social media पोस्ट मध्ये हॅशटैगचं महत्व आणि काही टिप्स

208 Views

(#)Hashtag वापरा आणि व्यवसाय वाढवा !

जस जसा सोशल मिडियाचा वापर बिझनेससाठी वाढलाय त्याप्रमाणे आपली जाहिरात उठून दिसायला हवी असा ट्रेंड देखील वाढलाय.

आपण गुगल वर काही शोध घेतला,तर आपल्याला जाणवेल कि,काही विशिष्ठ साईटस लवकर समोर येतात, म्हणजे?पहिल्या दूसऱ्या सर्च पेजवर दिसतात,

असं दिसणे म्हत्वाचं असतं, कारण? कोणतीही व्यक्ती खूप जास्त पुढे पुढे जात सर्च करत बसत नाही, या पाठीमागे बेसिक मानसशास्त्र काम करतं.

म्हणूनच बहुतेक कंपन्या, याकरिता SEO म्हणजे? Search Engine Optimization करतात ( हा भाग थोडा खर्चिक आहे )

आता हे झाले गुगल करिता.

पण इंस्टाग्राम, फेसबुक, युटयुब यासारख्या सोशल मिडियावर पोस्ट करताना हैशटॅग ( # ) वापरला जातो.

आपण यासाठी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर येणाऱ्या स्पॉन्सर ऍड बघू शकता.
# (हॅशटॅग) का वापरायचा?
तर बघा, या सगळ्या सोशल मिडिया पाठीमागे, Artificial intelligence काम करते, आणि त्याच्या नियमानुसार # लावलेला शब्द किवर्ड बनतो.

# हे एक “symbol “(चिन्ह) आहे, ज्यामुळे तुम्ही जी माहिती पोस्ट करत आहेत त्याला ( “लेबलिंग ” ) label करत त्यामुळे या शब्दांनी माहिती शोधणार्यास पटकन सापडू शकते .

: #Food यावर क्लिक केले असता आपल्याला खालील प्रमाणे माहिती दिसू शकते, त्या रिलेटेड पोस्ट दिसतात.

त्यावरून आपण आपल्याला हवी ती माहिती पटकन मिळवू शकतो तसच जी लोकं तुमच्या friend लिस्ट मध्ये नाहीत त्यांच्यापर्यंत हि तुम्ही पोहोचू शकता.

मग हा सहज सोपा मार्गाचा आपण सर्वोतोपरी उपयोग करून घायलाच हवा !

“# “आपल्याला अनेक लोकांपर्यंत “फुकटात” पोहोचवण्यास मदत करतो .

SEO (Search Engine Optimization ) करण्यासाठी हजारो keywords शोधायचे ,त्याकरिता भरपूर पैसे खर्च करायचे, यापेक्षा हा सहज सोपा उपाय आहे.

आपला व्यवसाय वाढल्यावर जरूर SEO मध्ये इन्व्हेस्ट करावेत .

याचे काही बेसिक रूल्स आहेत,तेवढे लक्षात ठेवले कि झाले !

(1) Organically म्हणजे? नॅचरली, आपला प्रभाव यामुळे वाढतो.

(2) इंस्टाग्रामसारख्या साईट्सवर आपण आपल्या पोस्टच्या रिलेटेड 50 हैशटॅग वापरू शकतो.

परंतु 10-15 हॅश टॅग वापरणे हे योग्य मानलं जातं.

3) फेसबुक पोस्टला सुद्धा हॅशटॅगच्या वापरामुळे आपली पोस्ट लवकर समोर येते.

4) या मधे एक शब्द असेल तर,
त्या शब्दाच्या पुर्वी अगदी चिकटून हॅशटॅग वापरावा.

5) याचा वापर कसा करावा? कोणते कि वर्ड वापरावे?हे लक्षातच येत नसेल?तर इतरांनी कोणते कि वर्ड वापरलेत?ते बघा, अभ्यास करा, आणि वापरा…. सोप्पंय !

जसे
#Udyogniti #Coaching
इ .

जर आपण वाक्य वापरणार असाल तर, त्यातील शब्दांमध्ये अंतर न ठेवता लिहावे

जसं

#make in India असे न लिहिता

#makeinindia असे लिहावे.

अनेक फेसबुक ग्रुपवर पोस्ट करण्याआधी, त्या ग्रुपचे नाव हैशटॅग लावून टाकणे कंपलसरी असते, ते करावे त्यामुळे तिथे आपली पोस्ट पट्टकन अप्रूव होते.

सोशल मिडियावर पोस्ट करताना ( # ) चा वापर करा,आणि अगदी फ्री मध्ये, समोर दिसा !

हे आपल्या फायदयाचं आहे.

वापरा आणि आपली विजिबिलीटी वाढवा !

शुभेच्छांसह,

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क, औंध, पुणे.
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *