इथुन पुढे,सणवार सुरू होतील, तेंव्हा Local ग्राहक कसा मिळवाल ?

लोकल ग्राहक कसा मिळवाल?

©निलेश काळे.

📌 ग्राहक हा कोणत्याही व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे ,ग्राहकाच्या विना एखादा व्यवसाय म्हणजे “महागडा छंद” आहे असं आपण म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये आपण जर ग्राहकाला सेवा दिली नाही त्याच्याकडून पैसा मिळवला नाही किंवा त्याला एखाद्या उत्पादन विकले नाही तर मग तो व्यवसाय आला कुठून?मग आपण तर जस्ट टाईमपास करतोय.

📌 (1)identify_Ideal_Customer :

आपण या लॉकडऊन मधुन जसं जसं बाहेर पडू लागलोय, त्याप्रमाणे आपली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय, मग ज्याच्या समोर अॅड करायचीये त्याला ,आपण तरी नीट ओळखतोय का ? या प्रकारच्या कस्टमरला ” आयडियल म्हणजे आदर्श ग्राहक म्हणतात ” !
..

बघा काय असतं? कि भलेही आपल्याला सगळया जगाला माल विकायचा आहे , हे मान्य आहे,पण तरिही ते शक्य नसतं,कारण प्रत्येक व्यवसायाचा एक आदर्श ग्राहक वर्ग असतो.

आपल्याला ते व्यवस्थित माहित करून घ्यायचंय, तो रहातो कुठे ?त्याची आवड काय ? दुःख काय ?गरजा काय ? सगळं सगळं माहित करून घ्यायचंय, जगातल्या सगळ्या मोठया कंपन्या ग्राहकांचा डाटा जवळ ठेवतात वापरतात, त्या हजारो करोड रुपयांचा कंपन्या जर एवढा डिटेल होमवर्क करतात तर मग आपण कोण ?
आपल्याला हा होम वर्क करायचाच आहे.

(2) Put irresistable Offer:

समजून घ्या, एका वर एक फ्री घ्या, 20% Disocount घ्या, असं घ्या , तसं घ्या या प्रकारच्या ऑफर फारच जेनरिक झाल्यात, म्हणजे त्या ऑफरची वॅलिडिटी नसते, म्हणुन आपल्याला अशी काहीतरी ऑफर द्यावी लागेल जी ग्राहक हातोहात घेतील,

कारण या ऑफरचा वापर, आपण as a bait करू शकतो .

कधी-कधी व्यावसायिक अगदी हास्यास्पद ऑफर काढतात,पण ऑफरची Value नेमकी किती आहे?हे ग्राहक ठरवेल .

त्यासाठी आपण जी सेवा देताय किंवा किंवा प्रॉडक्ट विकतोय त्याची ग्राहकाला किती गरज आहे ? याच्यावरच ते ठरेल !

आता जर समजा एक ऑफर काम करत नसेल?तर ???

ऑफर Change करा !_

काम होऊन जाईल .

📌(3) Choose Petfect platform

लॉकडाऊनचा परिणाम अजून पण आहे ,म्हणजे?लोकं पहिल्या सारखे बाहेर फिरत नाहीयेत !

बॅनर ,पॅम्प्लेट,आऊटडोअर ऍड याचा इतका वापर करू शकत नाहीयेत,मग सोशल मिडियाचा वापर जोरदार सुरु आहे कारण आपला ग्राहक हातात फोन घेऊन बसलाय आणि तो तिथे आपली वाट बघतोय ,आता आपण सगळीकडेच उपलब्ध राहू शकत नाहीये, बरं सगळे प्लॅटफॉर्म आपल्या कामाचे नसतात,मग कोणता प्लॅटफॉर्म आपल्या कामाचा आहे हे नीट निवडा.

सध्या आपल्या हातात हेच आहे.

जेवढं होईल तेवढं, परफेक्ट प्लॅटफॉर्म वर ऍक्टीव रहावं,भलेही मग फेसबुक , इन्स्टा ,व्हाट्सअप ,युट्युब काहीही असू शकतंय, जेणेकरून आपण सातत्याने मार्केटिंग मटेरियल (जसं ब्लॉग पोस्ट ,डिजिटल इमेजेस,किंवा कन्टेन्ट व्हिडिओ शेअर करू शकाल.

📌 (4) Start_Conversation

समजा आपण लोकल व्हाटसअप ग्रुप वर /फेसबुकग्रुपवर आहोत, तिथे ऍडवरटाईज करतोय,कस्टमर रिस्पॉन्ड करतोय, पण आता इथुन पुढे ग्राहकाला नीट हॅन्डलींग करायला चालू करा,कारण फक्त ऐड करून उपयोग आहे का काही ? ग्राहकाने ऍक्च्युअल खरेदी केल्यानंतरच आपला फायदा आहे ना?

मग अशी सिस्टीम बनवा कि , ग्राहकाने आपली जाहिरात बघितल्या पासुन Actual व्यवहार होईपर्यंत ग्राहकाला आपल्याला गाईड करायचंय ! याला कस्टमर पाईपलाईन किंवा सेल्स फनल म्हणायचं.

📌 (5) Refferals वाढवा :

मार्केटिंगची सगळ्यात इफेक्टीव पद्धत कोणती आहे ? ते विचाराल तर,ती आहे माऊथ टू माऊथ पब्लीसिटी,
किंवा Word Of Mouth!

आपल्या व्यवसायाची माहिती एक ग्राहक दुसऱ्या भावी ग्राहकाला देतो, पण पण पण …. ही रेफरल्स आपल्या हातात नसते ,ही गोष्ट Uncontrolled आहे , पण त्याला थोडीशी दिशा देऊ शकतो ! पण त्यासाठी थोडा स्ट्रॅटर्जीचा अभ्यास हवाय !

📌 (6 ) Join maximum Local groups:

Local एरियात मार्केटिंग करायचीये? म्हणाल्यावर जास्तीत जास्त लोकल किंवा असोसिरिएशन्सला जॉईन करावे लागेलच,बघा आत्तापर्यंतचं मार्केट,लोकांच्या गरजा,सवयी फार वेगळ्या होत्या, आता त्या बदलल्या आहेत .

📌 Local Business ला लिड घेण्याचा एक परफेक्ट चान्स असतो, कारण आपल्याकडे “लोकल” असल्याचा फायदा होऊ शकतो, जो घेतला पाहिजे !

📌 आजपर्यंत मार्केटिंगची गरज पडली नसेल,पण आज पडणार आहे, फ्री मध्ये ऍड करा,PAID ऍड कॅम्पेन करा ! सगळे प्रयत्न करा,कारण सगळेच भुकेले वाघ शिकारीसाठी बाहेर पडलेत आणि आपल्याला आक्रामक वाघ बनायचंय ! टिकून रहायचंय तर बनावंच लागणार आहे.

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा

© निलेश काळे
उद्योग निती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क ,औंध ,पुणे .
9518950764

_Udyogniti office: 9146101663_

Previous Post Next Post

One thought on “इथुन पुढे,सणवार सुरू होतील, तेंव्हा Local ग्राहक कसा मिळवाल ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *