Checklist का वापरायची ?

562 Views

© निलेश काळे .

आजचा लेख हा अत्यंत महत्वपूर्ण बिझनेस टुल बद्दल आहे त्यामुळे लक्षपूर्वक वाचा .

मध्यंतरी एक दुःखद बातमी आली कि युक्रेन एअरलाईन्स चे एक Boeing 737 प्रवासी जेट इराणमध्ये कोसळून 170 प्रवासी ठार झाले .

याची कारणमिमांसा झाली, पण एअरलाईन इंडस्ट्रीने जगाला दिलेलं एक बिझनेस प्रिसिपल समजून घेऊया.

या टुलचं नाव आहे .
“Checklist”

एक अशी लिस्ट ज्यामध्ये विमान उडवण्याअगोदर आणि विमान उडत असतानi सुद्धा , किंवा अपघात घडत असताना सुद्धा काही बाबी या फक्त त्या त्या प्रोसी जर नुसारचं केल्या जातात , ज्या त्या प्रोसी जर मध्ये दिलेल्या आहेत .

म्हणूनच दररोज हजारो विमानं इकडून तिकडे उडतात तरी पण अपघात क्वचितच दिसतात .

विमान वाहतूक आणि बांधकाम या दोनच इंडस्ट्री अशा आहेत कि ज्या फक्त आणि फक्त चेकलिस्ट द्वारेच काम करतात .

आता आता … सर्जरी मध्ये मानवी चुका टाळण्यासाठी पण प्रोसिजर चेकलिस्ट तयार केली जाते .

नाही तर मानवी चुकांमुळे सर्जरी दरम्यान मरणाऱ्या रुग्णांची संख्या ही पूर्वी जास्त होती .( कधीतरी डॉक्टर चुकून कात्री पोटातच विसरले अशा बातम्या ऐकू येत होत्या , त्या चुका आता होत नाहीत ते फक्त या एका बाबीमुळे .

ही लिस्ट प्रिंटेड असते .
त्यात कामाचे वर्णन असते .
हे केलं का ?
उत्तर : Ok,करा सही .

ते केलं का ?
उत्तर : OK ,, करा सही .

अशा प्रकारे , काम चालु करण्यापासून संपेपर्यतचा आराखडा त्यावर असतो .
ज्यामध्ये एकही काम सुटले नाही पाहिजे असा नियम !
याला कारण पण तसंच आहे , मानवी मेंदू हा खूप गोष्टी लक्षात ठेऊ शकतो पण सर्वच तर नाही ना ? पण एक गाईडलाईन असेल तर तो त्याला नीट पाळतो आणि चेकलिस्ट प्रिंसिपल मध्ये मेंदूला असच वळण लावलं जातं .

नवीन कारण आणल्यानंतर त्याच्या प्रत्येक पार्टवर Tasted Okनावाचं जे स्टिकर दिसतं ना ? ते चेकलिस्टचाच पार्ट आहे,नाहीतर हजारो पार्टस असणाऱ्या कारमध्ये कोणताही स्क्रु सहज विसरू शकतो .

पण हे असं होत नाही .

📌आता हेच तत्व आपण आपल्या ऑफीसमध्ये , दुकानात , शोरूम मध्ये , माल दुकानात येण्याअगोदर किंवा प्रोसेस केलेला माल बाहेर जाण्याअगोदर वापरू शकतो का ?

तर नक्कीच !

यामुळे काय होईल तर फॉल्टी माल आत येणार नाही,प्रत्येक मशीन नीट काम करेल ,प्रत्येक कर्मचारी व्यवस्थित काम करेल आणि ग्राहकाला योग्य क्वालिटीचाच माल जाईल !

रिजेक्शन किंवा अपघात होणार नाहीत .

📌हा टॉपीक तसा खूप मोठा आहे , नेटवर आपल्याला या विषयी सविस्तर माहिती मिळू शकेल .

📌ती अभ्यासा आणि आपल्या व्यवसायात याचा वापर नक्की करा !

तेंव्हा कुठे आपण म्हणू शकू

#Tasted_OK.

#लेखआवडलाअसल्यासव्यापारी _ मित्रांपर्यंतपाठवा .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा
©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
Block 2 & 3 , Mazda Apt.
Lane: 6 , Anand Park
Aundh, Pune
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *