Kelloggs ने उपमा सुद्धा आणला,ही त्यांची हार आहे का विजय?जाणून घ्या या कंपनीबद्दल काही इंटरेस्टींग बाबी

Kellogg’s

काल परवा पासून Kellogg’s च्या उपमा पाकिटचा फोटो व्हायरल होतोय,आणि त्याच्याबरोबर व्हायरल होतोय एक टोमणा,

“आमचा Breakfast बदलायला आले होते,आम्ही यांनाच बदलायला भाग पाडले”!

Hmmmmm,,, एखादी आंतरराष्ट्रीय ब्रान्ड लोकल चवीनुसार,त्याचा प्रॉडक्ट तयार करत असेल?तर त्याची ती हार नसते,उलट हे समजून घ्यायला हवंय की,त्यात काहीतरी नक्की शिकण्यासारखं असेल.

Kellogg’s ही जगातली नं.दोनची स्नॅक उत्पादक कंपनी आहे,

पहिला नंबर अर्थातच PepsiCo चा.

जाणून घेऊ काही इंटरेस्टिंग गोष्टी Kellogg’s बद्दल .

1906 सुरू झालेली ही मल्टीनॅशनल अमेरिकन कंपनी Original plant based food कंपनी आहे.

ज्याची सुरूवात दोन भावांनी J.H.kellogg आणि W.K.Kellogg. यांनी केली.

यांचं दोघांचही असं मानणं होतं कि, निसर्गातून माणसासाठी आवश्यक ते न्युट्रिशन मिळू शकतं,म्हणुन त्यांनी कॉर्नफ्लेक्सचा शोध लावला,त्याचं औद्योगिक उत्पादन सुरू केलं .

धान्य, cereals यांच्या तुन पोषन मिळू शकतं म्हणुन या कंपनीचा फोकस ब्रेकफास्ट उत्पादनावरच राहिला,यांची जास्तीत जास्त उत्पादने जसे कॉर्न फ्लेक्स हे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या गेलेल्या शेतमालापासुन बनवलेले असतात,त्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा दिला जाऊ शकतो ? हे ही कंपनी नेहमी बघते .

त्यामुळेच या कंपनीचं मिशन स्टेटमेंट आहे’ “Nourishing families so that they can florish and thrive.

या कंपनीचा जो लोगो आहे,तो हॅन्डरिटन आहे,आणि विशेष म्हणजे? कंपनीच्या स्थापनेपासुन तो अजूनही बदलेला नाही.

आज या कंपनीचे उत्पादने 18 देशात तयार होतात अन् 150 देशांमध्ये विकली जातात,आज या कंपनीकडे स्वतःचे शेकडो ब्रॅन्ड असले,त्यांचा बिजनेस स्ट्राँग असला,तरीही कंपनी ओळखली जाते,तिच्या माणुसकीच्या वागणुकीबद्दल.

अगदी सुरूवातीच्या काळापासून ते आत्ताच्या कोविड- काळापर्यंत भुकेल्यांची भूक भागवण्याची जबाबदारी या कंपनीने पार पाडलीये.

त्याकरिता त्यांची मोठी चॅरेटेबल व्यवस्था आहे.

1930 चा काळ हा ग्रेट डिप्रेशन म्हणून ओळखला जातो,प्रचंड आर्थिक तंगीच्या काळात या कंपनीने आपल्या सर्वच्या सर्व फॅक्टरीजमध्ये कामगारांचा कामाचा आठवडा हा 40 तासावरून 30 तासाचा केला, कशासाठी???????तर त्यांना जास्त कामाचे जास्त पैसे देता यावे यासाठी.

तेंव्हापासून मग तो काळ पहिल्या किंवा दुसऱ्या विश्वयुद्धाचा असो कि, कोवीड महामारीचा, व्यवसाय करण्याबरोबरच भुकेल्यांची भूक भागवणे हे काम “आमच्या DNA मध्ये आहे”. असं त्यांची वेबसाईट आजही सांगते ( आपण गुगलवर Kellogg’s india सर्च करू शकता.)

युनायटेड नेशन्सच्या food security प्रोग्राम अंतर्गत जगात ज्या ठिकाणी लोक भुकेले असतील, मग आफ्रिका असो कि मिडल इस्ट,तिथे अन्नाचे पॅकेट पुरवण्याचं काम Kellogg’s ही त्यांच्या चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे नेहमी करत असते.

कोवीड काळात या कंपनीने 19 million चा फंड केवळ भुकेल्यांसाठी बाजुला ठेवलेला.

ताजं उदाहरण हे अफगाणिस्तानातून पलायन करत असलेल्या जनतेचं आहे, या सगळयांनी वाऱ्यावर सोडलेल्या माणसांसाठी दोन वेळच्या पोट भरण्याची सोय Kellogg’s. ने त्यांच्या food justice program द्वारे केली.

आता आपण मुळ मुद्दयाकडे येऊ,कि Kellogg’s ने आपल्या प्रॉडक्ट लाईन मध्ये उपमा सामिल केला,तर ही त्यांची हार आहे?का विजय?

तर लक्षात घ्या, ही एका सेन्सीबल बिझनेसची खासीयत आहे,

“ते ज्या ठिकाणी व्यवसाय करतात,त्या ठिकाणच्या लोकांची आवड निवड समजून घेऊनच उत्पादने मार्केटला आणतात”.

नाहीतर McDonald’s ने आलुटिक्की आणि व्हेज मेन्यु कशाला आणला असता?

ज्या कंपनीने स्वतःचे प्रॉडक्ट अंतराळविरां बरोबर चंद्रावर पाठवले, ज्या कंपनीने न्युयॉर्कच्या Times square मध्ये पहिल्यांदा जाहिरातीला सुरुवात केली, त्या कंपनीने उपमा पाकिट आणून हार पत्करली म्हणणे हास्यास्पदच आहे .

या कंपनीच्या इतिहासातून उद्योजकांनी खूप काही शिकण्यासारखं आहे.

ते शिका आणि आयुष्यात प्रगती करा .

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क, औध,पुणे.
9518950764

office : 9146101663

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *