Startup चालु करताय ना ?तर मग या सिक्रेट सॉफ्टस्कील्स तुमच्याकडे असायलाच हव्यात

हजारो कोटीच्या स्टार्टअपच्या फाऊंडरकडे या सिक्रेट स्किल असतातच.

एक जमाना होता,जेंव्हा आपल्याकडे ( कामाला असलेल्या व्यक्तीला तुच्छ वागणुक दिली जायची, त्याची पिळवणूक होईल असे काम करून घेतलं जायचं.

पण नविन स्टार्टअपच्या जमान्यात हे असलं चाबुक कल्चर चालत नाही, कदाचित हेच कारण असेल कि,या नवीन सुरू झालेल्या कंपन्या हजारो कोटीच्या घरात फारच लवकर पोचल्या.

तर आज जाणुन घेऊया कि,हे स्टार्टअपच्या फाऊंडरकडे कोणत्या स्किल असायला हव्यात?

हे खालील पॉईंटसवरून आपल्याला समजून येईल.

📌 Diplomacy : माणसं म्हणजे काही भावनाशून्य मशीन्स नसतात,इथे प्रत्येकाचाच एक अस्तित्व असते, त्यामुळे प्रत्येकामध्येच राग, द्वेष, प्रामाणिकपणा,समोरच्याशी मैत्रीची भावना, ऑफिसातलं राजकारण हे सगळंच आलं.

तर अशावेळी एका . स्टार्टअपच्या फाऊंडरला डिप्लोमसी वापरता आली पाहिजे,याचा अर्थ कोणालाही फार न गोंजारता न हाडतुड करता का करवून घेणे.

तर डिप्लोमॅटीक वागणे हा पहिला गुण हवाच आहे.

📌 Gravity :

आपलं मत थोडक्यात, शब्दात वेळेत, योग्य प्रकारे, परिणामकारक रित्या सांगता येणे याला ग्रॅविटी म्हणतात,हे एक परफेक्ट स्कील आहे.
मग ते मत सांगणं प्रत्यक्ष समोरासमोर सांगणे असो कि लिखित स्वरुपात सांगणे,

अशा प्रकारे आपलं मत,शॉर्टमध्ये सांगितल्या गेल्यामुळे,कोणाचाही वेळ बरबाद होत नाही आणि आवश्यक तो परिणाम देखील साधता येतो.
नाहीतर काही जण उगाचच मिटिंग वर मिटिंग घेत बसतात,त्यातून फारसं काही साध्य होत नसतंय.

📌 Vision :
प्रत्येक व्यवसायाचं एक Vision, Mission असायलाच पाहिजे, उगाचच दिसलाय चान्स/जमेल असं वाटतंय म्हणून किंवा कोणीतरी चालू केलंय म्हणून त्याला कॉपी करण्यासाठी व्यवसाय चालूच करू नयेत, जर केला?तर परफेक्ट Vision असायला पाहिजे,ज्यामुळे मग आपला स्टाफदेखील त्या व्हिजन . नुसार काम करेल,आपल्यामध्ये हे स्कील असायला हवय कि,आपलं Vision आपले कर्मचारी पुर्ण करतील.

📌 Leadership by example :

या लेखाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सांगितलंय कि, उगाचच चाबुक हातात घेऊन कर्मचाऱ्याकडून काम करवून घ्यायचे दिवस गेले .

आता दिवस आहेत,उदाहरण पेश करून इतरांना ते फॉलो करायला लावायचे.
तेंव्हा आपल्या स्टाफने कसं वागल पाहिजे? हे स्वतः उदाहरण घालून देऊन शिकवलं पाहिजे .

📌 Accountibility :

सामान्यपणे माणसाचा स्वभाव असाय कि. तो ह्क्क मागायला पुढे असतो आणि जिम्मेदारी स्वीकारायची वेळ आली की मागे सरकतो , पण जो व्यक्ती एखादया निर्णयाची जिम्मेदारी घेतो तोच चांगली लिडरशिप करू शकतो हे समजून चला.

📌 Active listening :

“गरज पडली तर दगडाचा पण सल्ला घ्यावा” असं आपले पुर्वज सांगायचे.

कारण?कोण ?कधी? एखादया चांगल्या आयडियाला घेऊन आपल्याकडे येईल?
हे सांगताच येत नाही,त्यामुळे आपल्या टिममधील सर्वानीच बोलावं,यासाठी आयडिया आणाव्या यासाठी वातावरण तयार करायला हवंय.

📌 Inclusion in workplace :
तो जमाना होता,कर्मचाऱ्याच्या रंगावरून,स्त्री पुरुष असणाऱ्यांवरून भेदभाव केला जायचा,कर्तृत्वावरून शंका घेतली जायची, नवीन बिझनेस सिस्टीममध्ये असं चालत नाही.

आपण लिंग,जात,धर्म,वेश,भाषा यावरून कोणाला कमीपणाची भावना निर्माण होईल,अशी वागणूक दिली जाऊ नये.

Inclusiveness हे तत्व असंच सांगतं कि, कामाच्या ठिकाणी कुठलाच भेदभाव केला जाऊ नये, कारण? आजच्या वातावरणात हे चालत नाही.

📌 Passion for job & people :

एखादं काम करण्याची आणि माणसं साभाळण्याची पॅशन ही सर्वात मोठी ताकद असते,ज्या व्यक्तीकडेवरिल सर्व गुणधर्म अधिक अशी पॅशन असेल त्या व्यक्तीचं स्टार्टअप व्यवस्थित ग्रो होईल.

वरिल skills या Learnable म्हणजे? शिकण्यासारख्या आहेत,शिका आणि ऑफिसमध्ये वापरा फायदा होईल .

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *