Showroom चं दिसत नाही,मग OLA ची स्कुटर घेणार कुठून?

1,497 Views

Showroom तर नाही,मग OLA स्कूटर घेणार कुठून?

15 Aug 2021 या रोजी भारतातील सुप्रसिद्ध स्टार्टअप ओला यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहोत अशी घोषणा केली होती.

घोषणा केल्यानंत OLA ने आपल्या स्कूटरचे पहिले चित्र दुनियेला दाखवले आणि बुकिंग घ्यायला सुरुवात केली,499 रुपयांमध्ये ओला बुक करता येत होती त्यामुळे अगदी चोवीस तासांमध्ये एक लाख स्कूटरची बुकींग झाली.

आज आठ सप्टेंबरपासून ओला, प्रत्यक्ष मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे,पण तरीही अजूनही अनेकांच्या मनात प्रश्न असतील की तो OLA ने स्वतःचे शोरूम तर कुठेच काढलेले दिसत नाहीये,तर मग यांची स्कूटर मिळणार कुठून?

तर…. या स्कु्टर डायरेक्ट होम डिलीवर केल्या जाणार आहेत.

होय … तुम्ही बरोबर वाचलंत.
OLA ने “डायरेक्ट सेल टू कस्टमर” हे सेल्स मॉडेल निवडलं आहे,अशा प्रकारे या कंपनीने,डिलर्स/सब डिलर्स या पारंपारीक मॉडेलला पर्याय उपलब्ध करून दिलाय.

या करिता कंपनीने स्ट्राँग लॉजिस्टिक सपोर्ट सिस्टीम तयार करून ठेवलीये.

OLA हे एक स्टार्टअप आहे, त्याच्यामुळे ते प्रत्येक बाब स्टार्टअपच्या स्टाईलने करतील, अशी अपेक्षा होती,सेम तसंच घडतंय.

यांनी आपल्या स्कूटर विक्रीसाठी पारंपारिक पद्धत निवडली नाहीये,तर ऑनलाईन पद्धत निवडली जाणार आहे.

याची पद्धत अशी आहे.

📌 सुरूवातीला OLA Electric च्या वेबसाईटवर लॉगीन करावं लागेल.

📌 त्यानंतर आपले चॉइस केलेले मॉडेल, त्याचा कलर,आपले पर्सनल डिटेल्स भरा, 499 इतकं टोकन पेमेंट करावं लागेल किंवा त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या बँका मार्फत फायनान्स ऑप्शनचा पर्याय निवडावं लागेल.

📌 ही प्रोसीजर पूर्ण झाली कि, आपली ऑर्डर कधी मिळेल?याची तारीख आणि वेळ कळवण्यात येईल.

📌 अशा प्रकारे ओला इलेक्ट्रीक स्कूटर आपल्यापर्यंत ऑनलाईन खरेदीच्या माध्यमाने पोहचेल.

📌 आता प्रश्न येतो,तो आफ्टर सेल सर्विसचा, तर यासाठी देखील कंपनीने OLA App सारखा ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिलेला आहे, कोणत्याही प्रकारचे मेंटेनन्स ची सेवा या प्रकारातून अगदी घरपोच मिळेल ! असा या कंपनीचा दावा आहे.

कदाचित पुढे जाऊन यांच्या शोरूम्स वगैरे येतील,पण सध्यातरी या स्कूटर्स ऑनलाइनच खरेदी करता येतील.

स्टार्टअप कंपन्या अशाच प्रकारे,एका क्षेत्रात आपली छाप उमटवतात आणि विश्वास संपादन करतात.

एकदा का हा विश्वास झाला,कि त्यांनी आणलेला कोणताही प्रॉडक्ट या विश्वासाच्या जिवावरच विकला जातो.

📌 तुम्हाला काय वाटतं ? ज्याप्रमाणे Xiomi ने सुरुवातीला फक्त ऑनलाईन विक्रीचा मार्ग निवडला आणि यशस्वी झाले, तसे ओला पण यशस्वी होईल का ?

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध, पुणे .
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “Showroom चं दिसत नाही,मग OLA ची स्कुटर घेणार कुठून?

  1. सर्विस ओरिएंटेड प्रोडक्ट मध्ये नंतर सर्विस कशी मिळते या वर पुढील यश अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *