Me too marketing म्हणजे काय असतं?

Me too Marketing म्हणजे काय असतं?

📌 _साधारणपणे मार्केटमध्ये एखादा प्रॉडक्ट लॉन्च होतो , तेंव्हा त्याला कोणाचीही स्पर्धा नसते, पण जसं त्याला फायदा व्हायला चालू होतो, तसे काही स्पर्धक तयार व्हायला चालु होतात , सेम कलर , सेम टेस्ट , सेम किंमत , सेम फिचर्स , आणि सेम मार्केट !
जेंव्हा एखादी कंपनी दुसऱ्याचं बघून काहीतरी आपलंही आणावं, असा विचार करून बिल्कुल “त्याच्यासारखाच आमचाही आहे ” ! या तत्वावर मार्केटिंग करायला चालु करते , तेंव्हा या प्रकारच्या मार्केटिंग ला Me too मार्केटिंग म्हणतात .

भारतात,विशेषतः महाराष्ट्रात तर बिझनेसचा हा प्रकार फारच प्रचलित आहे.

तु पुढं जातोय का ? थांब आलोच , मी पण घेऊन , या विचाराने चालु झालेली प्रक्रिया या प्रकारे Mee too products घेऊन येते.

📌 जी कंपनी किंवा जो व्यवसाय मार्केटमध्ये पहिल्यांदा एखादा प्रॉडक्ट घेऊन येतो, त्याला Leading Company म्हणायचं आणि त्याना स्पर्धा देण्यासाठी म्हणुन जो व्यवसाय उभा राहिला त्याला Mee too ( किंवा चॅलेंजर ) व्यवसाय

हा जो चॅलेंजर असतो, तो जेंव्हा , माझ्याकडे त्याच्यासारखंच सगळं काही आहे , मग ? त्याच्याकडून घेण्याऐवजी माझ्याकडून घ्या, अशा प्रकारच्या मार्केटिंगला Mee too मार्केटिंग म्हणायचं.

भारतात सॅटेलाईट टेलिव्हिजन ची सुरुवात केली ती Tata sky ने, पण त्यांची सुरुवात बघून लगेचच Airtel TV ,dish TV , Videocon d2h आणि अन्य कंपन्यांनी पण आपल्या डिश मार्केटमध्ये आणल्या, या उदाहरणात टाटा स्काय ही लिडिंग कंपनी झाली आणि बाकीच्या सगळ्या चॅलेंजर किंवा मी टू कंपन्या.

लोक Mee too Marketing का करतात ? किंवा असे प्रॉडक्ट का आणतात

(1) Proven idea/ low risk:
_ मोठ्या कंपन्यांमध्ये नाही तर अगदी छोट्या छोट्या खेड्यात सुद्धा हा प्रकार फार दिसून येतो ,याची कारणं ?अनेक असतील, पण सगळ्यात मोठं कारण आहे की , समोरच्याने एखादा व्यवसाय चालू केलेला असतो त्याने त्या व्यवसायाची मार्केटिंग केली असते, ग्राहकांना किंमत समजावून सांगितलेले असते, आणि एकंदरीतच त्याने संपूर्ण कॅटेगिरीसाठी ग्राहकांना मनवलेलं असतं , संपूर्ण कॅटेगिरीसाठी मार्केटिंग केल्यामुळे ,लोक खरेदी करायला चालू करतात आणि एकदा का हा बिझनेसचा प्रकार सिद्ध झाला की त्याच्यामध्ये सेम टू सेम कॉपी करून येणारे वाढायला लागतात.

कारण ???? हे सोपे असतं, कुणीतरी रस्ता तयार करावा आणि त्यावरून इतरांनी चालावं असाच हा प्रकार आहे.

📌 (2) No innovation needed :

कोणताही अगदी नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी बरंच संशोधन करावं लागतं , त्या गोष्टीचा विकास करावा लागतो, मार्केटमध्ये झगडावे लागते आणि त्यानंतर एखादा व्यवसाय मार्केटमध्ये स्थिर होऊ शकतो.

म्हणजे इथे यश मिळवण्यासाठी पैसा आणि वेळ खर्च करणे क्रमप्राप्त आहे.

परंतु ज्या कंपनीला Me too मार्केटिंग करायची आहे त्या कंपनीसाठी तर सगळं आसमान खुल आहे.

म्हणून me too मार्केटिंग चा उपयोग केला जातो.

📌 (3) Skimming price :

जेव्हा एखादी कंपनी युनिक उत्पादन मार्केटमध्ये आणते, त्यावेळेला त्याला अक्षरशः स्पर्धा नसते आणि तो व्यवसाय प्रचंड प्रॉफिट कमवतो, आता इतर कोणता व्यवसाय प्रचंड प्रॉफिट कमावत असेल तर इतरांचे डोळे त्याच्याकडे लागणं स्वाभाविक आहे, आणि मग चढाओढ सुरू होते मार्केट शेअर मिळवण्याची.

इथे ग्राहकांना फायदा होणार असला तरीही मार्केटमध्ये त्या मर्यादित क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढायला लागली की की प्रत्येक कंपनीचं नफ्याचे मार्जिन कमी व्हायला सुरुवात होतं.

आणि मग कलह वाढतात.

**************************

Mee too Marketing करावी का?

📌 _वर सांगितल्याप्रमाणे मुळात मानवजात ही एकमेकांचे बघूनच प्रगती करत आलेली आहे , परंतु व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मिटू मार्केटिंग करणं हे इतकंसं योग्य मानलं जात नाही .

त्याची कारणे अनेक असू शकतील परंतु त्यातली काही ठळक कारण याप्रमाणे.

(1) CopyCat Labels:

समजा एखाद्या व्यवसायाने एखादा युनिक प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलेल्या आहे आणि दुसऱ्याने त्याची कॉपी करून सेम टू सेम उत्पादन मार्केटमध्ये लॉन्च केलं …….तरी इथे प्रश्न इज्जतीचा येतो, पहिल्या व्यवसायाला कोणीही ओरिजनल म्हणेल आणि दुसऱ्या किंवा त्याच्या पाठीमागून येणाऱ्या व्यवसायांना त्याची कार्बन कॉपी.

जसं येवले यांनी आपली चहाची फ्रॅंचाईजी सुरू केली, मार्केटमध्ये नाव कमावलं ,मार्केट मधून पैसा मिळवला आणि इतरांनी त्यांचं यश बघून सेम टू सेम फर्निचर, इंटरियर करून कॉपी करायला चालू केले.

“येवले अमृततुल्य Xअमकं अमृततुल्य”

म्हणून मार्केट मध्ये बघा.. जेवढे यश येवले यांना भेटलेय तेवढे यश या करणाऱ्या इतर व्यावसायिकांना भेटले का????

(2) No Premium Earnings:

बऱ्याचदा असं दिसून येतं की सुरुवात करणारी कंपनी किंवा व्यवसाय हा स्पर्धा नसताना भरपूर नफा कमावून घेतो आणि जेव्हा स्पर्धा वाढायला लागते, या वेळेला आपल्या किमती कमी करायला चालू करतो, म्हणजे? याचा अर्थ असा होतो की पाठीमागून येणाऱ्या कंपन्यांना कमी नफ्यावर व्यवसाय करणे भाग पडतं .

(3) Low margins and High Competition:

ज्या व्यवसायाने सुरुवात केलेली असते तो स्वतःला ओरिजनल असं म्हणून घेऊ शकतो, परंतु कॉपी करणारे एकापेक्षा अनेक जण असतील तर या कॉपी करणाऱ्या व्यवसायांमध्ये स्पर्धा तीव्र होते आणि स्पर्धा करायची असेल? तर सगळ्यात सोपा उपाय असतो,, तो म्हणजे किमती कमी करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणे .

बघा……. किमती कमी करून ग्राहकांना आकर्षित करणे ही low-level मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे.

यामध्ये आपण…… येणाऱ्या नफ्यावरच घालतो जे कि व्यवसायाच मूळ आहे.कैसा चलेगा ऐसा ?????

*****************************

असं होणार असेल तर आपण Mee too प्रकारची मार्केटिंग करून व्यवसाय का चालू करावा का ?

त्याच्यासाठी देखील उपाय आहे का तर ……………….हो !

Learn to Differentiate :

समजा आपल्याला एखाद्या व्यवसायाची आयडिया आवडलेली आहे,परंतु ती आयडिया जशास तशी कॉपी करत बसण्यापेक्षा त्यामध्ये आपण आपल्या प्रकारे काही बदल करून त्याला आपला फ्लेवर देऊन जर ती गोष्ट मार्केटमध्ये आणली तर त्याच्यात बदल केले तरेया स्ट्रॅटर्जिला डिफरन्सीएशन असं म्हणलं जातं

Differentiation is the key :

मी समोरच्या पेक्षा काय वेगळा आहे? माझे उत्पादन किंवा सेवा हे इतरांपेक्षा किती चांगली आहे? हे जर आपण व्यवस्थितपणे मार्केटला दाखवू शकलो तर तो प्रकार आपल्याला इतरांपासून वेगळा करतो.

म्हणून ज्या वेळी आपण व्यवसायाची सुरुवातीलाच मार्केटिंग करायला चालू कराल या वेळेपासूनच मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे? मी किती स्पेशल आहे? हे सतत दाखवण्याचा प्रयत्न चालू करा.

आपण हे जर करू शकलो तर इतर कोणीही आपल्याला कोणाचाही कॉपी करतो असं म्हणू शकणार नाही

जेव्हा मार्केट एखाद्या उत्पादनासाठी सॅच्युरेट झालेलं असतं, तेव्हा त्यामध्ये डिफरन्ससिएशन करणं बर्‍यापैकी महाग असतं, ही गोष्ट महाग पडते किंवा यासाठी कष्ट लागतात म्हणूनच व्यवसायिक असे बदल करत बसण्यापेक्षा तशी कॉपी करणं योग्य समजतात .

पण कळीचा मुद्दा आहे जोपर्यंत आपण स्वतःला मी कसा वेगळा आहे? हे दाखवू शकत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित किंमत मिळणार नाही.

तेव्हा तुम्हाला काय वाटतं ??

अशाप्रकारे कॉपी करून व्यवसाय करणे योग्य??? का स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करून व्यवसाय करणे योग्य?

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा.
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंदपार्क,औंध,पुणे.
9518950764

Business Consulting हवीये?तर कॉल करा
श्री ओमकेश मुंडे सर: 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *