ग्राहकाची प्रतिक्रिया का महत्वाची असते?

184 Views

आपण दहावीची बोर्ड परिक्षा दयायला जाण्याअगोदर सर लोकं सांगायचे कि , पेपर लिहून झाला कि परत एंकदा वाचून काढावा !

आठवतयं ?

पण ते जमायचंच नाही !
किंवा असं म्हणा ! कि ते आवडायचं नाही , कारण ??? तर कारण असं कि बऱ्याच जणांना परत परत त्याच गोष्टी उगाळायला आवडत नाहीत .

म्हणून मग बिझनेसचा एक अत्यंत महत्वपूर्ण चॅप्टर आपण skip करून जातो . जो आहे कस्टमर फीडबॅक !

” तुम्हाला आमचा प्रॉडक्ट किंवा सर्विस कशी वाटली ? ”

हा एकच प्रश्न आपल्याला अनेक गोष्टी सांगून किंवा शिकवून जातो, त्यामुळे तो घेणे अतिशय आवश्यक आहे.

प्रत्येक यशस्वी व्यवसाय , उद्योग असा फिडबैक घेत असतो ,
त्याच्या काही पद्धती आपण बघूया !

1) Common [ सामान्य पद्धती]
2) Advanced [ प्रगत पदधती ]

*************
Common

Helpticket
Surveys
Reviews
In-person
Blog posts

Help tickets :
यात सरळ सरळ विचारलं जातं एक फॉर्म दिला जातो , ग्राहकाने तो भरून माहिती दिली कि त्या बदल्यात त्यास तात्काळ डिस्काऊंट किंवा कॅशबैक दिला जातो. लोकं याला सुद्धा भरभरून प्रतिसाद देतात .
Google Pay ने याचाच वापर करून जम बसवला .

2) Surveys : सरकार किंवा कंपन्या आपल्या बद्दल लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मुद्दाम सर्वे करवून घेतात , त्यातून खूप मोठा डेटा मिळतो . न्यूज चॅनल्स तर याचा फार मोठा फायदा करतात … ” जनता कि आवाज ” म्हणू म्हणू ” ओरडत सांगतात .

( 3 ) Reviews : पूर्वी संग्रहालयात किंवा अन्य कुठल्याही ठीकाणी एक रजिस्टर ठेवलंलं असायचं , त्यात आपलं मत लिहिता येत असायचं ,
आज काल लोकं Google ,facebook , insta वर Review करतात.

(4) in Person:

या प्रकारात समोरासमोर विचारलं जातं कि , ” कसं वाटलं साहेब ” ? फोन कॉलवर विचारला जातो अनुभव.
लोकं सांगतात , मोकळेपणाने सांगतात , आपल्याला काय पाहिजे ते उचला !

( 5 ) Blog post : कंपनीचे मॅनेजर , मालक अथवा अन्य कोणी कर्मचारी एखादा ब्लॉग किंवा फेसबुक पोस्ट करून विचारू शकतात … कि कसा वाटला अनुभव ? महिंद्राचे आनंद महिंद्रा याच्यामुळेच सोशल साईट्स वर जास्त अॅक्टीव असतात

*****–********

Advanced Feedbacks :
जी गोष्ट सरळ सरळ विचारली जाऊ शकत नाही किंवा कळत नाही ती थोडया वेगळ्या पद्धतीने विचारली जाऊ शकतेच कि ..
याच्या पण पद्धती आहेत .
या प्रकाराला Goldmining the deta असं म्हणतात कारण यातून सोन्यासारखी महत्वाची माहिती मिळत रहाते .

(1 ) Feature Request : कच्चा पक्का प्रोडक्ट तयार करून मार्केटला उभा करणे आणि ग्राहकालाच विचारणे कि अजून यात काय फिचर तुम्हाला आवश्यक वाटतात ? असं विचारणे ही गोष्ट म्हणजे feature Request होय . जसं Nokia ला ग्राहक सतत म्हणत राहिला कि डबल सीम पाहिजे ! पण त्यांनी लक्ष दिलं नाही .

(2 ) Cancelation survey:
ग्राहक रजिस्टर करतो काही पेमेंट पण करतो आणि नंतर ऑर्डर कॅन्सल करतो . आता या स्थितीत आपल्याला कळलं पाहिजे कि त्याने कॅन्सल का केलं ?
हे जर कळलं तर पुढे आपल्याकडून ती चुक होणार नाही .

(3 ) Social Platforms :
लोकं सोशल साईट्स वर जास्त व्यक्त होतात , करा स्वतःचं फेसबुक पेज , एक कम्युनिटी तयार करा , विचारा त्यांना तिथे ,,, ” अजून काय नवीन दयायला पाहिजे ” ?
लोकं त्यांचा वेळ देऊन कमेंटस करतील ते पण आपल्या फायदयासाठी ,,, करून घ्या ना त्याचा फायदा .

( 4 ) Customer Boards : जनता सरकारचे एखादे धोरण आवडले नाही तर सहयांचे अभियान राबवते , एका मोठ्या बोर्डवर मत मांडते .
तसा बोर्ड आपण पण लावू शकतो का ?जरा विचित्र वाटेल पण हे काम करते .

हे सगळे प्रकार आपल्याला ग्राहकाचं आपल्या बद्दलचं मत सांगतात . ते ऐकून घेऊन त्यावर काम करून , आवश्यक ते बदल करून आपण आपल्या व्यवसायाची वाढ आधिक वेगाने करू शकतो , यात वादच नाही .

“ज्याचे कान मोठे नाहीत तो व्यापारी उद्योजक मातीत जातो ” , अशा आशयाची जपानी म्हण आहे , आणि हा फार्म्यूला जपानी कंपन्या तंतोतंत पाळतात , त्यामुळेच कदाचित ज्यांनी त्यांच्यावर अॅटमबॉम्ब टाकला त्या अमेरिकेत सर्वात जास्त जपानी कार्स विकतात .

तेंव्हा .
ऐका आणि अप्लाय करा .

निलेश काळे.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *