VKC: 7 वी पास असणाऱ्या कट्टर कम्युनिस्ट माणसाने कशी सुरु केली 1800 करोड टर्नओव्हरची कंपनी .

प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असे काही खेळाडू असतात जे पूर्वी पासून प्रसिद्ध नसतात परंतु ते असं काही सातत्यपूर्ण रितीने काम करतात ज्यामुळे पूर्ण देशभरातील मार्केटमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

81 वर्षाच्या एक कट्टर कम्युनिस्ट असणाऱ्या राजकारणी माणसाच्या उद्योगाशिलतेची ही कहाणी आहे.

या कंपनीचा आजचा टर्नओव्हर 1800 करोड रुपये असून आमिर खान आणि अजय देवगण या कंपनीची जाहिरात करतात .

VKC हा फुटवेअर ब्रान्ड आज आपण सर्वजण ओळखतो त्याच ब्रॅन्डची ही स्टोरी.

केरळ या छोट्याशा राज्यातून भारतभर पसरलेला या ब्रान्डच्या पाठीमागे डोकं आणि मन आहे,7 वी पास VKC mommad Koya (81) यांचं.

कोझीकोड येथे एकदम गरिब घरात जन्मलेल्या मोमद कोया यांनी 7 वी नंतर,लगेचच काडीपेटीच्या कारखान्यात कामगार म्हणुन सुरुवात केली.

या कारखान्यात कामगारांची पिळवणुक व्हायची,आणि कामगारांच्या प्रश्नावर मोमद कोयांनी आवाज उठवला ….. जे व्हायचं तेच झालं, हकलपट्टी झाली.

अन् 1960 दरम्यान कामाच्या शोधात तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथे गेले,तेथे इलेक्ट्रिकल कंपनीत हेल्पर म्हणून काम चालू केलं, परंतु डोक्यात कायम कामगाराच्या भल्याचे विचार त्यामुळे इथुन पण सुट्टी झाली .

आता वापस कोझीकोडला वापस जाण्याऐवजी इथंच काही तरी करू म्हणुन चहाची टपरी सुद्धा चालु केली .

पण ज्यांच्या डोक्यात मोठा विचार असतात ते शांत रहात नाहीत .
ते 1967 मध्ये कोझीकोडला परत आले आणि काडीपेटी बनवणाऱ्या कंपन्याना लाकूड पुरवण्याच्या व्यवसाय दोन मित्रांच्या साथीने सुरुवात केला.

आणि “VKC” चं नाव यांच्याच तिघांच्या initial नावावरून पडलय.

V.mommad koya
K.sethalavi
C.seithalikutti.

सगळं सुरुळीत चालू असतानाच, या माचीससाठी सॉफ्ट लाकुड सप्लाय करण्याच्या धंद्यात स्पर्धा वाढायला लागली, 1980 ते 1984 दरम्यान तर इतके लोकल स्पर्धक वाढले कि,धंदा करणंच मुश्कील झालं .

मग शेवटी,गपचुप धंदा बंद करावा लागला.

मग आता काय करायचं ? त्यांच्याकडे जागा होती,शेड होतं पण करता काय ?
शेवटी सुचलं “स्लिपर चप्पलसाठी लागणारे शीटस बनवूया” आणि सुरुवात झाली फुटवेअर मध्ये काम करायला.

इथे पण विचार असा होता कि,गरिब जनतेसाठी दर्जेदार उत्पादने द्यायची पण यांचेकडून शीटस घेणारे कमी दर्जाचे शिट्स स्वस्तात घ्यायला यायचे .

स्लिपर वापरणारा वर्ग गरिब आहे,त्यांना दर्जेदार उत्पादने द्यायच्या ऐवजी वेगळच घडायला लागलं,म्हणून शेवटी 1985 मध्ये मोमद कोया यांनीच स्वतः स्लीपर बनवायला सुरुवात केली,स्वतःच्या ब्रॅन्डने VKC चा जन्म इथे झाला.

मो. कोया यांनी कम्युनिस्ट पार्टी जॉईन केली, राजकारणात ऍक्टीव झाले परंतु बिजनेस देखील तेवढयाच जोमाने वाढवला.

केरळमध्ये रबराचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं, इथे आंध्रप्रदेश/ तामिळनाडू / उत्तरप्रदेश / गुजरात मधून कामगार येतात, तोच VKC चा टारगेट कस्टमर होता,यां कस्टमरनेच पहिल्यांदा VKC ला भारतभर नेलं.

ज्यावेळी कंपनीच्या मालकाचं vision हे दर्जेदार माल पुरवण्याचं असतं तेंव्हा तुम्हाला कोणतीही परिस्थिती तुम्हाला अडवू शकत नाही.
मग टिकावू,आरामदायक,आणि स्वस्तात उत्पादन करायला सुरुवात झाली .

मोमद कोया हे स्वतः जरी कमी शिक्षीत असले तरी धंदयात कमतरता नाही, यांनी युरोपमधुन लेटेस्ट मशीन मागवल्या टेक्नॉलॉजी आणली आणि कोझीकोडच्या इंडस्ट्रियल हब मध्ये प्रतिष्ठा मिळवली .

उत्पादन वाढले आणि VKC यामुळे प्रसिद्धी दाक्षिणात्य राज्यात वाढत गेली.

पण कोणतीही परिस्थिती कायम रहात नसते,1990 दरम्यान स्लीपरची मागणी कमी झाली,तैवानमधून PVC चपला यायला लागल्या,अन् बदलतं वातावरण बघून कोयांनी केरळमधला पहिला PVC चा प्लान्ट चालु केला .

चांगला उद्योजक आपल्या पुढच्या पिढीला पण व्यवसायातच घेतो म्हणून मो. कोया यांनी आपल्या मुलांना Rasaq आणि नौशाद यांना , polymers आणि rubber technology मध्ये M .tech करायला लावलं .

2006-07 मध्ये इंडस्ट्रीत पुन्हा चेंज आला,मार्केटमध्ये PU (polyurethane) फुटवेअरची मागणी वाढली आणि नेहमीप्रमाणे VKC तय्यारच होती.

VKC ने नंतर walkroo हे वर्टिकल सुरू केलं .

वेगवेगळे ब्रान्डस आणि सबब्रान्ड आणले गेले .

2006-07 दरम्यान VKC मध्ये त्यांची दोन्ही मुले ऐक्टीव झाली,नवीन ठिकाणी उत्पादन प्लान्ट सुरु झाले .

VKC मध्ये आता एन्ट्री झाली एका मेंटरची आणि त्यामुळे वेग वाढला .

आज 10000 कामगारांना योग्य अशा सुविधा, इंग्लिश क्लासेस वर्ग, त्यांच्या मुलांकरिता स्कॉलरशिप स्कीम्स अशी राबवणारी ही कंपनी पूर्ण भारतभर पसरली .

2015 मध्ये मोमद कोया हे जनतेतुन कोझीकोड चे मेयर निवडले गेले .

आता VKC ची कमान पूर्ण 20 डायरेक्टर्स सांभाळतात परंतु values आणि सामाजिक बांधिलकी तीच आहे.

आज सगळे फॅमिली मेंबर्स VKC हे initials आपल्या नावासमोर लावतात .

अशा दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या एका माणसाच्या कल्पनाशक्ती आणि मेहनतीमुळे हा ब्रान्ड 1500 कोटीवर पोहचला आणि आज नाव लौकीक मिळवून आहे.

VKC फॅमिलीच्या या प्रवासाला शुभेच्छा .

तात्पर्य :
शिक्षण असले किंवा नसले तरी,आपल्या आजुबाजुला उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करून आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून आपण कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतोय .

© निलेश काळे .
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस
5 th floor, विघ्नहर चेबर्स .
अभिनव चौक, नळस्टॉप पुणे .
9518950764.

Office: 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “VKC: 7 वी पास असणाऱ्या कट्टर कम्युनिस्ट माणसाने कशी सुरु केली 1800 करोड टर्नओव्हरची कंपनी .

  1. अभ्यासपुर्ण मांडणी …..👌👌👍👍
    जगाच्या तुलनेत update होणे खुप गरजेचे असते….
    त्या शिवाय मार्केट ला टिकता येत नाही..👍👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *