“LUNA” आठवतेय का ? तीच कंपनी आता नवीन जोशात परत काय आणतेय ? बघीतलं का ?

आपल्या आजूबाजुला आज बॅटरीवर धावणाऱ्या स्कुटर बघायला मिळताहेत परंतु एक जमाना होता जेंव्हा स्कुटर म्हणजे ? एक बोअरिंग वाहन होतं .

त्या काळात एक कंपनी उभी राहिली जिने भारताला Luna सारखं वाहन दिलं या कंपनीने वाहन इंडस्ट्रीमध्ये क्रांती आणली होती .

नाव होतं “kinetic Enginerring” पुण्याच्या Firodiya फॅमिलीच्या या कंपनीने जपानच्या Honda बरोबर पार्टनरशिप करून भारतीय मार्केटला अशी स्कुटर आणली जी बिना गियरची आणि बटण स्टार्ट होती,

आणि भारतीय मार्केटमधे उदय झाला Kinetic Honda या स्कुटरचा .

अनेक प्रॉडक्ट हे मार्केट पेक्षा खूप पुढची टेक्नॉलॉजी आणतात आणि मार्केटला स्वतःचं स्थान पक्कं करतात, अशाप्रकारे टेक्नॉलॉजी एडव्हान्समेंट मुळे देखील आपण स्पर्धकावर मात करू शकतो

हा काळ आहे 1986 आणि भारतात अनेक प्रोफेसर नोकरदार लोकांकडे ही स्कुटर आली .

स्टाईल पॉवर आणि भरपुर स्पेस या मुळे ही स्कूटर बघता बघता मार्केटची बिग हीट साबीत झाली .

यामध्ये वेगवेगळे कलर्स होते ग्राफ्रीक्स होते आणि होते 90 CC चं दमदार इंजिन .

एखादया ब्रॅन्डने केवळ एकच प्रकारचा प्रॉडक्ट आणला तर मार्केटमध्ये कंटाळवाणा प्रकार घडतो .

म्हणूण kinetic Honda यांनी दुसरे DX नावाचं मॉडेल मार्केटला सादर केलं हे मॉडेल देखील खूप हिट झालं .

जसजसा काळ पुढे जायला लागला तसतसं बदलाचे वारे वाहु लागले, अशा बदलांना पटकन सामोरं जाऊन पाहिजे तसा बदल लगेच घडवला पाहिजे नाहीतर आपण मार्केटमधून फेकून दिले जातो

सन 1990 आणि भारतीय कंपना Bajaj ने भारतात पहिली स्कुटर लॉन्च केली bajaj sunny ( जे लोक आज 40 – 45 दरम्यान आहेत त्यांना हे मॉडेल नक्की आठवेल

sunny हा एकदम वेगळा प्रयोग होता आणि BajaJ ने महिला वर्ग डोळ्यासमोर ठेऊन हे मॉडेल आणलं होतं बघता बघता sunny ची विक्री वाढायला लागली .

तिकडे Honda च्या मनात देखील वेगळच काहीतरी सुरु होतं आणि त्यांनी लाँच केली Activa ( एक अशी गाडी जिच्या मुळे स्कुटरचे मार्केट पुर्ण बदलले )

या दोन मॉडेल पुढे Kinetic Honda DX ही एकदम old fashiond वाटायला लागली,भले त्यात फिचर्स होत पाँवर होती परंतु ग्राहकाचा रोख वेगळीकडेच झाला.

असं नाही कि Kinetic ने काहीच केलं नाही, यांनी बाईक सेगमेंट मध्ये , मोपेड सेगमेंट मध्ये वेगवेगळे प्रयोग केले पण नाही मार्केटने रिस्पॉन्सच दिला नाही,आपल्या स्कुटरचा नवीन अवतार SX 120 CC मध्ये आणला, परंतु External look तसंच ठेवलं, त्यामुळे इथे लोकांना ती आपल्याकडे आकर्षित करू शकली नाहीच.

मग Kinetic ने marvel,KB 10 वगैरे छोट्या स्कुटी सुद्धा मार्केटला आणल्या पण नाही .

हळूहळू Activa आणि इतर स्कुटी टाईप वाहनांची विक्री वाढत गेली फर्स्ट मुवर तर होतीच पण फास्टमुवर सुद्धा होती .

शेवटी 2008 साली Kinetic ने आपली स्कुटर डिवीजन mahindra ला विकुन टाकली… कारण महिन्द्राला सुद्धा डायरेक्ट टू व्हीलर मध्ये एन्ट्री करायला सपोर्ट हवा होता.

New beginning ;

जी कंपनी मार्केटमध्ये नाव कमावुन असते ती शांत कशी बसेल ?

भारतात E- वाहनांची सुरुवात होतेय म्हणल्यावर,2015 साली kinetic ने Sullaja Firodiya Motwani यांच्या लिडरशीप मध्ये kinetic Green या नव्या कोऱ्या वेंचरला सुरुवात केली .

या अंतर्गत Kinetic चे चार सेक्टर्स मध्ये वाहनांची निर्मिती करणे आणि मार्केटलिडर बनने ही त्यांची व्हिजन आहे .

Electric scooter
Electric Auto
E- cycles
E- Golf carts वगैरे या का प्रकार त्यांनी मार्केटला आणलेत .

Partnerships : कोणत्याही व्यवसाने मार्केटमधील चांगल्या कंपन्यांशी पार्टनरशीप करूनच पुढे जायचं असतं या नियमाला अनुसरून kinetic ने Italy च्या Lamborghini या जगप्रसिद्ध कंपनी बरोबर पार्टनरशीप केलेली आहे,
Hella,IIT Madras,BPCL या नामांकित ब्रान्डस बरोबर सुद्धा Kinetic ची पार्टनरशीप आहे.

येत्या काही दिवसात आपल्याला Kinetic ची इलेक्ट्रीक वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसतील .

तात्पर्य : Kinetic Honda आणि Luna या ब्रान्डसच्या भन्नाट यशानंतर जो फटका बसला तो बसल्यावर ही कंपनी शांत बसू शकली असती,पण खरा उद्योजक असं कधीच करीत नाही .
तो फटक्यातून शिकतो आणि नविन संधीचा हात धरून पुढे चालत राहतो.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
5th floor,विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक, नळस्टॉप, पुणे

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *