपलं Reputation ही फार महत्वाची बाब आहे.

#case_study : येवले अमृततुल्य हे महाराष्ट्र मध्ये सर्वात अगोदर फ्रॅंचाईजी मॉडेल बनवणारे चहा विक्रेते होते त्यांनी त्यांचे उत्पादन ज्यावेळेला फ्रॅंचायजी मॉडेलमध्ये आणले त्यावेळेला त्यांनी एक ट्रेंड सेट केला

चहा सारख्या अतिशय क्षुल्लक आणि दुर्लक्षित असणाऱ्या सेगमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या प्रोडक्टसाठी वेगळी स्ट्रॅटजी लावली आणि प्रॉडक्ट स्ट्रॅटजी डेवलप केली.

ॲपलच्या Steve Jobs ला iphone ची किंमत कमी ठेवता आली असती त्यांच्या ऐकून ची किंमत कमी ठेवता आली असती , पण जाणीवपूर्वक त्यांनी सुरुवातीपासून त्यांनी किंमतीवर कधीही कॉम्प्रोमाईज केलं नाही आजही आयफोन कधीही स्वस्त किमतीमध्ये किंवा डिस्काउंट वर मिळत नाही ही ही त्यांची प्रॉडक्ट स्ट्रॅटजी आहे.

याचा अर्थ प्रॉडक्ट स्ट्रेटर्जी मध्ये आपल्याला काय काय बघायच आहे?

(1) आपण कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना सेवा देणार आहोत याचं पूर्णपणे व्यवस्थित वर्गीकरण करून घेणे !

2) आपली ज्या कोणा बरोबर स्पर्धा आहे अशा सर्व लोकांचा व्यवस्थित अभ्यास करून घेणे !

3) आपल स्वतःचा बिझनेस कसं चालणार आहे ? जसं की आपलं बिझनेस मोडेल किंवा आपल्याकडे येणारा प्रॉफिट कसा येईल? याची मोनेटायझेशन या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून घेणे .

4) आपल जे उत्पादन आहे त्याच्या संदर्भामध्ये पेस्टल ऍनालिसिस करून घेणे .

5) आपले जे उत्पादन आहे त्याची मार्केटमध्ये पोझिशन कशी असेल? किंवा किंमत काय असेल? कॉलिटी काय असेल? या संदर्भातून पोझिशनिंग करून घेणे.

साधारणपणे जेव्हा आपण ग्राहकांच्या सीटवर जाऊन उत्पादन कसं असावं याचा विचार करतो त्यावेळी ग्राहकाच्या नजरे मधून देखील आपण आपल्या उत्पादनाला नीटपणे जोखू शकतो म्हणून ज्यावेळी आपण उत्पादनाची पोजिशनिंग ठरवत असतो त्यावेळी हा देखील विचार करणारा महत्त्वाचा आहे

📌 म्हणून करिता फक्त बिझनेसच नाही तर प्रत्येक प्रॉडक्टची वेगळी स्ट्रॅटर्जी आखणे महत्वाची आहे.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764.

Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *