एक शब्द जो विक्री वाढवतो : गॅरंटी !

📌 आपल्या मालाची किंवा सेवेची विक्री अनेक गोष्टी थांबवतात, त्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे रिस्क !

” Risk जी ग्राहकाला वाटते ”

📌 मार्केटमध्ये नवीन स्थिराऊ पाहणाऱ्या व्यावसायिकांसाठी तर हा फॅक्टर सगळ्यात मोठा अडथळा आहे.

📌 याचं कारण पण नैसर्गिक आणि साधारण आहे,,, म्हणजे आपण ग्राहकांना दोष देऊन उपयोग नाही.

” संशय घेणे शंका उपस्थित करणे हा मानवी स्वभावच आहे” !

📌 ग्राहकांना त्यांच्या मनामध्ये जी शंका असते ,त्याच्याबद्दल जो डाऊट आपण म्हणू शकतो तो असतो तो कशाने दूर होईल?

📌 कारण आजपर्यंतचा व्यवहार पाहता मार्केटमध्ये असे अनेक जण आहेत, जे पैसे घेतात आणि नंतर ओळख सुद्धा दाखवत नाहीत.

📌 या रिस्क फॅक्टरला टक्करसाठी जन्म झाला तो म्हणजे “गॅरंटी” या शब्दाचा.

ग्राहकाची साधी अपेक्षा असते की जो विक्रेता आहे किंवा जो सर्विस देणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने प्रॉडक्टची अथवा सेवा मिळण्याची किमान गॅरंटी घ्यावी.

📌 आज कालच्या फास्ट युगामध्ये तर जिथे कोणाला फारसा वेळ नाही ,अशा दुनिया मध्ये

एकदा विकलेला मग आम्ही परत घेत नाही

अशा पाट्या लावणे म्हणजे आपला धंदा संपविणे आह

📌 आजकाल गॅरंटी चा एक सख्खा चुलत भाऊ मार्केटमध्ये आहे तो म्हणजे “वॉरंटी” > म्हणजे बदलून न देता फक्त रिपेअर करून देणे !

📌 या दोन्ही शब्दांमध्ये बराचसा फरक असला तरी ग्राहक या शब्दांना आपला आधार म्हणून बघतो ,त्यामुळे जो कोणताही व्यवसाय किंवा जो कोणताही उद्योग आपल्या उत्पादनाच्या विक्री बरोबर हे दोन किंवा यापैकी एक शब्द विकतो ,

तो आज काल यशस्वी झालाच म्हणून समजा याचं कारण ????????

Risk Reversal

गॅरंटी असणे म्हणजे जी काही रिस्क आहे ती विक्रेत्यावर येते असे ग्राहकाला वाटते, आणी त्यामुळे विक्रीची प्रोसेस एकदम सुलभ होऊन जाते

ग्राहकाची ही एक भिती दूर केली कि , विक्री वाढते म्हणजे वाढते

उदा .

सुरुवातीच्या काळात टंगस्टन तार असणारे पिवळे लाईट बल्ब मिळायचे, स्वस्त होते ,पण नो गॅरंटी !
मग आले तुलनेने महाग पण एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देणारे CFL Bulbs/ LED Bulbs , हे महाग होते.

पण लोकांनी स्विकारले

कारण ???????? एकच !

गॅरंटी

📌 आज हा प्रकार बिझनेस स्टॅन्डर्ड आहे, मग Gurantee कशीही दया , कमी दया ,जास्त दया , पूर्ण मशीनची दया किवा त्यातल्या मोटारची दया ! पण दया !

📌 आता याचा थोडा आर्थिक ताण विक्रेत्यावर.किंवा उत्पादकावर पडू शकतो , मग याच्या अटी शर्थी तुम्ही ठरवा ना ?

पण गॅरंटीमुळे जी विक्री वाढते , त्यामधे तो लॉस सम- अप होऊन जातो .

📌 “एखादया ग्राहकाला सरळ तोंडावर नाही म्हणून वापस लावणे, थोडक्या वेळसाठी फायदेशीर आहे, पण याचे long term नुकसान होऊ शकतात

📌 ” जपानीज प्रॉडक्ट आणि चायनीज प्रॉडक्ट” मधे हा एकच तर फरक आहे ” पण त्यामुळे त्या देशाच्या इमेजवर कसा परिणाम झालाय हे आपण बघतोय !

📌 बघा ,,,, Guarantee तर दयायची आहे , कशाची देताय? किती देताय ? पुर्ण देताय? की अटी शर्ती लावुन? वारंटी देताय? का पूर्ण गॅरंटी ? काय काय माहित नाही ,पण आपला माल विकताना,हा शब्द आलाच पाहिजे !

📌 हा शब्द वापरलात/तसं वागलात /तो शब्द पाळलात तर विक्री वाढण्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो 😊

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *