Sales funnel म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा आपल्याला काही फायदा होतो का?

sales Funnel काय असतंय?

ग्राहक आपली जाहिरात बघीतली आणि लगे धावतच आपल्याकडे खरेदीसाठी आला असं होत नसतं,

त्यासाठी एक पद्धत आहे आणि बिझनेस कन्सलटिंग मध्ये तर याचा प्रत्यय रोज येत असतोय.

तर समजुन घ्या कि फनल ही एक अत्यंत प्रभावी टेक्नीक आहे,हे समजून घेण्याची कि,एक पूर्णतः अनोळखी व्यक्ती आपल्याशी प्रामाणिक असा ग्राहक कसा होतो?
बघा हा प्रवास आहे,ज्यात cold traffic ला,ग्राहकात कनव्हर्ट करू शकतो .

बघा आपल्याला सगळी दुनियाच आपला ग्राहक व्हावी वाटते,
पण तसं कसं होईल बरं ?

फार जास्त माती चाळावी लागते , तेव्हा कुठे थोडेफार सोन्याचे कण मिळतात ,तसंच खूप मोठया जनतेतून ग्राहक आपल्याकडे चाळून चाळून येत असतात.

साधारणपणे क्लासिक मॉडेल मध्ये 5 पायऱ्या आहेत .

1) Awereness :
2) Interest:
3) Evaluation:
4) Trial:
5) Adoption:

*****************************

(1) Awareness :

ही पहिली पायरी आहे.
आपण एखादा उद्योग चालु केला, त्याचा बोर्ड बाहेर लावला अथवा एखादा प्रॉडक्ट तयार करून विक्री साठी शॉप मधे दिला असता,लोक फक्त त्या बोर्डकडे अथवा प्रॉडक्टच्या पॅकिंगकडे फक्त बघतात.

“काही तरी नवीन आलंय”अथवा “नवीन चालू झालंय” ही उत्सुकता त्यांना त्याकडे बघायला लावते.
ही उत्सुक असणारी मंडळी सगळीच काही आपला ग्राहक नसते,तर ती फक्त उत्सुकच असते आणि Aware करायलाच ही स्टेप आहे.

यातली बरीच मंडळी पुढे जाऊन आपली Mouth Publicity करते.

तेंव्हा असं समजू नका कि,या स्टेजला खूप लोकं फक्त बघूनच चालले ,,, खरेदी तर कोणीच करत नाहीये .
मग या आयडीयात काही दमच नाहीये असा विचार करू नका.

लोकं गंमतीने बघतात ना ? मग तुम्ही पण सिरीयस होऊ नका !

जेवढ्या जास्तीत जास्त लोकांच्या नजरेसमोर उत्पादनाला आणू शकाल ते बघा ! लोकiना Aware करा.

सध्या बस्स फक्त एवढंच काम आहे.

(2) Interest :

ही पुढची पायरी आहे,दोनदा चाऱदा लोकांनी आपल्या प्रॉडक्टकडे किंवा जाहिरातीकडे बघीतलं कि, त्यांना,”नेमकं काय आहे?ते तरी बघूया तरी”, ही भावना इथे निर्माण होते.
ही मंडळी प्रॉडक्ट हातात घेतील, चौकशी करतील आणि खरेदी न करता निघुन जातील.

बघा ,, हळूहळू काय होतंय?

कि,लोकांना इंटरेस्ट वाढतोय,पण जेवढया लोकांना अवेर केलंय, त्याच्या पेक्षा कमी लोकांना इंटरेस्ट वाटतोय.

या स्टेजला पण लोकं पैसे देणार नाहीत, Dont’ worry !

लोकं इतक्या सहजासहजी मेहनतीने कमावलेला पैसा देत नाहीत,आपण त्याची अपेक्षा पण का करू नका.

ही ती स्टेज नव्हेच .

***************************
(3) Evaluation:

ही या फनल मधील तिसरी गोष्ट आहे.
इथे तुमच्यात इंटरेस्टेड असणारी लोकं फक्त इंटरेस्ट वाटलाय म्हणून खरेदी करत नाही.

फार क्वचित लोकं “वॉव ,,,How interesing” म्हणून खरेदी करतात.

अजुन एक समजुन घ्या कि भारतीयांची मानसिकता ही इंटरेस्टवर नाहीतर भरवशावर चालते.

ग्राहक या स्टेज मध्ये हे जोखतो ,कि हा समोरचा व्यवसाय किंवा प्रॉडक्ट भरवसा ठेवण्याच्या लायकीचा आहे किंवा नाही?

या स्टेजला आपली इमानदारी, आपली गुणवत्ता सगळं तपासतो ग्राहक त्यामुळे इथे त्याने खरेदी करण्याची खूप अपेक्षा नाही.

***************************

*(4)Trial* :

सैशे हा प्रकार आपल्या भारतातच फार चालतो,शाम्पू,खोबरेल,, आजकाल तर सेन्टस, झंडू बाम , पेस्टस,काय नाही येत यात ?

Dove,,, L’Oreal सारख्या अवाढव्य कंपन्यानी पण सॅशे हा प्रकार आणला.

कशासाठी ? तर गरिबातल्या गरिबाने “एकदा वापरून तरी बघावा यासाठी”

अनेक क्लासेस डेमो लेक्चर्स देतात , बॉलीवूडवाले प्रोमो,ट्रेलर दाखवतात.
काय आहे काय हे ?

मंडळी ,,, रस्त्यावरचा फळ विक्रेता सुद्धा फळाची फोड आपल्याला खायला देतो,मग खरेदी करा म्हणतो, कारण त्याला माहितीये,या स्टेपनंतर डायरेक्ट खरेदी होते.

कारण आपल्याला सेन्सेसवर जास्त विश्वास असतो.

वापरून बघीतलं,अनुभवून बघीतलं , तर अजून काय पाहिजे ?
लोक डायरेक्ट पुढच्या स्टेपला येतात.

*****************************

(5) Adoption : आणि फायनली या स्टेजला लोक आपले ग्राहक बनतात .

***************************

फनल ही एक नैसर्गिक क्रिया आहे,यात बदल होतच नाही .
अगदी अपवाद म्हणुन जर कोणी पहिल्याच स्टेजला ग्राहक झाला,तर तो किती टिकेल ?याची गॅरंटी साक्षात भगवंत पण देऊ शकत नाही.

म्हणून वेळ घ्या आणि वेळ दया.
“जल्दी का काम शैतान का होता है असं म्हणतात”.

“तर हा सेल्स फनल स्वतःच्या व्यवसायाशी रिलेट करा आणि मगच स्वतःच्या व्यवसायाकरिता नीट नीटकं फनल बनवा!”

धंदा हा येडयागबाळ्याचं काम नाही, इथे सिस्टीमॅटिकली काम करावं.

सोप्पं आहे.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा.
© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
5th floor, विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक , नळस्टॉप,पुणे.
9518959764

Business Consulting हवीये?तर कॉल करा !
Omkesh Munde sir: 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *