McDonald ने वापरलेली,एक “आयडिया”,ज्यामुळे ते जगभर पसरले

McDonald ने लावलेली एक आयडीया ज्यामुळे ते जगभर पसरले .

© निलेश काळे.

📌 आज आपण एका अतिशय महत्वपूर्ण विषयावर लेख वाचणार आहात

आजकाल एक ट्रेंड बनलेला आहे, तो असा की लोकल जे व्यापार आहेत किंवा जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे,हे अगदी खरं आहे!

मग वेगवेगळ्या गोष्टी घडतात,मिडियाचं अटेंशन मिळतं, काही जण ही गोष्ट खरी आहे असाच सपोर्ट करून सुद्धा काही दिवस हे व्यावसायिक फोकस मध्ये राहतात, काहीजण तर अगदी सेलिब्रिटी वगैरे बनतात, परंतु त्यानंतर त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागते,आणि काही दिवसानंतर त्याआधीच सामान्यपणे व्यापार करू लागतात.

मग इतकं सगळं मीडियाचं अटेंशन भेटून सुद्धा हे व्यावसायिक फार मोठे का बनू शकत नाही बरं ??

📌 यासाठी एक नियम आहे आणि आज मी एका गोष्टीतून तुम्हाला तो नियमच सांगणार आहे.

आज ,तुम्ही पाहत असाल काही अमृततुल्य आणि फ्रॅंचायजी मॉडेल वाले व्यवसायिक स्वतःच्या इतक्या मोठ्या जाहिराती करतात,स्वतःची फ्रॅंचाईजी फी एकदम कमी ठेवतात, सगळा सपोर्ट करण्याचा वायदा करतात ,तरीसुद्धा त्यांना प्रसिद्ध फ्रॅंचायजी इतकं यश त्यांना मिळताना का दिसत नाही?

📌 कुठेतरी काहीतरी चुकत असेल, त्याच्यामुळे यश हे वाढत नाहीत.

दिवाळीच्या दिवसात ,फराळ देणाऱ्या घरगुती शेफच्या जाहिराती मार्केटमध्ये फिरायला चालू होतात, परंतु एकदा का दिवाळी झाली की हे लोक जातात कुठे?

तर हाच प्रॉब्लेम बघूया या स्टोरीत.

***********************

📌 तर कहानी अशी आहे..
काळ होता 1937.

दोन तरुण भावांनी मिळून एक छोटसं ड्राईव्हइन रेस्टॉरंट,कैलीफोर्नियाच्या Pasadena मध्ये चालू केलं.

या दोघांनी मिळून हॅम्बर्गर,सँडविचेस, हॉटडॉग आणि असे तीस-चाळीस उत्पादने बनवायला चालू केले

यांच्या रेसिपी उत्तम असल्यामुळे, हाताला चव असल्यामुळे अगदी पहिल्या वर्षापासूनच त्यांना चांगले यश मिळायला चालू झालं,
लोक येत होती ,गर्दी पण वाढत होती, आणि यांचं काम चांगलं वाढलं.

1940 पर्यंत त्यांना त्यांच्या रेस्टॉरंट दुसर्‍या मोठ्या जागेमध्ये San Bernardino या बुमटाऊनमध्ये शिफ्ट करावे लागले .

आता हे नवीन ठिकाण एक कामगारांच Booming ठिकाण असल्यामुळे, इथे त्यांचा बिझनेस अतिशय जोमाने चालू लागला, आणि 1940 त्यांचं वार्षिक उत्पन्न दोन लाख डॉलर्स गेले.

एखाद्या ड्राईव्हइन रेस्टॉरंटसाठी हा आकडा फार मोठा होता,

विचार करा !| हा काळ भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरचा काळ आहे.

1948 च्या दरम्यान या लोकांना असं वाटू लागलं की ,आता काळ बदलतोय आणि आपल्याला या रेस्टॉरंटच्या मॉडेलमध्ये बदल करावा लागणार आहे,तेंव्हा यांनी थोडे बदल केले, यांचा पहिल्यांदा मेनू जो मोठा होता त्यांनी तो एकदम कमी केला आणि एक अशी सिस्टीम बनवली जिथे ग्राहक आल्यानंतर किंवा त्याने ऑर्डर दिल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये त्याला ती ऑर्डर मिळाली पाहिजे.

यासाठी यांना स्वतःच्या किचनमध्ये असेम्ब्ली लाइनसारखं काम करावं लागे,

30 सेकंदात ऑर्डर तयार !अशी भन्नाट सिस्टीम त्यांनी तयार केली.

या सिस्टीमला त्यांनी “स्पीड डिलिव्हरी सिस्टीम” असं नाव दिलं!

आणि 1950 हे साल येता येता यांच्या एका रेस्टॉरंटची विक्री 3,50,000 डॉलर्स प्रति वर्ष पर्यंत जाऊन पोहोचली.

आता हे दोन भाऊ कोण होते? आणि यांच्या रेस्टॉरंट नाव काय होतं? असा विचार तुम्हाला पडलेला असेल

यांचं नाव होतं Dick आणि Maurice

आणि यांच्या रेस्टॉरंटच्या बाहेर पाटीवर नाव होतं …

“McDonald’s Hamburgers!”

या दोन भावांना एक फार मोठा अमेरिकन जॅकपॉट लागलेला होता,

हे दोन भाऊ किचनच हँडलींग करण्यामध्ये अतिशय उत्तम होते, यांनी हॉटेलमध्ये ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी एक सुंदर सिस्टिम सुद्धा बनवली होती,म्हणून यांनी 1952 सालामध्ये आपलं मॉडेल बाहेर विकण्याचा प्रयत्न केला
फ्रँचायजी करण्याचा प्रयत्न केला.. परंतु त्यात ते अपयशी ठरले !

📌 त्याचं कारण असं होतं की,

1)हे दोन भाऊ एक सिंगल हॉटेलचे मालक म्हणून चांगले होते.
2)त्यांना नफा कसा मिळवायचा? हे माहीत होतं.
3) त्यांना कॉस्ट कमी कशी करायची? हे चांगलं माहीत होतं.
पण त्यांच्याकडे लीडरशिपची क्वालिटी नव्हती

📌 सन 1954 साली या दोघा भावांच्या रेस्टॉरंटमध्ये “रे क्रॉक” नावाचा एक सेल्समन त्याच्या “चहा वेंडिंग मशीन्स” विकण्यासाठी आला, आणि त्या व्यक्तीने यांच्या हॉटेलची सगळीच सिस्टीम बघितली ,त्याला या प्रकारांमध्ये खूप मोठी संधी दिसली !

त्याने या दोघा भावांना एक ऑफर दिली की, “आपण फ्रॅंचाईजी मॉडेल उभा करू आणि देशभर याला पसरवू, त्यातला काही हिस्सा मी तुम्हाला देईल”.

आता हे दोघे हा प्रयत्न तर करून बसले होते,परंतु यांच्याकडे लीडरशिप क्वालिटी नसल्यामुळे,त्यांना त्यात यश आलं नाही,परंतु हा जो सेल्समन होता त्याच्याकडे लीडरशिप क्वालिटीचं भांडार होतं.

रे क्रॉक ने करार केला.

हा करार झाल्यानंतर 1960 पर्यंत मॅक्डोनल्ड रेस्टॉरंटची संख्या 100 झाली आणि पुढच्या चार वर्षांमध्ये त्यांनी तीच संख्या 500 पर्यंत गेली,

या दोन भावांनी तयार केलेल्या सिस्टीममुळे आणि रे क्रॉक यांनी लावलेल्या लीडरशिपच्या सिस्टिममुळे आज मॅक्डोनाल्ड जगातली दोन नंबरची रेस्टॉरंट फ्रॅंचाईजी सिस्टीम आहे.

*****************************

आता विचार करा,

सगळं चांगलं असून सुद्धा जर विकास करता येत नसेल,तर तो प्रॉब्लेम नेमका कशाचा असू शकतो???

“तर आपण याला डोक्याला लागलेलं झाकण असं म्हणू शकतो ” !

“John C Maxwell” या प्रसिद्ध लेखकाने या प्रकाराला आपल्या पुस्तकात “The law of the lid” असे नाव दिलंय !

तुमच्या लक्षात आलं असेल की, थोडक्यात यश मिळाल्यानंतर लोक एका ठराविक जागेवर स्थिर राहतात, आणि त्यांना तिथून पुढे सरकताच येत नाही.

त्याचं कारण हे असतं की,आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये टेक्निशियन मधून म्हणून तर चांगले असतो,परंतु त्या व्यवसायाला स्केल करायला लिडरशीप लागते.

व्यवसायात प्रचंड मोठया प्रमाणावर वाढ होण्यासाठी फक्त टेक्नीकल ज्ञान असून चालत नाही, तर त्याठिकाणी लीडरशिपचे गुणधर्म लागतात.

आता प्रत्येकाला “रे क्रॉक”तर मिळू शकत नाही,परंतु त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागतं.

खालील गोष्टी ट्राय करा:

अशावेळी,थोडासा एक्स्ट्रा विचार करावा लागतो,जरा जास्तीचा अभ्यास करावा लागतो,थोडक्यात सांगायचं तर,

“यशाच्या या धुरातून” बाहेर निघावं लागतं आणि तरीदेखील आपल्याकडून ते होत नसेल तर झाकण नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मदतीसाठी घ्यावे लागते.

आपल्या अवतीभवती असे अनेक उदाहरणं आपण बघू शकता.

भाऊ : भाऊ मिळून करा :

समजा एक भाऊ टेक्निकल स्किल्स मध्ये चांगला आहे तर, दुसऱ्याने त्यांच्या व्यवसायाला फार मोठं केलंय, असं पण खूप ठिकाणी दिसतं.

📌 एखाद्या व्यवसायीकाने प्रशिक्षकांकडून/ बिझनेस कोचकडून सल्ला घेऊन आपल्या व्यवसायामध्ये मोठी झेप घेतली आहे असं पण दिसतं .

किंवा एखाद्या व्यवसायामध्ये आपल्या पती किंवा पत्नीला बरोबर घेऊन खूप मोठी उडी घेतली आहे असं दिसतं.

बघा, कोण म्हणतं आपण मोठे होऊ शकत नाही?

आपल्याला काहीही करून आपल्या विचारांना लागलेले झाकण उघडायचं आहे किंवा झाकण नसणारी व्यक्ती बरोबर घ्यायची आहे.

यापैकी काहीतरी एक करा ! झाकणं उघडेल, प्रगती होईल.

नक्की !

शुभेच्छा
©निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सल्टंट,
आनंद पार्क, औंध, पुणे
9518950764,
ऑफिस : 9146101663.

Previous Post Next Post

2 thoughts on “McDonald ने वापरलेली,एक “आयडिया”,ज्यामुळे ते जगभर पसरले

  1. निलेश जी, छान लेख आहे. मी स्वताः एक व्यवसायिक आहे. नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि 3 वर्षात 2 डिलरशिप व 5 करोडचा Tarnover केला परंतु आता व्यवसाय Automode यायला हवा असे वाटते त्या साठी कुणाचे तरी मार्गदर्शन मिळावे असे वाटते . असे लेख आवडेल वाचायला.

Leave a Reply to Mangesh ketkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *