आजच ही गोष्ट करयला सुरुवात करा! प्रोफिट वाढेल

143 Views

©निलेश काळे.

Profix maximizer म्हणजे ते गुणधर्म ज्यामुळे चालू व्यवसायात प्रौफीट नक्की वाढते.

Think Time म्हणजे नेमकं काय ?
तर ध्यान लावून,मांडी घालून डोळे मिटून ताठ बसणे म्हणजे thinking आहे का ? तर नाही,हा वेळ Thinking Time नाही , याला मेडीटेशन म्हणू फार तर.

तुम्ही ते Think & Grow Rich वाचलंय का ?
या पुस्तकाचं नाव Work Hard / smart & Grow Rich ठेवता आलं असतं ना ? पण Think चं का ठेवलं असेल बरं ?तर रॉबर्ट कियोसाकीनुसार
उत्थान किंवा प्रगती ही फक्त एखादी क्रिया करण्यामुळे नाही, तर विचारपूर्वक क्रिया करण्यामुळे होते.

Business हे मुळात intellectual sport सारखं असते,इथे ऍक्शन घेण्याअगोदर तयारी साठी जास्त वेळ घ्यावा लागतो .

म्हणून असं म्हटलं जातं कि,एका बिझनेसमनचा चांगला गुणधर्म असा आहे कि,त्याने स्वतःच्या बिझनेस बद्दल,,, एकांतात काही वेळ शांतपणे विचार करावा,अगदी फक्त 20 चं मिनीटे रोजची,पुरतात अगदी .

त्यात जर अजून पेपर वर विचार केला तर तो अगदीच उत्तम .

असा विचार करताना बुद्धी इकडे तिकडे भरकटू नये म्हणून एक स्टँडर्ड प्रश्नावली आहे .

ती अशी.

(1) ते काय आहे? जे चुकू शकते ?
(2) ते काय आहे? जे मला माहित नाही.
(3) ते काय आहे? जे मला दिसत नाहीय

या वरिल प्रश्नांची उत्तरे रोज वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्वतः कडून
घ्या,हो अगदी रोज.

न चुकता! ठरावीक वेळेला.

बघा फरक पडतो का नाही ?

📌बघा stupid लोकांना प्रश्न विचारणं आवडत नाही, कारण? त्यांच्या मते त्यांना सगळं कळत असतं ….

तुम्हाला आवडतं का प्रश्न विचारायला ?

Tony Robbins म्हणतो … “Smart people have good Answers , Genius have good Questions ”

म्हणून आपल्या Think time मध्ये Blank Paper वर प्रश्न लिहून काढा ,,, आणि थोडया वेळात मेंदूला विचारा Best possible उत्तरं !

मिळतील,बेस्ट उत्तरं मिळतील, पण आपण हे करायला हवं.

अगदी जुनाट समस्येवर सुद्धा चमत्कारीक उत्तरं मिळतील यामध्ये .

काय म्हणता ???
वाटत नाही !

आजच वेळेवर विचार करण्यासाठी वेळ काढा !

जादू होईल … उत्तरे नक्की सापडतील आणि तुमच्या व्यवसायातील प्रॉफीट नक्की वाढेल.

फ्री ची आयडीया आहे,करू शकाल !

Join Facebook Community : Click here to join

 

शुभेच्छा.

निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
औध, पुणे.
9518950764
Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *