Toyota ची नविन स्कीम,मका/सोयाबीन घेऊन या,अन् फॉरच्युनर घेऊन जा

4,630 Views

#business
#Salestips

मका/सोयाबीन आणा व फॉरच्युनर घेऊन जा !

📌 ज्यावेळी पैसा हा नोटा किंवा नाण्याच्या स्वरूपात उपलब्ध नव्हता, त्यावेळी पूर्ण जगात,”वस्तु विनियम” हा एकच व्यापार करण्याचा मार्ग होता.

“याचं गणित सोप्पं होतं.

तुमच्याकडे जी वस्तु आहे ती दया, आणि माझ्याकडे असलेली वस्तु घेऊन जा !

या पद्धतीला “Barter System” म्हणलं जायचं.

हजारो वर्ष याच पद्धतीने व्यापार केला गेला, अगदी इंग्रज ज्यावेळी भारतात आले, त्यावेळी देखील हीच पद्धत आपल्याकडे सुद्धा होती.

आजही बऱ्याच खेडेगावात,शेतमालाच्या बदल्यात पाहिजे तो किराणा मिळतो.

पुढे पैसा हा विनिमयाचं साधन बनला आणि व्यापार जरा व्यवस्थित आणि नियंत्रित बनला.

पण आता Toyota ने ही पद्धत परत मार्केटला आणलीये, त्यांनी ब्राझील या शेताप्रधान देशातील,शेतकऱ्यांसाठी ही स्कीम लाँच केलेली आहे.

टोयोटा चा ब्राझीलमधील मोठ्ठा ग्राहकवर्ग हा शेतकरी असल्याने, Toyota Brazil ने, विक्री वाढवण्यासाठी ही शक्कल लढवली आहे.

या स्कीममध्ये टोयोटाचे fortuner, Hilux truck, Corolla car हे मॉडेल्स उपलब्ध असतील.

टोयोटाची ही स्कीम सध्या, सोयाबीन आणि मका या दोन धान्यांवर उपलब्ध आहे.

याची प्रतवारी टोयोटाकडून ठरवली जाणार असून चालू बाजारभावा प्रमाणे धान्य खरेदीची प्रक्रिया टोयोटा पूर्ण करेल.

या स्कीममुळे ज्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकून वाहन घ्यायचंय, त्यांना माल विका>> पैसा आणा >> मग वाहन खरेदी करा,अशी चक्कर करावी लागणार नाही.

कोणतीही Value driven कंपनी कशा प्रकारे ग्राहकांच्या परिस्थितीचा, त्यांच्या आर्थिक गणिताचा आणि त्यांना जास्तीत जास्त सोय उपलब्ध करून देण्याचा विचार करते? हे या उदाहरणावरून सिद्ध होते.

अजून एक गोष्ट ठळक पणे समोर येते ती अशी कि, कोणी कितीही प्रगती करू दया,शेवटी या जगाचा पोशिंदा शेतकरीच हा राजा आहे.

मग??? सोयाबीन चांगलं पिकवा ! कदाचित आपल्याकडे पण ही स्कीम येईलच की !

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
Office : 914614663 .

Previous Post Next Post

One thought on “Toyota ची नविन स्कीम,मका/सोयाबीन घेऊन या,अन् फॉरच्युनर घेऊन जा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *