Volvo ने, “हे” पेटंट इतर कार कंपन्यांना फ्री दिलं आणि लाखो लोकांचे प्राण वाचले

Volvo ने “हे” पेटंट इतर कार कंपन्यांना फ्री दिलं आणि लाखोंचे प्राण वाचले,नक्की वाचा ही स्टोरी.

प्रत्येक उद्योजक हा काही ना काहीतरी संशोधन वगैरे करून स्पर्धकापेक्षा पुढे रहायला बघतो.

जेणेकरून त्याचा माल इतरांपेक्षा जास्त विकावा आणि जास्त नफा मिळावा.

पेटंट घेणे आणि इतरांना त्या संशोधनापासुन रोखने हा प्रकार कायदेशीर मोनोपली त्यासाठीच केला जातो.

ही गोष्ट आहे, आजकाल प्रत्येक कार, बस, ट्रक, आणि इतर वाहनात वापरल्या जाणाऱ्या सिट बेल्टची.

सन 1950 च्या अगोदर, मार्केटला ज्या कार्स होत्या, त्यात सिटबेल्ट हा प्रकार नव्हता किंवा ज्यात होता त्यात ड्रायव्हरच्या फक्त कंबरेला वेगैरे बांधलं जायचं.

हे असं असण्यापाठीमागे अनेक कारणं सुद्धा होती.

1) डिजाईन नीट नव्हते.
2) सिटबेल्ट बांधायला आणि काढायला जास्त किचकट होते.
3) यामुळे समाजात असा संदेश जाईल कि, या कंपनीची कार धोकादायक आहे वगैरे असं कार निर्मात्या कंपन्यांना वाटायचं.

पण एक कंपनी अशी होती कि,जीला याचं महत्वं पटलं होतं.

स्वीडनची कार निर्माता कंपनी “वोल्वो”

Volvo ने 1950 मध्ये एका Aviation Engineer ची अपॉईंटमेंट केली, त्यांचं नाव होते “Nils Bohlin”.

Nils Bohlin यांनी, लढावू विमानात पायलट साठी असणाऱ्या Ejector Seat, आणि सेफ्टीसाठी काम केलं होतं,त्यामुळे त्यांना जेंव्हा Volvo ने अपॉईंट केलं त्यावेळी त्यांचेकडे या क्षेत्रातला चांगला अनुभव होता.

त्यांनी अशा प्रकारचा सिटबेल्ट डिजाईन केला,कि जो Y आकारात ड्रायव्हरला बांधून ठेवेल,जो बकल करण्यासाठी अत्यंत सोप्पा असेल (अगदी लहान मुलं पण सहज लावू शकतील ) आणि सिटबेल्टमुळे ड्रायव्हींगला कसलाच त्रास वगैरे होणार नाही.

या तीन वैशिष्ठयासहित पहिला सीटबेल्ट 1959 साली वोल्वोच्या कार मध्ये बसवला गेला.

पण सुरूवातीच्या काळात हा प्रकार लोकांना नकोसा वाटायचा,परंतु वाेल्वोने जे काही क्रॅश टेस्ट केल्या होत्या, त्यात हे सिद्ध झालं होतं कि 60km/hr ला जर अपघात झाला तर,सिटबेल्ट मुळे अनेक प्राण वाचतील.

इतके सगळे फायदे असतानादेखील इतर कंपन्या सिटबेल्ट सारखं काहीही उपकरण वापरत नव्हत्या.

मग Volvo ने स्वीडन मध्ये एका वर्षात घडलेल्या 28000 अपघाताचा एक रिपोर्ट तयार केला, आणि त्या रिपोर्टच्या आधारे इतर कार कंपन्यांना सिटबेल्टचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला,वेगवेगळ्या ठिकाणी डेमो दिले, क्रेश टेस्ट दाखवल्या.

ही कंपनी इतक्यावरच थांबली नाही,तर आपलं संशोधन सर्व कंपन्यांना खुलं करून टाकलं.

हळू हळू इतर वाहन कंपन्यांनादेखील याचं महत्वं समजल्यामुळे त्यांनी देखील हा थ्रीपॉईंट सीटबेल्ट वाहनात दयायला सुरुवात केली.

आजकाल तर ड्रायव्हर सीट बरोबरच मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी सुद्धा सीटबेल्ट दिले जातात.

हे संशोधन आज कंपल्सरी फिचर बनलंय.

या संशोधनासाठी Royal Swedish Engineering Acadamy ने Neil Bohlin यांना गोल्ड मेडल दिले (वाहन क्षेत्रात एखादं नोबेल असतं तर ते सूद्धा यांना मिळालं असतं) आणि 1999 मध्ये औटोमोबाईल क्षेत्रात जे Hall of Fame प्रसिद्ध संशोधनं आहेत, त्यामध्ये याचा समावेश झाला.

आजही आपण आपल्या कारमध्ये बसल्यानंतर अगदी एका हाताने,सिटबेल्ट लावतो, सुरक्षीत रहातो ते फक्त Nils Bohlin आणि Volvo मुळे.

कारण ? थ्री पॉईंट सीटबेल्टची ती डिजाईन आणि आजची डिजाईन यात काहीही फरक झालेला नाही.

एका कंपनीने व्यावसायिक नफ्याचा विचार न करता,आपले पेटंट समाजासाठी खुले केले आणि आजवर लाखो लोकांचे प्राण वाचवले.

यासाठी दरवेळी सीटबेल्ट लावताना आपण Volvo चे आभार मानले पाहिजेत.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

©निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

office:
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “Volvo ने, “हे” पेटंट इतर कार कंपन्यांना फ्री दिलं आणि लाखो लोकांचे प्राण वाचले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *