Mahindra का देणार आहे? Piaggio ला 12 कोटीचा दंड?

1,368 Views

Piaggio ने का केलीय महिंद्रावर केस ? वाचलीत का?

भारतामध्ये Piaggio ही इटालियन कंपनी ऍपे आणि तत्सम हे वाहन निर्मिती करते,यांचा ऑटो भारताच्या ग्रामिण भागातील मुख्य वाहिनी बनलाय,ज्याप्रमाणे ही कंपनी भारतात येऊन व्यवसाय करते, तसेच महिंद्रा ही कंपनी इटली आणि फ्रान्समध्ये व्यवसाय करते.

पण असं काय झालं ? कि महिन्द्रावर यांनी केस करून त्यांना दंड भरायला लावला ?

तर हि केस आहे Trade Mark & intellectual property infringement ची .

काय असते ही केस ? तर समजावून घ्या .

आजच्या युगात तुम्ही काही संशोधन केलं आणि त्याचे पेटंट घेतले असेल ? तर इतर कोणतीही कंपनी त्याचा वापर करून सेम टू सेम तेच तंत्रज्ञान वापरून उत्पादने मार्केटला आणून त्यापासून आर्थिक फायदा घेऊ शकत नाही .

तसं होत असेल ? तर तुम्ही कोर्टामध्ये त्या स्पर्धक कंपनी विरुद्ध दावा करू शकते.

जर कोर्टापुढे हे सिद्ध झालं कि, समोरच्या कंपनीने पेटंटच्या नियमांचे उल्लंघन केलंय, तर त्या कंपनीला जबर दंड लावला जाऊ शकतो आणि न्यायालये ते प्रॉडक्ट मार्केटमधून बाहेर काढायला लावू शकतात.

अशीच घटना घडलिये इटली आणि फ्रान्स या देशात.

आपली महिंद्रा ही मल्टीनॅशनल कंपनी आहे,वेगवेगळ्या देशात त्यांचे वेगवेगळे ब्रान्ड आहे, त्यातच Peugeot ही कंपनी महिंद्रा ग्रुपच्या मालकिची आहे.

ही कंपनी इटली आणि फ्रान्समध्ये व्यवसाय करते, तिथे या कंपनीने Metropolis ही तीन चाकी स्कूटर इटलीच्या आणि फ्रान्सच्या मार्केटमध्ये लॉंन्च केलीये आणि त्याची विक्री चालु केली.

परंतु या तीन चाकी स्कूटरमध्ये बॅलन्सींगसाठी वापरलेलं तंत्रज्ञान,हे इटालियन ब्रान्ड Piaggio ने त्यांच्या MP3 या स्कुटरमध्ये वापरलंय आणि त्याचं पेटंट देखील घेतलंय,

याचा अर्थ ते तंत्रज्ञान आता पियाजिओची intellectual प्रॉपर्टी आहे .

Piaggio ने या Trademark infringement चा दावा मान्य करून महिंद्राच्या मालकीच्या Peugeot ला 1.2 million Euro चा म्हणजे?12 कोटी रुपये दंड केलाय आणि हे तंत्रज्ञान वापरलेलं Metropolis हे वाहन मार्केटमधून बाहेर घ्यायला सांगितलंय.

या एका प्रकरणातून आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे कि, आजचा जमाना हा intellectual property चा आहे.

त्यामुळे उगाचच दिसलं म्हणून कोणीतरी वापरलेला फोटो/ व्हिडिओ/ आर्टिकल/तंत्रज्ञान/रजिस्टर्ड लोगो वगैरे लिखित परवानगी न घेता वापरू नयेत .

महिन्द्राकडे आहे पैसा,देऊन मोकळे होतील ते, आपल्या सारख्या सामान्य व्यक्तींनी अशा भानगडित न पडलेलं बरं.

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *