Job करणाऱ्यांसाठी,सहज,सोप्पे आणि विना गुंतवणुक असे सहा इन्कम पर्याय

“Extra income चे सहा सोप्पे पर्याय जॉब करणाऱ्यांसाठी ”

© निलेश काळे .

आपण जॉब करता आहात !पगार पण चांगला येतोय , सगळं छान छान आहे, पण दोन पाच हजार जास्त कैश आली तर कोणाला नकोय ? पूर्वी नौकरपेशा असणारी मंडळी Lic अथवा पोस्टाची RD वगैरे एजंट बनुन कमवत .

आताच्या नवीन युगात सुद्धा अनेक नवीन पर्याय खुले झालेत खालील काही पर्याय नक्की ट्राय करून बघा .

(1) CLOSING : एखादया फर्म साठी आपण ज्यावेळी ग्राहक मिळवून देतो , तो शेवटच्या टप्प्यात पैसे देऊन बुक पण करतो या स्टेजला क्लोजींग म्हणतात .
फक्त ग्राहकासमोर ऍड फिरवणे हा प्रकार प्रॉस्पेक्टींग मध्ये येतो , म्हणून यात जास्त पैसा नाहीये , पण डायरेक्ट कमिशन घेऊन शेवटचा व्यवहार पार पाडणे यात जास्त पैसा आहे .
अनेक क्षेत्रं आहेत ज्यामध्ये आपण कामं करू शकतो , यात डबल फायदा आहे , एकतर आपल्याला त्या फर्म करता Job करण्याची गरज नाही आणि आपण आपली नौकरी डिस्टर्ब करायची पण आवश्यकता नाहीये .
प्लॉट विक्री , लग्न जमवणे , शाळांकरिता ऍडमिशन्स देणे , सेमिनार्स साठी पार्टिसिपंट्स देणे , वाहनांची खरेदी विक्री ,,,अशा डिलींग्स सध्या मार्केटला उपलब्ध आहेत .
**********************************

(2) Copywriting :

सध्या सोशल मिडियाचा आणि त्याच्यावर चालणाऱ्या पोस्टचाच जमाना आहे,तुमच्याकडे शब्दांचं सामर्थ्य आहे का ? मग लोकं तुमच्यासाठी पैसे घेऊन उभे आहेत .

शब्दांनी दुनिया फिरते !

त्यामुळे जर आपण उत्कृष्ट कन्टेन्ट लिहू शकत असाल ! तर इंडस्ट्री त्यासाठी पैसा मोजायला तयार आहे .

सुरुवात फेसबुक वर आर्टीकल लिहीण्यापासूनच करा,फ्री आर्टीकल्स,फक्त तुमचा नंबर सोडत चला ! बघा लोकांना तुम्ही ठळकपणे दिसू लागलात कि झालं.

लोक त्यांच्या सोशल मिडिया पोस्ट करिता तुमच्या कडून फ्री लांन्सींग कामे नक्की करुवून घेतील . यासाठी काय लागतं ? तर फक्त एक चांगला फोन किंवा लॅपटॉप .

*************************************

(3) Tutoring :.

पूर्वी असं मानलं जायचं कि ट्युशन म्हणजे,इंग्लीश,गणित,विज्ञान इतकंच,पण आजकाल अनेक असे काही भन्नाट क्लासेस चालतात कि त्याला मर्यादा नाही,लॉक डाऊन दरम्यान असे अनेक ऑनलाइन क्लासेस आपण बघीतले असतील?त्व
बघा आपण जॉबला आहात, पण आपल्याकडे असं स्कील आहे कि जे इतरांना शिकायचय ! त्यासाठी ते पैसा दयायला तयार आहेत .
जसं
गिटार , बासरी किंवा पियानो शिकवणे
पेंटींग शिकवणे
इतर देशातील किंवा राज्यातील भाषा शिकवणे,
Online selling शिकवणे,ज्योतीष शिकवणे,कूकींग शिकवणे
इतकंच काय ?तर साडी कशा प्रकारे नेसावी? या सारखे पण क्लासेस आहेत .
एकूणच काय ? तर आपला जॉब करत करत हे करता येऊ शकतं .

*************************************

(4) Used stuff selling :

Olx सारख्या कंपन्या फक्त जुन्या सामानाची विक्री करता यावी म्हणून उभ्या राहिल्या,एकाच्या बिनाकामाची वस्तु कोणाच्या तरी अत्यंत गरजेची असू शकते,त्यामुळे या मार्केटची स्टडी करा ! डायरेक्ट विकतच घ्या, किंवा विकण्यापुरतं घ्या आणि मग निवांत विका ! कमीशन बेस्ड विकण्यापेक्षा असं विकण्यात जास्त फायदा राहू शकतो,आता फायदा जास्त म्हणल्यावर थोडी जास्तीची रिस्क पण येणारंच म्हणा ! पण हे चालतं.

************************************

(5) Reselling :

आपला मित्र वर्ग मोठा आहे ? त्यात आपलं नाव चांगलं आहे किंवा लोक आपल्याला मानतात तर मग Online चं घ्या आणि online चं विका,याला रीसेलिंग म्हणतात,
यात ना तर पैसा गुंतवायची गरज य ना स्टॉक मेंटेंन करण्याची झंझट ! आजकाल Meesho सारखे अनेक ऍप उपलब्ध आहेत, ज्यावरून आपण रिसेलिंग करू शकता.
लोक लाखो रुपये कमवतात हे सगळे प्रकार करून

*************************************

(6) Social media management for others :

सोशल मिडिया हाताळणी एवढी अत्यावश्यक झालीये कि,सोशल मिडियावर आपण एक दिवस दिसले नाहीत तर गेले कि काय ? असं लोक गंमतीने विचारतात !
खरं आहे ते !
समाजात प्रभाव पाडत रहायचे असेल? तर सोशल मिडिया रोज हाताळला पाहिजे,पण कित्येक लोकांना ते वेळेअभावी जमत नाही , मग ते आपला सोशल मेडिया इतरांना सांभाळायला देतात आणि अशा प्रकारे एका जणाला एक्सट्रा इन्कम ची संधी निर्माण होत असते.

ही झाली आपण काय आणि कसं करू शकतो याची शॉर्ट लिस्ट .

शुभेच्छा .
© निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
Aundh Pune .
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *