IAS ची नौकरी सोडून, चालू केला ट्यूशन स्टार्टअप,घडवतात लाखो मुले

IAS ची नोकरी सोडून चालु केले ट्यूशन स्टार्टअप.. आज घडवतात,लाखो मुले.

Unacademy

© निलेश काळे .

📌 “आजच्या युगात करोडो रूपये कमावयचेत तर फार मोठ्या कंपन्या , आवाज करणाऱ्या मोठाल्या मशीन्स , हजारो कर्मचारी , किंवा ऑफीसेस पाहिजेत असं काही नाहीये ! फक्त आग पाहिजे ती पण बुडाला लागलेली !

📌ही स्टोरी सुरु होतेय 2010 च्या 31 डिसेंबरच्या मध्यरात्री गौरव मुंजाल हा , सेकंड इअर कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग करणारा पोऱ्या पार्टी करायचं सोडून असा विचार करत असतोय कि , नवीन वर्षात काय करावं ? जसं आपण सगळेच करतो !

📌 त्याला सहज सुचतं कि चला आपल्या इंजिनिअरिंगच्या टॉपीकवर एक व्हिडिओ बनवू आणि आपलं एक चॅनेल बनवून युट्युबला टाकू ! आयडीया डोक्यात आली आणि लगेच त्याच्यावर काम केलं,

‘बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतोय कि आयडीया डोक्यातच जिरून जातात !

📌 त्या व्हिडिओ लाईक्स आणि कमेंट यायला चालू होतात तसा दादाचा विश्वास वाढतो आणि चालु होतो प्रवास रोज एक विडीओ टाकायचा !

📌 जस जसे व्हिडिओ वाढत जातात तस तसं चॅनेल वाढायला चालु होतं !

📌शिक्षण पुर्ण झालं कि गौरवने थोडा वेळ जॉब केला आणि आपला एक मित्र हिमेश सिंग याच्याबरोबर एक ऍप तयार केलं FLATCHAT , या ऍपवर ते कॉलेजच्या मुलांना रहाण्यासाठी किरायाने flat मिळवून दयायचे .

📌 आता अशा आयडीया ला फंडींग मिळतेच तशी यांना पण मिळाली आणि Flat -Chat चांगले चालू लागलं , त्याचं valuation वाढलं किं , त्यांनी ते अॅप्लीकेशन विकून टाकलं ज्यातून त्यांना 50 लाखाची फंडींग मिळाली , तोपर्यंत गौरव मुंजाल हे स्वत : व्हिडीओ बनवुन टाकतच होते ! त्यामुळे त्यांचं चॅनेल वाढतच गेले .

📌 इकडे अजून एक जण त्यांच्या या स्टार्टअपमध्ये यायला तयार व्हायला होता ! त्यांचं नाव … डॉ.रोमन सैनी .

📌रोमन सैनीची पण आपली वेगळीच स्टोरी आहे,1991 ला राजस्थानमध्ये जन्मलेला हा पोरगा तसा अभ्यासात फारच हुश्शार !!

📌 त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी AllMS ची मेडिकल एन्टरन्स दिली आणि पहिल्या प्रयत्नातच MBBS साठी सेलेक्ट ! ते पण AIIMS दिल्ली मध्ये ( जिथे आपले VIP नेते ऍडमीट होतात )

📌MBBS च्या तिसऱ्या वर्षाला असताना एका मेडिकल कॅम्पला खेडयात गेले असता त्यांना दिसला ,,,
सिस्टीमचा भकासपणा, भयंकर गरिबी आणि यंत्रणेतील कमालीची उदासिनता !

📌 ठरलं ! सिस्टीमचा पार्ट बनून सिस्टीम बदलायची ! चालू केला अभ्यास … आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी UPSC क्लीअर , नुसती पास नाही तर आठरावी रँक मिळवून पास !

📌पहिली पोस्टींग असिस्टंट कलेक्टर जबलपूर,मध्यप्रदेश !

📌 पण इथे त्यांना जाणवलं कि, सिस्टीमचा भाग बनवून वरवर सिस्टीम बदलण्यापेक्षा ती मुळातुन बदलली पाहिजे, त्यांना गौरव मुंजालचा हा unacedemy चा कन्सेप्ट माहिती होताच ! ते चांगले मित्र ही होते , एक दिवस गौरव मुंजाल नी त्यांना UPSC Entrance देणाऱ्या मुलांसाठी व्हिडिओ बनवायला सiगितले होते , तर त्याला खुपच रिस्पॉन्स आला होता ,, ही बाब होतीच !

📌 आता यांचं असं ठरलं कि नौकरी बिकरी काही करायची नाही , समाजात एक मोठा प्रभाव पाडायचा असेल तर …. त्या विद्यार्थ्यांना घडवावं लागेल ज्यांच्या आईवडिलांकडे पोरांच्या शिक्षणासाठी फीस म्हणून दयायला लाखो रुपये नाहीयेत !

📌 इथं साधी क्लर्कची सरकारी नोकरी अनेकांना सोडवत नाही आणि या माणसाने IAS च्या नौकरीचा राजीनामा दिला ! समाजाला काही तरी जास्त चांगलं आणि मोठ्ठं देण्यासाठी .

📌2013 साली मग या त्रिकुटाने मिळून Unacademy मध्ये फक्त कॉम्पीटीटीव Exam साठी Video बनवायला चालु केले ते पण फक्त Upsc साठी कारण रोमन सैनी त्यात मास्टर होते .

📌 अशा प्रकारे यांचं चॅनेल सगळ्यात मोठया शैक्षणीक चॅनेलपैकी एक बनलं

📌 2016 साली यांची वेबसाईट तयार केली , तोपर्यंत युट्युब वर तर प्रवास चालुच होता .

📌 यांच्या युट्युबच्या व्हिडिओजला मस्त रिस्पॉन्स होता त्यामुळे आता यांनी स्वतःला एक एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणुन बनवायला चालु केलं , फंडीग घेतली , नवीन नवीन चांगले शिक्षक आणले , यांच विशेष असं आहे कि शिक्षक त्यांच्या घरातून शिकवू शकतात आणि पूर्ण देशभरातील विद्यार्थी त्यांच्या घरात बसून शिकू लागले , फंडींग असल्याने ते शिक्षकांना पगार देऊ शकत होते पण विद्यार्थांना मात्र सबकुछ फ्री होतं.

📌 2016,2017,2018 मध्ये यांनी अनेक राऊंड मधून अजून फंडींग मिळवली , तो पर्यंत यांचा युजर बेस वाढत गेलेला होताच !

📌 अनेक भाषांमधून, सगळ्याच डिवाईसवर ( जसं मोबाईल , लॅपटॉप , पीसी ) यांचे कोर्सेस उपलब्ध झाले ते पण कोटा , दिल्ली , चंडीगढ सारख्या शहरातील टॉप टिचर्स कडून !

📌 जे इन्वेस्टर्स फंडींग देतात त्यांना नफा तर पाहिजे ना ? नुसतंच स्टार्ट अप मोठ्ठ होऊन काय उपयोग ?

📌 तेंव्हा Unacademy ने त्यांचं paid असं प्रिमियम मॉडेल काढलं .

📌 ज्यावेळी तुम्ही खूप जास्त काळ . बेस्ट कन्टेन्ट फ्री मध्ये देत असाल त्यावेळी लोकांना त्याची Value कळलेली असते म्हणून त्यांच्या paid model ला मोठा प्रतिसाद मिळाला , यांचं पेड मॉडेल सुद्धा दर महिन्याला फिस भरा असं सोप्पं आहे , त्यामुळे विद्यार्थ्यांना लोड येत नाही .

📌 अशा प्रकारे थोडं कमवंत , थोडं समाजात एक सकारात्मक बदल घडवणारं स्टार्ट अप यशस्वी बनलं !

📌 आज त्यांच्याकडे 1500 टिचर्स , आठ ऑफिसेस आणि भारतातल्या सगळ्या भाषेत कोर्स उपलब्ध आहेत .

📌 तुम्ही म्हणाल कि , Biju’s किंवा Vedantu सारखे यांचं नाव का नाहीये ? तर Unacademy फक्त स्पर्धा परिक्षांपुरतं मर्यादीत आहे , तर बायजू पहिली ते बारावीच्या विदयार्थ्यांना कोचिंग देते !

📌 आता Unacedamy सुद्धा अकरावी बारावी च्या मुलांसाठी कोचींग आणत आहे, पण परवडणाऱ्या रेट मध्ये !

📌 “या लोकांनी स्वतःच्या करीयरचा विचार न करता खूप मोठया लोकसंख्येचा एक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी स्टार्टअप केलं ज्यातून आपण खूप काही शिकून प्रेरणा घेऊ शकतो ” !

📌यांची स्टोरी आपण युटयुबला पण बघू शकता ! आपण अशा स्टोरीज मुद्दाम लिहून सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मनाला ऊभारी मिळते .

📌सेफ रहा ! तयारी करत चला ! उद्या आपली पण अशीच स्टोरी येऊ शकते !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क ,औंध , पुणे .
9518950764

Office : 9146101663

Previous Post Next Post

2 thoughts on “IAS ची नौकरी सोडून, चालू केला ट्यूशन स्टार्टअप,घडवतात लाखो मुले

    1. वरिल दिलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता.
      परत एकदा देतो.
      9146101663

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *