Investors कडून किंवा बँकेकडून लोन हवंय ? तर हे माहित पाहिजेच.

#What_is_a_Business_Model?

📌 सध्या ज्या वेळी आपण एखाद्या इन्वेस्टरकडे बिझनेस करता पैसे मागण्यासाठी जातो ,त्यावेळी जो इन्व्हेस्टर असतो तो आपल्याला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतो तो म्हणजे .. “तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे आणि ते माझ्यासमोर मांडा” !

📌 आता प्रश्न असा आहे की बिझनेस मॉडेल म्हणजे नेमकं काय?

📌 आपण एखादी सेवा किंवा एखादी वस्तू तयार करतो अथवा ती बाहेरून मार्केट मधून विकत आणतो आणि त्याच्याकरिता एक ग्राहक वर्ग बघून ठेवतो ,आता या बघून ठेवलेल्या ग्राहकाला आपण आपल्याजवळील वस्तू किंवा सेवा पैशाच्या मोबदल्यात विकतो तेंव्हा तो ग्राहक आपल्याला तो पैसा नफ्याच्या स्वरूपात परत करतो वस्तू किंवा सेवेच्या बदल्यांमध्ये ग्राहकांना ग्राहकांनी आपल्याला पैसा देणे या एकूण प्रक्रियेला बिझनेस मोडेल असं म्हणता येतं.

📌 पूर्वीच्या काळी हा व्यापार एकूणच सोपा होता किंवा काही ठराविक अशी मॉडेल मार्केटमध्ये होती पण बदलत्या काळानुरूप व्यवसायाचे प्रकार बदलत गेलेत, ग्राहकाला आपल्याला कोणत्या स्वरूपात विक्री करता येईल याचे प्रकार देखील बदलत आहेत याचा अर्थ असा की बिझनेस मॉडेल चे नवीन प्रकारे मार्केटमध्ये येत आहे आता हे बिझनेस मॉडेल आपल्याला माहीत असायला हवेत.

📌 जसं आपल्या बिजनेस मध्ये माल येतो कुठून? विकला जातो कसा? आणि पैसा येतो कश्याप्रकारे? हे फक्त आपल्याला माहित असून उपयोग नाही, आपल्या बिजनेस मध्ये अनेक पार्टनर असू शकतात किंवा आपलं कुटुंब असू शकतात तर त्या लोकांना सुद्धा या गोष्टी माहीत असाव्यात, आपल्या कर्मचाऱ्यांना या गोष्टी डिटेलमध्ये समजून सांगता यायला पाहिजेत त्याच्यासाठी बिझनेस मोडेल हे परफेक्ट एक परफेक्ट टुल आहे आणि ते कागदावर असणे आवश्यक आहे.

तर या मॉडेलमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत ?ह्या आपण खालील प्रमाणे बघू.

(1) #What_Value_it_Creates ?:

_जोपर्यंत आपण आपल्या ग्राहकां ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या उत्पादनाबद्दल एक चांगली व्हॅल्यू तयार करु शकत नाही तोपर्यंत ग्राहक आपल्याला त्या उत्पादनाची चांगली किंमत देणार नाही, याचा अर्थ असा की आपण आपल्या व्यवसायामध्ये कुठल्या तरी व्यक्ती वस्तूसाठी किंवा सेवेसाठी एक एक व्हॅल्यू तयार करून ठेवली पाहिजे याचा फायदा ग्राहकाला होईल आणि ग्राहक आपल्याला त्याचे चांगले पैसे देईल.

म्हणून किमान आपल्याला तरी या गोष्टी स्पष्टता असले पाहिजे की आपलं बिजनेस कोणत्या प्रकारची व्हॅल्यू मार्केटला देणार आहे.

(2) #Whom_it_serves? :

आपला व्यवसाय कोणत्या प्रकारचा ग्राहकांसाठी आहे? किंवा कोणत्या भागातील लोकांसाठी आहे ?किंवा कोणत्या वयाच्या लोकांसाठी आहे? ही गोष्ट आपल्याला एक बिजनेस म्हणून क्लियर कट माहित असायला हवी ,जोपर्यंत आपण कोणत्या प्रकारच्या लोकांना ही सेवा किंवा ही वस्तू विकणार आहोत? हेच आपल्याला माहित नसेल त्या वेळेला आपण मार्केटमध्ये जाऊन कशा प्रकारची मार्केटिंग करणार आहोत? तेव्हा बिझनेस मोडेल ठरवत असताना ही बाब अतिशय महत्त्वाची आहे.

(3) #What_sets_it_Apart?:

_मी अगदी पहिल्यापासून सांगत आहे की आपण आपलं स्वतःचं वेगळेपण सिद्ध केल्याशिवाय लोक आपल्याला विचारणारच नाहीत कारण या मार्केटमध्ये एकसारखे दिसणारे अनेक जण जर असतात म्हणून तर ग्राहक गोंधळून जातो त्यासाठी म्हणून बिझनेस मॉडेल ठरवत असताना हा पॉईंट देखील आपल्या नजरेसमोर नक्की ठेवला पाहिजे, की आपण इतरांपेक्षा वेगळे कसे असणार आहोत? आणि एकदा का हे वेगळेपण सिद्ध केलं की मग मात्र आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही.

त्यामुळे बिझनेस मॉडेलमध्ये आपलं स्वतःचं वेगळेपण हा अतिशय फार महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे.

(4) #What_Resources it_depends_upon? :

व्यवसाय अनेक गोष्टींवर अवलंबून असतो ,बरेच जण त्याचा विचार न करता व्यवसाय चालू करतात आणि नंतर काही काळ लोटल्यानंतर त्यांना असं जाणवतं की आपल्याला पाहिजे असणारे वस्तू तर सध्या मार्केटमध्ये फार कमी ऊपलब्ध आहेत.

असे अनेक लोक अडकलेले मी बघितले म्हणून आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये आपण ही गोष्ट मेंशन करून ठेवले पाहिजे की आपल्या व्यवसायाचे आधारस्तंभ काय आहेत? आणि आपल्या साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा उगम कुठे आहे ?जर या गोष्टी आपल्याला माहित नसतील तर आपण त्या माहित करून घेऊन लिहून ठेवल्या पाहिजेत म्हणजे आपल्या परस्पर देखील इतरांना या गोष्टी माहीत व्हायला सोप्या जातात.

(5) It_is_Crucial_Relationship:

बिझनेसमध्ये इमोशन्स नसतात हा भाग जरी सोडला तरीही यामध्ये नातेसंबंधांना फार जास्त महत्त्व आहे.

बिझनेस रिलेशनशिप ही बिजनेस ची फार मोठी जमेची बाजू असते, तेव्हा आपण आपल्या व्यवसायासाठी कोणत्या कोणत्या लोकांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत? किंवा कोणत्या लोकांनी पासून आपल्याला बिझनेस साठी फायदा होणार आहे ?या सगळ्या लोकांची नावे यांच्या आपला होणारा फायदा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण कागदावर मांडून ठेवला पाहिजे.

अनेक बिझनेसमन कडे आपल्या ग्राहकांची आणि त्यांच्या सप्लायर ची यादी उपलब्ध असते ,परंतु या दोन बाबी सोडल्या तरी व्यवसायासाठी अनेक वेगवेगळी नाती जपावी लागतात ,आणि ती नाती आपल्या व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाची असतात, जसे शासनाच्या दरबारी ऊठबस असणाऱ्या व्यक्ती.

(6) #Sales_Distribution_Channel:

ज्यावेळी पासून लॉकडाऊन चालू झालं आहे, त्यावेळी पासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना झोमॅटो स्वीग्गी कशाप्रकारे काम करतात ? याचे महत्व पटायला चालू झालंय म्हणजे ही लोक आतापर्यंत फक्त आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना हॉटेलमध्ये जेवन वाढायची, ती आज घरपोच डिलिव्हरी देत आहेत , म्हणजे एकंदरीतच काय कि विक्री करण्यासाठी जो प्रकार आहे तो सध्या बदलला आहे.

असे बदलणारे प्रकार सुद्धा आपल्याला माहीत झाले पाहिजे

कारण तो जमाना गेला ज्यावेळी ग्राहक आपल्याकडे येऊन आपल्या पैसे देऊन वस्तू घेऊन जायचे ,आता हे प्रकार बदलले आणि या प्रकारांची माहिती आपल्याकडे असणं अत्यावश्यक आहे.

(7) #How_It_Generates_Money :

व्यवसायामध्ये पैसा हा अलग-अलग मार्गातून येत असतो, याला स्ट्रीम ऑफ इन्कम अस म्हणलं जातं , इथे पैसा हा वेगवेगळ्या मार्गाने तयार करता येतो, जसे की आपल्याला हे माहीत आहे की फेसबुक वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमावते पण व्हाट्सअप कोणत्या मार्गाने पैसे कमावतो ? हे आपल्याला माहीत नाही ,पण ज्या व्यक्तीने हे तयार केलं आहे, त्याला तर हे माहीत असतं .

म्हणजे ज्या वेळी आपण आपल्या व्यवसायाचं मॉडेल ठरवतो त्यावेळी आपल्याकडे पैसा कसा येणार आहे याची स्पष्टता आपल्याकडे असायला हवी

(8) #Where_goes_Money? :

आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या गोष्टी स्पष्ट करून घेतल्या आता हे पण आपण बिझनेस मॉडेलमध्ये ठरवायचं असतं किंवा लिहून घ्यायचं असतं की आपला पैसा कशाप्रकारे बाहेर खर्च होणार आहे? बऱ्याच लोकांना पैसा कसा कमवायचा हे माहित असतं ,परंतु पैसा खर्च करणे ही,देखील एक कला आहे.

आपण कामाच्या ठिकाणी ,कामाच्या वेळेला आणि कामाच्या व्यक्तीवर पैसा खर्च करणे ,यावरच बिजनेस उद्या वाढणार आहे?का आहे त्या जागेवर संपणार आहे? हे ठरते त्यामुळे आपला पैसा कसा खर्च होतो? हे देखील आपल्याला माहिती पाहिजे.

या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण कागदावर लिहून ठेवतो त्याला बिझनेस मोडेल प्लान असं म्हणलं जातं आता हा बिझनेस मॉडेल प्लान कसा करायचा ते मी पुढच्या लेखात देत आहे परंतु सध्या इतका समजून घ्या की आपण एैऱ्या गैऱ्या सारखा बिजनेस करणार नाही आहोत आपला बिझनेस एक मॉडेल नुसार चालेल.

अजून एक गोष्ट महत्वाची ती अशी कि , बिझनेसचे मॉडेल एकदा तयार करून ठेऊन दयायची गोष्ट नाहीये तर त्याला आपण कायम Revaluate करावं लागतंय.

📌 या पद्धतीला मॉडर्न Ambidextrous thinking म्हणायचं

बदलत्या युगात आपल्याकडे तगून रहाण्याचे दोनच मार्ग आहेत ,,, ते म्हणजे आपल्या व्यवसायाचे मॉडेल व्यस्थित Exploit करणे आणि नवीन प्रकार Explore करणे म्हणजेच Adopt Or Die

शुभेच्छा .

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
5th floor, विघ्नहर चेंबर्स, नळ स्टॉप,पुणे .
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *