Microsoft ने का बरं iphone आणि Blackberry ची प्रेतयात्रा काढली?

Microsoft च्या कर्मचाऱ्यांनी का बरं आयफोन आणि ब्लेकबेरीची प्रेतयात्रा काढली असेल?

हो ! तो आजचाच दिवस होता,ज्या दिवशी मायक्रोसोफ्टच्या Windows7 या मोबाईल निर्मितीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, iphone आणि ब्लॅकबेरी या दोन फोनची प्रेतयात्रा काढली होती.

तर त्याचं झालं असं की,त्या काळात iphone आणि ब्लॅकबेरी हे दोन फोन मार्केटमध्ये लीडर होते आणि त्यांना कुणीतरी टक्कर द्यायला पाहिजे म्हणून मायक्रोसोफ्ट सातत्याने प्रयत्न करत होती.

हे असली स्पर्धा,तुमच्या आमच्यातच किंवा आपल्या भावकीतच घडते असं काही नाही.

अति मोठ्या कंपन्यांमध्ये देखील अशाप्रकारे दुश्मनी असते, म्हणुन तर एखादा प्रॉडक्ट जोपर्यंत पूर्ण टेस्ट करून तयार होत नाही,तोपर्यंत कंपन्या त्यांच्या सगळ्या डिटेल सिक्रेट ठेवतात.

तर …मायक्रोसॉफ्टचे कर्मचारीदेखील असाच एखादा तगडा फोन ॲपल आणि ब्लॅकबेरीच्या विरोधामध्ये उतरवण्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यांचा पहिला यशस्वी स्मार्टफोन 1 सप्टेंबर 2010 रोजी तयार झाला.

कर्मचारी इतके खुश झाले, त्यांनी सक्सेस पार्टी करायचं ठरवलं कारण? असं वाटायला लागलं होतं की?आता विन्डोज सारखा ईतका तगडा प्रतिस्पर्धी उतरल्यामुळे ऍपल आणि ब्लॅकबेरी या कंपन्यांचा काही खरं नाही, आपण या दोन्ही कंपन्यांना मार्केट मधून उखडून फेकू.

मग या कंपन्यांना मुद्दामून जाणीवपूर्वक चिडवण्यासाठी, मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांनी काळे कपडे घातले,ॲपलच्या फोनची प्रतिकृती बनवून त्याचा एक प्रेत बनवलं, ब्लॅकबेरीच्या फोनची प्रतिकृती करून त्याचा एक शव बनवलं.

बँड,बाजा, फुगे पार्टी करत नाचत-गात गाणे त्यांनी ही प्रेत यात्रा एका स्टेडियममध्ये नेली, या ठिकाणी गाणे वाजवणे झाले,फुटबॉल मॅच झाली.

आणि अशाप्रकारे ही शव यात्रा त्याच ठिकाणी संपली

अनेकांना असं वाटलं होतं की, मायक्रोसॉफ्टने विंडोज सेव्हन हा फोन काढल्यामुळे इथून पुढे आपण आणि ब्लॅकबेरी या दोन कंपन्यांच्या मार्केट संपून जातील.

पण झालं का??नाही !

आज विंडोजचा तो फोन कुठे आहे? कोणालाच माहीत नाही, या कालावधीत ब्लॅकबेरी मागे पडलं, परंतु त्याच्या बरोबर विंडोजचा फोन देखील कधी आला होता? हेसुद्धा कोणाच्या लक्षात नाही.

आज तोच दिवस आहे जो 11 वर्षांपूर्वी होता.

एप्पल सगळ्या जगामध्ये राज्य करत आहे आणि विंडोज कुठेच नाही.

मग त्या पार्टीचा, माज दाखवण्याचा काय उपयोग झाला ?

आजही या शवयात्रेचे फोटो आणि व्हिडिओ गुगलवर उपलब्ध आहेत, चेक करा !

असंच असतं,माणसाने आपण जे करतोय?त्याचा अभिमान बाळगावा पण माज कधी करू नये.

© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औध,पुणे
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *