“Manike Mage Hithe” हे गाणं का हिट झालं? जाणून घ्या सेल्स टिप्स.

1,543 Views

तुम्हाला जर माझ्यासारखी गाण्याची आवड असेल? तर गेल्या काही दिवसांमध्ये,तुम्ही हे गाणं पुटपुटत असाल,

श्रीलंकन गायिका Yohini हिचे, “Manike Mage hithe” असे या गाण्याचे बोल आहेत,हे गाणं गेल्या तीन महिन्यात पाच कोटी लोकांनी ऐकलय /बघितलय .. इतकं कि, I

आता लगेच युटयुबला ऐकायला जाऊ नका,समजुन घ्या… लेख पुर्ण वाचा आणि मग ऐकायला जा ! कारण जर तुम्ही हे गाणं पहिल्यांदा ऐकाल,तर गॅरंटीने पुढचे काही दिवस हेच गाणे ऐकणार आहात.

आज भारत आणि आजूबाजूचा सार्क देशात हेच गाणं ट्रेडिंग आहे,का? असं या गाण्यात काय आहे?ज्यामुळे हे गाणं इतकं हिट झालंय.

जर आपण याला प्रॉडक्ट समजला तर तो प्रॉडक्ट हिट आहे.

या गाण्याच्या रूपाने एखादा प्रॉडक्ट हिट प्रॉडक्ट का हिट होतो?याचं अनालिसिस आपण करूया.

📒 Earwarm Song : जुन्या काळात असे गाणे यायचे,जे सिंपल असायचे, ते सहज गुणगुणता यायचे, या गाण्याचं वैशिष्ठ्य देखील तेच आहे.

“Finolex नं आणलं पाणी,शेतं पिकली सोन्यावाणी ” किंवा “धारा धारा .. शुद्ध धारा” हे जिंगल सुद्धा इअरवॉर्म जिंगल आहेत, तसे जिंगल आजही एखादया प्रॉडक्टला नेक्स्ट लेवलला नेऊन टेकवू शकतात, आपण त्यांचा वापर करायला शिकलं पाहिजे.

📗 Simplicity : या गाण्याचे बोल अनेकांना समजत नाहीत,त्या? सिंगरला नेमकं काय म्हणायचंय यातला अक्षर देखील काहीच कळत नाही, परंतु हे लक्षात येतं या गाण्याचे बोल अतिशय सिम्पल आहेत, साधी आहेत ,जे मनाला अगदी स्पर्श करून जातात, या गाण्याबरोबर जे म्युझिक वाटतं ते देखील फार साधं सोप आणि सिम्पल आहे, त्यामुळे त्यातून एक मेलडी निर्माण होते, म्हणजे ?याचा अर्थ असा कि,ज्या गोष्टी लोकांना सहजपणे लक्षात येतात,कळतात त्या बाबींमध्ये लोक जास्त इंटरेस्ट देतात.

आपण एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणला आहे परंतु त्याची जाहिरात इतकी किचकट केली की, लोकांना नेमके काय आहे? तेच कळत नसेल, तर आपला प्रॉडक्ट विकने तर दूर साधी चौकशी देखील होत नाही.

त्यामुळे आपल्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन हे नेहमी साधा सोपं सिम्पल आणि एका नजरेत कळणारं असावं,त्याची जाहिरात देखील साधी सोपी सिम्पल असायला हवी.

आपल्याला जो मार्केटला मेसेज द्यायचा आहे तो लोकांना कळेल अशा शब्दात हवा.

📙 Connections : या गाण्यात ती सिंगर कोणती भाषा बोलते आहे? हे अनेकांना कळलं नाही,परंतु ही भाषा श्रीलंकेत बोलली जाणारी “सिंहली” ही भाषा आहे,भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत, त्यामध्ये एक तर द्रविडीयन किंवा आर्यन भाषा आहेत आणि असं म्हटलं जातं की सिंहली भाषा ही बंगाली आणि ओडिया यांच्या पासून उत्पन्न झालेली उपभाषा आहे,या रिजनमधल्या लोकांचं कुठे ना कुठे तरी काही कनेक्शन आहेच.

त्यामुळे जेव्हा आपण एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतो किंवा एखादी सर्विस नव्याने सुरू करतो तेव्हा त्याची जाहिरात करत असताना त्याचं, काहीना काहीतरी कनेक्शन आपण शोधून मार्केटला मांडायला हवय, जेणेकरून आपल्याकडून त्याची विक्री चांगली होऊ शकते .

📙 Body Language :

या गाण्यांमध्ये आपण बघत असाल जी सिंगर आहे (Yohini) ती जितक्या सुरेल गळ्यानं गाते,तेवढे चांगले हा भाव ती डोळ्याने आणि स्वतःची भुवयानीं देखील करते, ती सातत्याने कॅमेरामध्ये एकटक समोर बघते,त्यामुळे ऐकणारा हा फक्त कानाने तीचं बोल ऐकतो असं नव्हे, तर तिच्या डोळ्यांना सुद्धा ते गाणं ऐकतो.

बॉडी लँग्वेजचा प्रभाव खूप मोठा असतो,हे अनेकांना का कळत नाही कि आपण फक्त प्रॉडक्ट विकत नसतो ते जे, विकणे आहे तोंडातून निघणाऱ्या शब्दांतुन घडत नसतं, तर ते आपल्या बॉडी लॅंग्वेज मधून सुद्धा दिसायला हवं ,तेव्हा कुठे समोरच्या व्यक्तीला आपल्या काय म्हणायचं आहे ? ते कळायला लागतं.

हे देखील फार महत्त्वाचा आहे

📕 Perfect Shoot :

त्या गाण्याची जी शूटिंग झालेली आहे, ती जर आपण नीट बघितली, तर ती अतिशय प्रोफेशनल लोकांनी केलेली आहे, त्या गायिकेने कशा प्रकारे हावभाव करायचेत? त्या कॅमेऱ्यामध्ये कसं बघायचं? गाण्याची क्वालिटी किती असायला हवी? हे सगळे अतिशय प्रोफेशनल पद्धतीने केले गेले आहे, तरी देखील त्यामध्ये सुटसुटीतपणा आहे, आपण आपल्या उत्पादनाची जाहिरात करताना पण त्याच्यामध्ये साधेपणा असला तरीही तो प्रोफेशनल साधेपण असावा.

कारण??? अशा प्रकारचा प्रोफेशनल साधेपणा आपल्या जाहिरातीला अतिशय प्रभावी बनवतो.

वरील पॉईंट्स काही रॉकेट सायन्सचे पॉइंट नाहीयेत,ते अतिशय कॉमन सेंसे पॉईंट आहेत आणि ते आतापर्यंत अनेक कलाकारांनी वापरलेले आहेत,

पाठीमागे प्रियाप्रकाशचा एक व्हिडिओ मार्केटमध्ये व्हायरल झाला होता, त्यामध्ये ती डोळा मारते आणि व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाला ”चिटिया कलाईया” सारखे गाणे हे लोकांच्या ओठावर फिरायचं कारण काय होतं? तर त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे, की ही मेलडी सॉंग्स आहेत.

आपण आपलं उत्पादन मार्केटला प्रेझेंट करत असतानादेखील,हेच तत्व वापरले तर आपले प्रॉडक्ट देखील, मार्केटमध्ये हिट होतील,यात काडीमात्र शंका नाही.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *