Marketing करताना पैसा वाया घालवायचा नकोय ? तर या 5 टिप्स लक्षात ठेवा

#business_coaching

Marketing करताना Good fit समोर करा !

📌 एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून घालवून लावणे ही खरंतर दुष्टपणाची गोष्ट आहे ,पण ज्यावेळी आपण मार्केटिंगचा विचार करतो, आपल्या वैयक्तिक प्रॉडक्टसाठी ठरावीक ग्राहकवर्ग निवडण्याची वेळ येते ? त्या वेळेला हा फॉर्म्युला अतिशय योग्य काम करतो.

📌 #Exclude_People :

आजचा जो जमाना आहे त्या जमान्यामध्ये आपण #सिलेक्टिव्ह असायला पाहिजे ,समजा तुमचा व्यवसाय हा लेडीजवेअर विक्रीचा आहे .

मग तुम्ही पुरुष किंवा लहान मुलांचे कपडे किंवा लहान मुलांना त्याच्या मध्ये ॲड करणे हे काहीच महत्वाचं नाही.

आपल्यासाठी पुरुष ग्राहक गरजेचं नाही,कारण ? पुरूषांचे कपडे/लहान मुलांचे कपडे हा मुद्दा बघायचाच नाही .

जी काही मार्केटिंग करायची आहे ती महिलांच्या आजूबाजूलाच करायची आहे,या गोष्टीला वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही.

म्हणून करता ज्यावेळी आपल्याला असं करावं लागेल ,त्या वेळी बिलकुल ही घाबरून जाऊ नका, किंवा स्वतःला वाईट वाटून घेऊ नका ,कारण ? आपण आपला टारगेट कस्टमर ठरवुन टाकलेला आहे, त्याच्या अवतीभोवती आपण मार्केटिंग जाळं विणायला पाहिजे.

#Dont_Appeal_to_Broad_client_Base :

बऱ्याच वेळी अनेक व्यावसायिक ही चूक करतात की,आम्हाला आमचा माल सगळ्यांनाच विकायचा आहे,

या पृथ्वीवरची सगळीच माणसं आमचा ग्राहकवर्ग आहे ,आणि मग सगळ्यांसाठीच हे जनरल मार्केटिंग करायला जातात ……….

पण आजकाल हे चालत नाही हो !

आपण एखाद्या स्पेसिफिक वर्गासाठी जर स्पेसिफिक गरज पूर्ण करत असू ना? तर आपल्याला जास्त महत्त्व प्राप्त होतं ,कारण सगळ्यांसाठीच आम्ही उपलब्ध आहोत,अशा प्रकारचे मार्केटिंग ही आपल्याला अनॲट्रॅक्टिव्ह बनवते.

#Be_Crystal_Clear :

आपल्याला आपल्या व्यवसायाविषयी च्या सगळ्या गोष्टी या अतिशय क्लियर माहीत पाहिजेत,बऱ्याचवेळा व्यावसायिक या अडचणीत सापडतात की ,मी या वर्गाला सेवा देऊ?का त्या वर्गाला देऊ? फक्त श्रीमंतांना सेवा देत असेल तर गरिबांचं काय? गरिबांचा कोण वाली आहे? जर मी गरीब वर्गाला सेवा देत असेल तर मग पैसे देणारा श्रीमंत वर्ग माझ्याकडे कसा येईल ? किंवा मी जर फक्त मध्यमवर्गीय लोकांना सेवा देत असेल तर मग मी वरचा आणि खालचा हे दोन वर्ग मिस करत आहे?

हे अशा प्रकारचे कन्फ्युजन आपल्याला व्यवसाय करताना फार धोकादायक ठरू शकतो.

#Be_More_Focused:

आपल्या स्वतःची नजर आणि आपला दृष्टीकोन हा पैसे कमावण्याच्या बाबतीमध्ये अतिशय सुस्पष्ट असला पाहिजे.

इथे जास्तीच इमोशनल होणे आपल्याला परवडणार नाही.

समजा आपल्या उत्पादनाची किंमत जास्त असेल आणि ते गरीब लोकांना परवडणार नसेल ! तर समाजातले अनेक लोक तुम्हाला शहाणपणा शिकवायला येतील ,ते म्हणतील की “मग आम्ही गरिबांनी काय करायच?

आता पुढची वाक्य ही जरा कडवट वाटू शकतात पण लक्षात घ्या,पैसा कमावताना बाकीच्या या गोष्टी डोक्यात घ्यायचाच नको जी काही समाजसेवा करायची आहे,जी काही इतरांना मदत करायची आहे?

ती आपला पैसा कमावून झाल्यानंतर करता येणे शक्य आहे !

ती आपण कमावल्या नंतर करू ,पण सुरुवातीच्या काळामध्ये मी त्याच्यासाठी पण बघेल आणि त्याच्यासाठी पण बघेल ही असली भावनात्मक मार्केटिंग चालणार नाही.

📌 #Be_Ruthless:

बरेचदा असं म्हटलं जातं की व्यापारी हा माणूस फक्त पैसा आणि पैसा हेच बघतो, मला इथे सांगायचय कि व्यापार्‍याने जर पैसा पैसा केला नाही तर मग कोण करणार?

आपण व्यापार करतो तो पैसा कमावण्यासाठी अगदी रतन टाटा किंवा बिल गेट्स हे लोक सुद्धा आपल्या “उत्पादनांना” प्रसाद वाटल्यासारखे फ्री वाटत नाहीत,

इथे या लेखाचा उद्देश असा आहे की ,आपण आपली मार्केटिंग स्टेटर्जी ठरवत असताना ,आपला ठराविक ग्राहक वर्ग कोणता आहे? तोच डोळ्यासमोर ठेवायचा, बाकीच्या कुठल्याही भावनांना समोर येऊ द्यायचं नाही, जो वर्ग आपल्या व्यवसायासाठी Good Fit नाही ,त्याला अगदी खड्यासारखं उचलून बाहेर टाकायचं,

त्यांच्यासाठी आपल्या प्लॅनमध्ये चेंज करायचे नाहीत आणि फक्त त्या सिलेक्टीव्ह लोकांसाठी मार्केटिंग करायची ,जेणेकरून आपल्या मार्केटिंग मध्ये कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन तयार होणार नाही.

,ज्यांच्यासाठी आपण मेसेज सोडतो त्या लोकांपर्यंत तो मेसेज अगदी योग्य प्रकारे जाईल, आणि तेच लोक आपल्या व्यवसायाकडे खरेदी करण्यासाठी येतील,कारण ???आपल्याला कचऱ्याची गरज नाही, आपल्या व्यवसायाला पैसा देणाऱ्या ग्राहकांची गरज आहे, टाईमपास करणाऱ्यांची नाही.

जो आपण मागू तेवढे पैसे देईल तोच आपला, बाकीच्यांनी काय करायचे आहे?हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे .

कडवट आहे पण मार्केटिंगचं हेच प्रिन्सिपल आपल्या कामाचं आहे,नाहीतर आपला वेळ,पैसा,मेहनत सगळं पाण्यात जाईल.

तेंव्हा Good fit समोरच मार्केटिंगला जा ! फायदा होईल.

शुभेच्छा.

www.nileshkale.com

https://youtube.com/channel/UCQpTaEu-sAODr3gCMqSH0rg

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *