“Marico” कडून आपण खुप काही शिकू शकतो.

“Marico” या कंपनीकडून आपण खुप शिकू शकतो.

आजकाल असे सर्वत्र दिसते कि , Business म्हटलं कि तरूणाई पुढे फक्त Amazon ,Google किंवा Online Apps चेच मॉडेल्स येतात .
पण स्वता : च्या फैमिली बिझनेस मध्ये फार कमी रस घेतात काही तरुण .
त्यांचे करिता ही story .


हर्ष मारिवाला .. हे नाव भारतीय बाजारपेठेत अदबीने घेतले जाते .
असं काय केलय त्यांनी ?

याचं उत्तर आहे : खूप काही .
..
खाद्य तेल आणि डोक्याला लावायचे तेल हा त्यांच्या फैमिलीचा मुख्य बिझनेस .
खरंतर तेल हा प्रॉडक्ट एक कमोडिटी आहे ,,,, पण एका कमोडिटीला ब्रॅण्ड मध्ये बदलण्याचे साहस .. हर्ष मारिवाला यांनी केले.

Bombay oil mills चे अपत्य जन्मले

“Marico Ltd” केवढी मोठीये माहितय.

42,000 करोडची मार्केट कॅप असणारी कंपनी.

भारत,बांग्लादेश,मिडल ईस्ट देश , दक्षिण आफ्रिकेत व्यापार .
..
प्रचंड यशस्वी ब्रॅण्डस जसे :

पॅराशुट ,सफोला ,मेडिकर ,रिवाईव , सेट वेट , Livon,Hair & Care इ .

तसं पहाता फार अवघड होतं .
नारळ तेलाला टिन डब्यातून … प्लास्टीक बॉटल मध्ये आणणे हा प्रकार पॅराशुटनेच केला.

सुरुवातीला दुकानदार तक्रार करित होते कि उंदीर प्लास्टिक बॉटलला कुरतडतात,त्यांमुळे नुकसान होते .
पण काळाने बदलण्याचे ठरवले होतेच.

आज मारिवाला यांच्या प्रयत्नाने … प्लास्टीक बॉटल लाच पसंती आहे सर्वत्र.

लोकांना “बदल” तसा आवडत नाही .
पण स्वत : बदलेल्या माणसासमोर कोणाचेही चालत नाही .
..
innovation :

पॅराशूट चे कोणतेही पॅकिंग बघा !
या कंपनीने Packing मधील innovation ला खूपच महत्व दिले .
त्यामुळे fevicol प्रमाणेच Parachute पण स्वतःची unique पॅकेजिंग आणतेच .
..
जुने ते सोने,नविन पण आणणे : तसे दुसऱ्या विश्वयुद्धा पासून पॅराशुट ही नविन वस्तु मार्केट ला आलेली , आणि त्याच वेळी Bombay oil mills ने हे नाव वापरायला चालु केलेलं ,
तेच नाव पुढे ब्रॅण्ड झालं .
पण ..त्याच बरोबर नविन उत्पादनात पण marico उतरले .

उभी / आडवी वाढ:

marketing च्या भाषेत याला Horizontal & Vertical Growth असं म्हणतात .
Horizontical Growth मध्ये … आपण किती मोठया एरियात व्यवसाय करतो हे येते … तसे पैराशुट मुंबईतून सुरुवात होऊन … प्रथम भारतभर ,नंतर बाहेर देशात पोहचले .
Vertical Growth मध्ये …. आपण आपली प्रोडक्ट ची रेंज वाढवायची असते ,ती marico ने खूप वाढवली.
..
Organic , inorganic Growth:

management मध्ये या खूप महत्वाच्या Terms आहेत .
Organic Growth चा अर्थ नैसर्गिकपणे तुमचा ग्राहक वर्ग वाढत जातो,तुम्ही फक्त स्वतःच विकसित केलेल्या प्रॉडक्ट ला विकत असता आणि नैसर्गिकपणे वाढता .
तर
inorganic Growth मध्ये तुम्ही इतर कंपन्यांचे Brands विकत घेता . आणि आपली Product line वाढवता.
जसे सन 2006 मध्ये Parachute ने HUL कडून … “निहार शांती आंवला “हा ब्रॅण्ड विकत घेतला .
..
पूर्ण control : आज भारतात एकही असा नारळ तेलाचा ब्रॅण्ड नाही जो parachute ला टक्कर देईल .
पण parachute तेवढया वर शांत बसले नाही .
त्यांनी पैराशुटची श्रेणी वाढवली .
पैराशुट लाईट ,आयुर्वेदीक,जेल , लोशन ,शाम्पू , हेअर गेन या सर्वच क्षेत्रात कंट्रोल मिळवला .

Young Energy : Marico ही MBA students साठी फारच उत्तम कंपनी आहे.
ही कंपनी तुमच्या आयडीयाला वाव देते त्यामुळे फायदा कंपनीला होतो आणि students ला पण .
….
नफ्यात वाटा :

marico ही लिमिटेड कंपनी आहे , शेअर मार्केटला लिस्टेड आहे .
पण या पुढे जाऊन marico ही आपल्या share Holders ला Reguler ..Dividend देते .
त्यामुळे FMCG क्षेत्रात याचे चांगले नाव आहे .
..
प्रत्येक वेळी Marico ला यश मिळालेच असे नाही .
अक्षय कुमार हा हिरो .
खूप सिनेमे करतो ,त्यामुळे सर्वात जास्त फ्लॉप सिनेमे करण्याचं रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे .
तसेच Marico पण खूप वेळा changes करते आणि फ्लॉप होते .
पण त्यात वाईट काहीच नाही .
जो “धड” “पडणार” नाही तो धड उठणार कसा ?
..
बऱ्याच मराठी कुटुंबात …”वाटा” देण्यावरुन .. “खून” पडले आणि पडतात.

”वाटा” देणे चांगले असते , त्यात सर्वांनाच समाधान असते हे आपल्याला कधी कळणार कोण जाणे ?

अशी ही पैराशुटची स्टोरी ..
आपल्याला खूप काही शिकवून जाते .
यातून घेता येईल तेवढं घ्यावं आणि प्रगत व्हावं !
हीच सदिच्छा !
..

आपलाच
© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518959764.

Office
ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *