ROI कळला कि, व्यवसायाचं गणित कळतं

1,626 Views

ROI कळला कि व्यवसायाचं गणित कळतं

ROI हा एक कॉमन शब्द आहे ज्याचा एक दम साधा अर्थ ,,, “गुंतवलेल्या पैशावर मिळणारा परतावा” असा आहे ._

आपण व्यवसायात फक्त पैसे ओतत जातोय ,पण पैसा वापस पण कसा येतोय ?तुलनेने जास्त येतोय किंवा कमी येतोय?याचं कॅलक्युलेशन ROI मध्ये केलं जातं.

मग आपण पूर्ण प्रोजेक्टचा ROI काढणार असू किंवा एखादया ठरावीक मार्केटिंग कॅम्पेनचा , तो काढायचा एक फार्मुला आहे

ROI (%) = Net Profit/investment X 100

किंवा

ROI = gain- Cost / Cost

समजा आपण बँकेत 1 लाख रुपये फिक्स डिपॉसीट केलंय,बँकेने आपल्याला 6% व्याज दयायचं कबूल केलंय,,, म्हणजे आपण जी एक लाख रूपये इन्वेस्ट केले त त्यावर आपला ROI हा 6% होईल.

ज्यावेळी एखादा Angel investor आपल्या व्यवसायात पैसा गुंतवण्याचे ठरवतो त्यावेळी त्याचा पहिला प्रश्न हाच असतो, कि गुंतवणुकीचा ROI किती असेल ?

तेंव्हा आपल्याला हे सांगता आलं पाहिजे.

*****************

एखादी कंपनी ठरावीक ऍड कॅम्पेन साठी पैसा गुंतवतेय,आता त्या ऍड कम्पेन मधून जी विक्री वाढते,त्या वाढलेल्या विक्रीच्या आकडयाला ROI मध्ये मोजलं जातं.

****************

एक odd उदाहरणावरून समजून घ्या !

_भ्रष्ट उमेदवार, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना किती पैसा वाटतोय त्याच्या प्रमाणात मते मिळालीत का ? याच्यावर बारकाईने नजर ठेऊन असतो_.
_जर पैसा जास्त वाटला गेला आणि तेवढी मते मिळाली नाहीत तर मग भांडणे होतात ! कारण त्याला ROI कमी आला_

***********

Real Time Example वरून समजाऊन घेऊया

समजा आपण एखादया प्रोजेक्ट मध्ये 1 CRची इन्वेस्टमेंट केली, आणि आपल्याला त्यातून वर्षाअखेरीस,सगळा खर्च जाता 10 Lac फायदा झाला.
तर आपला ROI काय होईल.

10Lac/100 Lac = 10 %

इथे 10 % हा आपला ROI आहे.

*********

बऱ्याचदा लोक लोन काढून इन्वेस्टमेंट करतात.

अशावेळी जर लोन say 12% वार्षिक आहे तर ???_

10Lac/100L =10% ROI
पण

12% interestto 100L =12 Lac

म्हणजे आपला ROI हा आपल्या Cost to capital म्हणजे मुद्दालावर जाणाऱ्या व्याजापेक्षा कमी असेल तर आपण व्यवसाय किंवा इन्वेस्टमेंट करून सुद्धा साधारण 2% ( 2 Lac ) नुकसानीत जातोय,याचा अर्थ तोटा होतोय

व्यवसाय नुकसानीत जाण्याचं मुख्य कारण , ROI नीट कॅलक्युलेट न करणे हे असतं ,आपण इमोशनल झालो, काही खर्च हिशोबात न घेताच गिनती केली कि मग ती चुकते.

बऱ्याच जणांना ROI मोजायला पण आवडत नाही.

असं कसं चालेल,समाजसेवा करताना ठिक आहे,पण व्यवसायात आकडेच बोलतात.

तेंव्हा प्रत्येक प्रोजेक्टमधे किंवा एखादया ऍक्टीविटीमध्ये पैसा लावताना त्याचा ROI हा किमान दोन अंकी असावा हे सूत्र पाळा.

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औध,पुणे.
9518950764
office: 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *