Phonepe कसं बनलं नं 1 ऍप ?

Phonepe:

आज भारतामध्ये अनेक मोबाईल वॅलेट कंपन्या कार्यरत आहेत,ज्यात Google pay , Paytm, Bharat pay , Phonepe, Amazopay ,whatsapp pay आणि अजुन सहा सात कंपन्या सामिल आहेत,परंतु या सर्वांमध्ये मोठा शेअर आहे Phonepe चा .

आज या ऍपचा वापर करून आपण पैसे पाठवू आणि स्विकारू शकतो, मोबाईल DTH लाईट गॅस बील भरू शकतो, कोणत्याही छोट्या मोठ्या दुकानांवर पेमेंट करु शकतो, सोने, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड वगैरेमध्ये गुंतवणुक करू शकतो,ते पण मोबाईल च्या एका क्लिकवर .

अनेकांना प्रश्न असेल कि,या ऍपच्या पाठीमागे एखादं मोठं कॉर्पोरेट नाव नसताना कशी बरे केली यांनी एवढी मोठी घौडदौड? तर चला जाणून घेऊया फोन पे च्या या यशाबद्दल .

ज्याप्रमाणे नोटबंदीचा फायदा Paytm ला झाला तसंच काहीसं घडलं Phonepe च्या बाबतीतही,

Sameer nigam, Rahul chari आणि Burzan engineer यां तिघांनी मिळून 2015 साली या UPI बेस्ड पेमेंट ऍपची स्थापना केली .

त्यावेळेस सरकार डिजीटल मनी ट्रान्सफर मेथडला प्रोत्साहन देत होतं त्यामुळे जे कोणी या क्षेत्रात उतरतील ? त्यांना सपोर्ट करतील अशाच पॉलीसी बनवल्या गेल्या होत्या, याचा अर्थ काय ? तर राईट टाईम राईट संधी ! फोनपे ला मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले .

हे तिघे संस्थापक वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव घेऊन फोने पे मध्ये एकत्र आले होते,याचा अर्थ असा कि उगाचच “चल करू काहीतरी ” असा विचार न करता यांनी, अनुभव वगैरे घेऊन व्यवस्थित प्लानिंग करूनच याची सुरुवात केली .

ही सुरुवात अशा काळात होती, जेंव्हा मार्केटमध्ये एवढी तिव्र अशी स्पर्धा नव्हती,यांना वाढण्यासाठी ब्लू ओशन मिळाला, आणि पब्लीकने यांना भरभरून प्रतिसाद देखील दिला .

नाव : या ऍपच्या नावातच सगळं काही आलं, फोन पे म्हणजे मराठीत “फोनवर” असा हिंदी अर्थ असलेलं नाव असल्याने “फोन पे” रातोरात हिट देखील झालं आणि ही लवकर केलेली सुरुवातच या कंपनीला फायदेशीर ठरली .

Flipkart acquisition :

मार्केटचा एक नियम आहे कि, इथे एक तर स्पर्धा केली जाते किंवा take over केलं जातं,आणि 2016 मध्ये फ्लिपकार्ट या त्यावेळच्या भारतीय कंपनीने फोनपे ला विकत घेतलं .

याचा अर्थ असा कि,अगदी कोवळ्या टप्प्या मध्येच एका मोठ्या कंपनीचे फायन्सिशीयल बॅकअप या ऍपला मिळाले आणि तिथून यांच्या प्रगतीला वेग आला .

Ground marketing :

फोनपे ने अगदी पहिल्या दिवसा पासून आक्रमक मार्केटिंग स्विकारली, त्यामुळे यांना सतत रिजल्ट मिळत गेला .
2015 मध्येच हे ऍप Live झाले होते तरीपण त्याची आजची जी कंडीशन आहे त्या पाठीमागे एक जबरदस्त ग्राउंड वर्कींग टीमची मेहनत आहे .

आपण बघीतलं असेल कि,हजारो मुलं आपल्या पाठीवर बॅगा अडकवून अगदी छोट्या गाव खेड्यातसुद्धा दुकान दुकान फिरून त्यांना QR scanner फ्री मध्ये QR कोड स्कॅनर देअन फोन पे च्या सिस्टिममध्ये आणायची अगदी आजही त्यांची ती टिम काम करते आहे म्हणून तर आज यांचे 28 million वापरकर्ते आहेत .
आज यांचा मार्केट शेअर जवळपास 45% आहे त्या खालोखाल Google pay आहे ज्याचा मार्केट शेअर 34. 41% आहे .

First mover advantage: आज ॲमेझॉन पे किंवा फेसबुकच्या मालकिचे व्हाट्सअप पे हे मार्केटला आलेत,परंतु ग्राहकाची श्रद्धा किंवा विश्वास जो पहिल्या mover ला मिळतो तो नंतर येणाऱ्या mover ला मिळत नसतो , तसंच इथे झालंय phonepe, first mover होता आणि त्याचा फायदा त्यांना झाला .

हे ऍप्लीकेश 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून मुळात डिजीटल भारताची सुरुवात जशी Paytm केली तशी त्याला वाढ मिळवून देण्याचं काम Phonepe ने केलंय .

Funding : कोणत्याही स्टार्टअपची सुरुवात चांगल्या आयडिया आणि त्या आयडियाला मोठं करणाऱ्या फंडिंगपासून होते, अगदी पहिल्या पासून flipkart ने या स्टार्टअपला फंडिंग केली पण तरिही यांनी 10 फंडिंग राऊंडमध्ये मार्केट मधुन पैसा उचलला त्याला व्यवस्थितपणे वाढ करण्यासाठी लावला आणि आज त्याचे रूपांतर यशात केलंय .

Revenue model :
तुम्ही जर पहिल्या पासुन Phonepe वापरत असाल ? तर तुमच्या हे लक्षात आलं असेल कि अगदी आत्ता आत्ता पासून म्हणजे ऑक्टो 21 पासून यांनी रिचार्ज वर 1 रु आणि 2 रु कमिशन आकारायला चालू केलंय पूर्वीच्या काळी यांची कमाई केवळ प्रमोशनल ऍक्टीविटी मधुनच व्हायची .
यातून एक मुद्दा समोर येतो तीच आजच्या स्टार्टअप्सची खासियत आहे .
तो मुद्दा म्हणजे ? अगोदर मोठा कस्टमर बेस गोळा करा , त्यांना चांगल्यातली चांगली सर्विस दया, सुरुवातीच्या काळात तग धरून स्वतःची वाढ करून घ्या आणि नंतर मग कमाईच्या मागे जा .
आपलं नेमक उलटं होतंय, कसं ? तर आपण अगदी Day 1 पासून कमाईच्याच मागे लागतो .
तसं करून उपयोग नसतोय, अगोदर काही दिवस फ्री मध्ये किंवा कमी नफ्यामध्ये काम करा, ग्राहकाचा विश्वास जिंका आणि त्यानंतर मग कमाई करा,तोच ग्राहक आपल्याला नाही म्हणत नाही .

Growth : National payment corporation of India च्या 2019 सालच्या आकड्यानुसार फोन पे ची ग्रोथ ही 857.22% इतकी होती .
1297.71 million व्यवहारातून 262,565 करोड रुपयाचा निधी या ऍपच्या माध्यमातून हस्तांतरित झाला .
तोच आकडा Google Pay या त्याच्या मोठ्या स्पर्धकासाठी 35% नी कमी होता .

आज phonePe हे जवळपास 30 कोटी भारतीयांच्या फोनमध्ये आहे परंतु इतकं सगळं करूनही ते प्रॉफीटेबल झालेलं नाही .

वॉलमार्ट जी फ्लिपकार्ट ची आजची पॅरेंट कंपनी आहे त्याना अशी अपेक्षा आहे कि पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे ? 2022 मध्ये ते प्रॉफीटेबल बनेल .

PhonePe च्या स्टोरीतून आपण काय शिकू शकतो .

1) आयडीया मनात आली तर त्यावर ग्रुपने काम करा .
2) first mover बनन्यात जशी रिस्क असते तसा फायदा सुद्धा असतो म्हणून फास्ट ॲक्शन घ्या !
3) ग्राऊंड लेवलला टिम उतरवून मोठ्या प्रमाणावर कस्टमर खेचा
4) सरकारच्या पॉलिसी बरोबर काम करून बाबी घडवून आणा .
5 ) कोणी मोठा इन्वेस्टर गुंतवणुक करत असेल ? तर ना न म्हणता पट्टकन निर्णय घ्या .

या स्टोरीतून आपल्याला बऱ्याच गोष्टी उचलून आपल्या व्यवसायात वापरता येतील ते वापरा आणि फायदा करून घ्या .

शुभेच्छा
© निलेश काळे
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
5th Floor, विघ्नहर चेंबर्स,नळस्टॉप पुणे .
9518950764.

Office: 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *