चर्चेमध्ये निगोसिएशन करण्याची जबरदस्त आणि प्रभावी पद्धत.

लोकां बरोबर निगोसिएशन मध्ये कसं जिकायचं?

#_Never_Split_The_difference

अमेरिकेच्या FBl चे प्रमुख टेरर निगोशिएटर (म्हणजे ? आतंकवाद्या बरोबर सरकारचा “माणुस” बनुन चर्चा करणारे व्यक्ती Chris Voss यांनी दिलेले फॉर्मुला )

📌फक्त व्यवसाय करतानाच नव्हे तर एरवीच्या आयुष्यात सुद्धा , I आपल्याला हजारो डिल्स कराव्या लागतात ,याला आर्ट किंवा स्किल म्हटलं जातं ,सायन्स नव्हे ,कारण इथे नियम काम करत नाहीत ,इथे भावनांचा खेळ असतो .

📌तेंव्हा जाणून घेऊयात Negotition skills , त्या माणसाने सांगितलेल्या ज्याला Father of Negotiation म्हणतात .

📌Chris Voss हे FBI चे टॉप निगोशिएटर म्हणुन रिटायर झालेत , ज्यांना जगातल्या सर्व आतंकवादी संघटनांशी निगोशिएशन करण्याचा प्रचंड अनुभव आहे , आणि ज्यांनी शेकडो वेळा हा प्रकार यशस्वी केलाय .

📌त्यांनी अनेक आतंकवादयांबरोबर डिल्स करून , बंधक बनवलेल्या लोकांना , सोडवलंय ,तेंव्हा समजून घ्या ! Chriss Voss यांनी सांगितलेल्या काही गोष्टी , ज्या आपल्याला यशस्वी डिल करण्यासाठी फायदयाच्या आहेत .

📌 #Listen : हा जगातला सर्वात जुना शिकण्याचा प्रकार आहे , म्हणजे त्यावेळी सुद्धा जेंव्हा आपल्याला संभाषनासाठी भाषा येत नव्हती , समोरच्याला नीट ऐकून घेणे हे बातचीत करता अत्यंत आवश्यक असते कदाचित त्यामुळेच आपल्याला निसर्गाने कान दोन दिलेत आणि तोंड फक्त एक !

************************************

📌 #Study_What_is_ his_Motive

आपण ज्या ज्या वेळी कोणत्याही परिक्षेला जातो , त्या प्रत्येक वेळी अभ्यास करून जातो कि नाही ? तसंच अगदी सेम , समोरचा माणूस कोण आहे ? कसा आहे ? त्याला का ही डील करायचीये ? त्याचा या पाठीमागे काय हेतू आहे ?त्याचा इतिहास कसा आहे ? ते अगदी कोणती मजबूरी आहे का ? वगैरे वगैरे सगळ्या बाजुंचा अभ्यास करूनच मग जायचं , याचे अनेक फायदे होतात !
त्या माणसाची कमजोरी , त्याचे स्ट्राँग पॉईंट , त्याचे हॉट बटन्स आपल्याला नीट नीटके माहित पाहिजेत म्हणजे आपल्याला जास्त कलतं माप मिळतं , म्हणून कधी पण आपला होमवर्क तयार पाहिजे

***********†**********************

📌 #Walk_Away_Power :

ज्यावेळी समोरच्याला हे लक्षात येतं कि ही डिल झाली न झाली तरी आपल्याला काही फरक पडत नाही ! आपण उठायला कधी पण तयार आहो त, त्यावेळी आपल्या सारखी डिल होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते , जर आपली उठायची तयारी नसेल तेंव्हा समजून जा आपल्याला जास्त किंमत मोजावी लागणार आहे .

याचा अर्थ उद्धट वागायचं असा घेऊ नये पण उठायची तयारी मात्र पाहिजे .

*************************************

📌 *(4)#Trial_Close_and_ Build_Emotional_Equity:

काय राव तुम्ही आपले माणसं असून थोडंही कमी करत नाही ? असा डायलॉग ऐकलाय का कधी ? .
ज्यावेळी कोणी असा डायलॉग वापरतो त्यावेळी समोरच्याला विचारच करावा लागतो,याला trial close म्हणतात,बहुतेक लोकं यावर घसरतात म्हणजे घसरतात , अगदी फळ विक्रेते पण तुम्हाला म्हणताणा दिसतील … “साहेब फक्त तुमच्यासाठी हा भाव ”
अरे ! हे काय आहे ?
तर इमोशनल जवळीक साधायचा प्रयत्न !एकदा का जवळीक झाली कि झालं,फार कमी लोकं याला काट वापरतात जसं कि …. ” सेठ धंदा अलग जगह ,, दोस्ती अपनी जगह

**************************************

📌 #Revision_ of _game_ plan
“एखादयाचा गेम करणे ” अशा प्रकारची म्हण आपल्याकडे आहेच तसा हा एक गेमच आहे .
होमवर्क कितीही केला तरीही परिक्षेला जायच्या एक दिवस अगोदर आपण सगळी रिवीजन करतोच कि नाही , तसं बातचीत कशी होईल , समोरचा काय बोलला म्हणजे आपण काय बोलायचं ? याची पूर्ण रिवीजन करूनच गेम प्लान करूनच जायचं म्हणजे तिथे आपला गोंधळ उडत नाही .

************************************

📌 # Ask_for_the_moon

समजा आपल्याला समोरच्या कडुन 3 वस्तू पाहिजेत , पण समोरच्याला 3 चं मागितले तर तो दोन देणार ,,, मग अशावेळी मागतानाच 7 मागायचे म्हणजे तो समोरचा किमान 3_4 वर येऊन थांबता , एकंदरीतच त्याला पण जिंकल्यासारखे वाटतेच ,,, याला Win_Win पद्धती म्हणतात ,,, तु भी खुश और मै भी !

*************************************

📌 #Be_Flexible

वर सांगितल्याप्रमाणे आपण किती जरी तयारी केली तरी ऐनवेळी काहीही घडू शकतं , परिस्थिती कधी कधी आऊट ऑफ कंट्रोल सुद्धा होऊ शकते, मग या ठिकाणी आपण Strong / Rigid राहण्यात अर्थ नाही , मग थोडं लवचीक राहावं लागतं ,
WWF मधली फाईट पण आपण बघतोच , तसंच JUDO ची पण बघतोच ना ! तसं .

परिस्थीती बघून वागणे याला contingency थेअरी म्हणतात .

📌ही contingency म्हणजे “वेळ बघून वागणे”,तर आपल्याला अत्यंत महत्वाची आहे!

📌ही वरची लिस्ट आपल्याला ,,
भाजीपाला खरेदी करताना असो वा करोडोचे व्यवहार करताना,दोन्ही वेळेस नक्की कामी येणार आहे !

📌 तेंव्हा Negotiation म्हणजे “तह” कसा करायचा ?हे शिकायचा असेल तर Chriss Voss यांचं हे पुस्तक घेऊन नक्की वाचा !

शुभेच्छा !

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
5th, Floor, विघ्नहर चेंबर्स, नळस्टॉप,पुणे .
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *