Show Flaws of your Competitor

620 Views

Sales Ninja

समोरच्याची कमजोरी/चलाखी/लबाडी/ उघड करून दाखवा !

मार्केटमध्ये नेहमी आपण चiगुलकीने वागून काम होत नाही.

माझ्या मेंटरचं तर ब्रीद वाक्यच आहे !

Don’t Be So Nice

📌 काही गरज नाही आपला जो स्पर्धक आहे, तो आपल्याकडे येणारे ग्राहक वळवत असतो, काहीही करून आपल्याजवळ येणारा पैसा थांबवायचा प्रयत्न करतो, मग त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आणि सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी काय करायच्या? पोटावर आल्यावर कोणीच सोडत नाही !

📌आता ही पद्धत फार सोज्वळ / सामाजिक सलोखा ठेवणारी/ आदर्शवादी नाही, पण तरीही काम करते !

📌 बघा Oligopoly चं तत्त्व आहे की आपल्याला त्रास देणारे शंभर-दोनशे पाचशे व्यावसायिक प्रतिस्पर्धी नसतात,

📌 साधारणपणे दोन किंवा तीन असतात आणि आता तुम्ही सगळे एकाच व्यवसायात असल्यामुळे व्यवसायातल्या बारकाव्याशी आपली चांगली ओळख असते.

📌 शोधा. शोध घ्या !
समोरच्याचा एखादा वीक पॉईंट शोधून काढा ,तो कुठे लबाडी करतोय का? हे शोधलं तर नेमकी तीच आपली बाजू स्ट्रॉंग करा, आणि ग्राहकांना उघडपणे सांगून द्या ,समोरच हे करतोय आणि आम्ही तसे वागत नाही.

📌 आता कित्येक गोष्टी या ओपन सिक्रेट असतात, या आपण एकदा का ग्राहकाच्या नजरेला आणून दिल्या, आणि समोरच्याच्या मनात आपल्या प्रतिस्पर्ध्याविषयी इज्जत कमी झाली, तर त्याचा फायदा डायरेक्ट आपल्याला होतो.

📌 काही होत नाही नेहमी आपण डिफेन्स राहण्यात काहीही पॉइंट नसतो आक्रमकपणा हा व्यवसायाचा महत्त्वाचा गुण आहे दर वेळी आपणच फटके का सहन करायचे?

📌 ग्राहक आपल्याकडे खेचायची ही सर्वत्र वापरली जाणारी पद्धत आहे.

आपण डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीत बघा, मोबाईल फोनच्या जाहिरातीत बघा, कार्स च्या जाहिरातीत बघा , साबणाच्या जाहिरातीत बघा , डायरेक्ट तुलना दाखवली जाते .

कधी कधी तर समोरच्या ब्रँडचं नाव घेऊन सांगितलं जातं, याचा ब्रांड असा आहे आणि आम्ही हे वेगळे देतोय.

संपला विषय….. समोरच्याचा पत्ता कट झाला की .आपल्याला रान मोकळं होतं.

📌 हातामध्ये धारदार विळा घेऊन समोरचा पत्ता कट करायला निघा .

काही बिघडत नाही !

निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
Office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *